भूगर्भातून येत होता आवाज, भूवैज्ञानिक म्हणतात, हे तर भूकंपाचे धक्के…
आज झालेल्या हासोरी गावाच्या परिसरातील 2.2 रिष्टर स्केलच्या सौम्य धक्के बसले. भूकंपाअगोदरही या भागात भूकंप सदृश्य सौम्य हादरे झाल्याची शक्यता नोंदविण्यात आली आहे.
लातूर जिल्ह्यातल्या हसोरी गावाच्या भूगर्भात येणारे आवाज हे भूकंपाचे सौम्य धक्के असल्याची माहिती आज जिल्हा प्रशासनाने दिली आहे. आज पहाटे 3 वाजून 38 मिनिटांनी हासोरी गावाला 2.2 रिष्टर स्केलच्या भूकंपाचा धक्का बसला. अशी माहिती राष्ट्रीय पृथ्वी विज्ञान मंत्रालयाचे भूवैज्ञानिक अजयकुमार शर्मा यांनी दिली आहे. आज त्यांनी हासोरी गावाच्या भूगर्भातील आवाजाबाबत तिथे जाऊन निरीक्षण केले आहे.
हासोरी परिसरात भूकंपाचा केंद्र
आज झालेल्या हासोरी गावाच्या परिसरातील 2.2 रिष्टर स्केलच्या सौम्य धक्के बसले. भूकंपाअगोदरही या भागात भूकंप सदृश्य सौम्य हादरे झाल्याची शक्यता नोंदविण्यात आली आहे. लातूरच्या भूकंप वेधशाळेपासून साधारण 52 किमी अंतरावर असलेल्या हासोरी गावाच्या परिसरात आजच्या भूकंपाचा केंद्रबिंदू आहे. असं राष्ट्रीय पृथ्वी विज्ञान मंत्रालयाचे भूवैज्ञानिक अजयकुमार शर्मा आणि स्वामी रामानंद तिर्थ विद्यपीठाच्या भूगर्भशाळा संकुलाचे प्रमुख प्रा. डॉ.अविनाश कदम यांनी सांगितलं.
पत्र्याची घर असणाऱ्यांना सूचना
गेल्या अनेक दिवसांपासून हासोरी आणि निलंगा तालुक्यातल्या इतरही गावांमध्ये भूगर्भातून मोठं मोठे आवाज होत होते. जिल्हा प्रशासनाने गावकऱ्यांना अफवांवर विश्वास न ठेवता काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. त्याचबरोबर ज्यांची घरे पत्र्याची आहेत त्यांना संध्याकाळी शाळेत किंवा ग्राम पंचायतीच्या इमारतीत राहण्याचा सूचना देण्यात आल्या आहेत.
हासोरी गावात झालेला भूकंपाचा सौम्य धक्का हा लातूर ते कर्नाटकातील कलबुर्गी, औरादशहाजनी ते आशीव या गावांमधील अंतरात असल्याचे सांगण्यात आले आहे. ही माहिती देण्यासाठी आज जिल्हा प्रशासनाने पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते.