VIDEO : सायेब… गौतमी पाटील गावात येणार हाय, दोन दिसाची सुट्टी द्या; एसटी चालकाचा रजेचा अर्ज होतोय व्हायरल

प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटील हिच्या अदाकारीची चक्क एका एसटी चालकालाही भुरळ पडली आहे. या चालकाने गौतमीचा कार्यक्रम पाहण्यासाठी चक्क दोन दिवसांची सुट्टी टाकली आहे. त्याचा हा अर्ज सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

VIDEO : सायेब... गौतमी पाटील गावात येणार हाय, दोन दिसाची सुट्टी द्या; एसटी चालकाचा रजेचा अर्ज होतोय व्हायरल
gautami patilImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: May 12, 2023 | 8:45 AM

सांगली : ती येते… आपला परफॉर्मन्स करते अन् सर्वांची मनं जिंकून जाते. गौतमी पाटील, नृत्य आणि गर्दी हे समीकरण आता फिट्ट झालं आहे. सध्याच्या मौसमात गावागावात, जत्रांमध्ये केवळ आणि केवळ गौतमी पाटील हिच्याच कार्यक्रमांची चलती आहे. गौतमीने आपल्या गावात येऊन कार्यक्रम करावा अशी प्रत्येकाची इच्छा असते. आपल्या गावात गौतमीचा कार्यक्रम नसेल अन् तालुक्याच्या किंवा जिल्ह्याच्या ठिकाणी गौतमीचा कार्यक्रम असेल तर गौतमीचा कार्यक्रम पाहण्यासाठी शेकडो तरुण कार्यक्रमाच्या ठिकाणी जातात. अगदी मुक्कामही करतात. ग्रामीण भागातील तरुणांना गौतमीचं इतकं वेड लागलं आहे. एका एसटी चालकालाही गौतमीची अशीच भुरळ पडली असून त्याने गौतमीचा कार्यक्रम ऐकण्यासाठी चक्क दोन दिवसाची सुट्टीच टाकली आहे.

गावात गौतमी पाटील येणार आहे. त्यामुळे दोन दिवसांची सुट्टी द्या, असा रजेचा अर्ज एका एसटी चालकाने डेपो मॅनेजरला केला आहे. त्याचा हा रजेचा अर्ज सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. सांगलीच्या तासगाव डेपोतला हा एसटी चालक आहे. त्याने चक्क गौतमीचा कार्यक्रम पाहण्यासाठी रजा टाकली आहे. मात्र धक्कादायक बाब म्हणजे ज्या नावाने हा अर्ज व्हायरल केला आहे, त्या चालकाने असा कोणताही अर्ज केला नसल्याचं उघड झालं आहे. तसा रजेचा अर्ज तासगाव एसटी आगाराकडे आला नसल्याचंही कळतं. त्यामुळे कोणीतरी खोडसाळपणाने अर्ज व्हायरल केल्याचे प्रकार घडला आहे.

हे सुद्धा वाचा

सोशल मीडियावर व्हायरल

या अर्जाचं सत्य वेगळं असलं तरी आणि एसटी चालकाने अर्ज केला नसला तरी हा गंमतीशीर अर्ज आता सोशल मीडियात तुफान व्हायरल होत आहे. एसटी चालकाने 22 आणि 23 मे रोजी सुट्टी मागितल्याचं अर्जातून स्पष्ट होत आहे. हा अर्ज व्हायरल झाल्यानंतर गौतमीच्या चाहत्यांनी तो आणखीनच व्हायरल केला आहे. तर या अर्जावर सदर एसटी चालकाची कोणतीही प्रतिक्रिया आली नाही. त्यामुळे या अर्जाबाबतचा संभ्रमही कायम आहेच.

गौतमी बार्शीत

दरम्यान, गौतमी पाटील हिचा आज बार्शीत कार्यक्रम होणार आहे. तसं तिने सोशल मीडियावर एका व्हिडीओतून स्पष्ट केलं आहे. राजेंद्र गायकवाड मित्र मंडळाच्यावतीने बार्शीतील जैन मंदिरासमोर कुर्दवाडीत सायंकाळी 7 वाजता हा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचं आवाहन गौतमी पाटील हिने केलं आहे. त्यामुळे आजच्या बार्शीतील कार्यक्रमाला तुफान गर्दी होणार असल्याचंही सांगितलं जात आहे.

Non Stop LIVE Update
मग नैतिकतेच्या ढोंगी गप्पा.., महिला अत्याचारावरून राऊतांची भाजपवर टीका
मग नैतिकतेच्या ढोंगी गप्पा.., महिला अत्याचारावरून राऊतांची भाजपवर टीका.
निवडणुकीपूर्वी रोहित पवारांना धक्का,आरोप करत ज्येष्ठ नेत्याचा राजीनामा
निवडणुकीपूर्वी रोहित पवारांना धक्का,आरोप करत ज्येष्ठ नेत्याचा राजीनामा.
नांदेडचे काँग्रेस खासदार वसंत चव्हाणांचं वयाच्या 64 व्या वर्षी निधन
नांदेडचे काँग्रेस खासदार वसंत चव्हाणांचं वयाच्या 64 व्या वर्षी निधन.
बीड-परळी महामार्गावरील पूल गेला वाहून, 48 तासांपासून वाहतूक ठप्प अन्..
बीड-परळी महामार्गावरील पूल गेला वाहून, 48 तासांपासून वाहतूक ठप्प अन्...
विधानसभेसाठी 'मविआ'चा फॉर्म्युला ठरला? कसं असणार मुंबईचं जागावाटप?
विधानसभेसाठी 'मविआ'चा फॉर्म्युला ठरला? कसं असणार मुंबईचं जागावाटप?.
'मी कर्ज काढून बंदुका देणार', शिंदे नेत्याचं महिलांसाठी अनोखं फर्मान?
'मी कर्ज काढून बंदुका देणार', शिंदे नेत्याचं महिलांसाठी अनोखं फर्मान?.
युनिफाईड पेन्शन स्कीम नेमकी काय? UPS योजनेनुसार आता किती मिळणार पेन्शन
युनिफाईड पेन्शन स्कीम नेमकी काय? UPS योजनेनुसार आता किती मिळणार पेन्शन.
फडणवीस-दादांबद्दल खोतांचं मोठं वक्तव्य, 'त्यांची-आमची पंगत वेगळी...'
फडणवीस-दादांबद्दल खोतांचं मोठं वक्तव्य, 'त्यांची-आमची पंगत वेगळी...'.
लोकांचा जीव गेला तरी चालेल.., शिंदे गटाच्या नेत्याचं वादग्रस्त वक्तव्य
लोकांचा जीव गेला तरी चालेल.., शिंदे गटाच्या नेत्याचं वादग्रस्त वक्तव्य.
जळगावच सोनं बावनकशी तशा माझ्या लाडक्या..., शिंदेंकडून नारीशक्तीच कौतुक
जळगावच सोनं बावनकशी तशा माझ्या लाडक्या..., शिंदेंकडून नारीशक्तीच कौतुक.