चंद्रपुरात 3 वाघ आणि गावकऱ्यांमध्ये झडप, व्याघ्र संरक्षण दलाच्या जवानासह एक गावकरी जखमी

चंद्रपुरात एका गावात 3 वाघ आणि गावकऱ्यांमध्ये झडप झाल्याची माहिती समोर आली आहे (tiger attack on villagers in Palasgaon of Chandrapur district).

चंद्रपुरात 3 वाघ आणि गावकऱ्यांमध्ये झडप, व्याघ्र संरक्षण दलाच्या जवानासह एक गावकरी जखमी
चंद्रपुरात 3 वाघ आणि गावकऱ्यांमध्ये झडप, व्याघ्र संरक्षण दलाच्या जवानासह एक गावकरी जखमी
Follow us
| Updated on: Jun 23, 2021 | 2:44 PM

चंद्रपूर : चंद्रपुरात एका गावात 3 वाघ आणि गावकऱ्यांमध्ये झडप झाल्याची माहिती समोर आली आहे. वाघांना गावाजवळून हुसकावून लावण्यासाठी काही गावकऱ्यांनी प्रयत्न केले. मात्र, त्यामध्ये एक गावकरी जखमी झाला. याशिवाय  STPF (special tiger protection force) दलातील एक जवानही यामध्ये जखमी झाला. वाघांच्या या हल्ल्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण आहे. प्रशासनाचे परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी शर्थीने प्रयत्न सुरु आहेत (tiger attack on villagers in Palasgaon of Chandrapur district).

वाघ आणि गावकऱ्यांमध्ये झडप

संबंधित घटना ही चंद्रपूर जिल्ह्याच्या चिमूर तालुक्यातील पळसगाव येथे घडली. पळसगाव येथील तलावाजवळ आज (23 जून) 3 वाघ असल्याचे गावकऱ्यांच्या निदर्शनास आलं. त्यानंतर या वाघांना तिथून हुसकावून लावण्यासाठी गावकऱ्यांनी प्रयत्न केले. यावेळी वाघ आणि गावकऱ्यांमध्ये झडप झाली. यामध्ये एक गावकरी जखमी झाला. त्यांचं नाव चरणदास बन्सोड (वय 56) असं आहे (tiger attack on villagers in Palasgaon of Chandrapur district).

व्याघ्र संरक्षण दलाचा जवान जखमी

गावकरी आणि वाघ यांच्यात झडप सुरु असल्याची माहिती व्याघ्र संरक्षण दलाला (STPF) मिळाली. STPF जवानांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला. मात्र, यावेळी वाघाने STPF जवान सुनील गज्जलवार यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात ते जखमी झाले. सध्या वाघ त्याच तलावाजवळ असून स्थिती तणावपूर्ण पण नियंत्रणात आहे.

इगतपुरीत 3 वर्षीय मुलीवर बिबट्याचा हल्ला

दरम्यान, इगतपुरीत बिबट्याने एका 3 वर्षीय चिमुकलीवर हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. इगतपुरीच्या कानडवाडी परिसरातील संबंधित घटना घडली. ही घटना मंगळवारी (22 जून) रात्री घडली. बिबट्याने चिमुकलीवर हल्ला करुन जंगलाच्या दिशेन ओढत नेलं. यावेळी मुलीचे आई-वडील, आजोबा यांच्यासमोर घडली. चिमुकलीच्या आई-वडिलांनी बिबट्याचा पाठलाग केला. त्याने काही अंतरावर गुरतुलेच्या झुपडपात चिमुकलीला सोडलं आणि जंगलाच्या दिशेला धूम ठोकली. चिमुकलीला तातडीने घोटी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यानंतर वैद्यकीय अधिकाऱ्यांचा सल्ल्यानुसार नाशिक जिल्हा रुग्णालयात चिमुकलीला उपचारासाठी हलवण्यात आलं.

हेही वाचा : विवाहबाह्य संबंधातून नागपुरात पत्नीच्या प्रियकराची हत्या, नाल्याचं पाणी लालेलाल

सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....