Nanded | स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सानिमित्त नांदेडच्या पोलीस अधिक्षक कार्यालयाला खास विद्युत रोषणाई…
स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सानिमित्त नांदेडचे जिल्हा पोलीस अधिक्षकांचे कार्यालय तिरंगा प्रकाशाने सजवण्यात आलंय. राष्ट्रध्वजाच्या रंगाप्रमाणे केलेली रोषणाईने जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय मनमोहक असेच दिसतंय.
नांदेड : स्वातंत्राच्या अमृतमहोत्सवानिमित्त नांदेडमध्ये (Nanded) प्रसारण मंत्रालयाने चित्रांचे प्रदर्शन आयोजित केलंय. नवीन पिढीला स्वातंत्राचा लढा समजून घेण्यासाठी इथे दुर्मिळ अश्या चित्रांचे प्रदर्शन भरवण्यात आले असून नागरिकांनी हे पाहण्यासाठी मोठी गर्दी केलीयं. खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या हस्ते या चित्र प्रदर्शनाचे (Exhibition) उदघाटन करण्यात आलंय. या चित्र प्रदर्शनाचा नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन प्रसार खात्याने केलंय. या प्रदर्शनामध्ये विविध प्रकारचे चित्र (Photo) बघायला मिळते आहे.
विद्युत रोषणाई बघण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी
स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सानिमित्त नांदेडचे जिल्हा पोलीस अधिक्षकांचे कार्यालय तिरंगा प्रकाशाने सजवण्यात आलंय. राष्ट्रध्वजाच्या रंगाप्रमाणे केलेली रोषणाईने जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय मनमोहक असेच दिसतंय. तसेच या कार्यालयाची खास विद्युत रोषणाई बघण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केलीयं. स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सानिमित्त विविध शासकिय कार्यालयांना आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आलीयं.
स्वातंत्र्यांच्या अमृत महोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन
स्वातंत्र्यांच्या अमृत महोत्सवानिमित्त देशभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलंय. 13 आॅगस्ट ते 15 आॅगस्ट यादरम्यान मोठ्या प्रमाणात कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. यानिमित्ताने पोलीस अधीक्षक कार्यालयाला खास विद्युत रोषणाई करण्यात आलीयं. तसेच जिल्हाधिकारी कार्यालयाला देखील विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. तसेच शहरामध्ये स्वातंत्र्यांच्या अमृत महोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन केले गेले आहे.