Video : खाकीलाही रडू येतं! पोलीस निरीक्षकाला निरोप देताना अख्खा गाव गहिवरला, अश्रू ढासळतच मिरवणूकही काढली!

आपल्या अतूल जाधव साहेबांना निरोप द्यायच्या या विचारांनी पोलिस ठाण्यातून कर्मचारी स्वत: अश्रू देखील रोखू शकत नव्हते. तरूण वयातील मुले पुष्षगुच्छ हातामध्ये देत जाधव यांच्या पाया पडत होते. ज्येष्ठ मंडळींपासून ते लहान मुलांपर्यंत सर्वचजण जाधव यांना निरोप देण्यासाठी ठाण्यात जमतच होते. जाधव यांनी तब्बल 11 वर्ष मुंबईमध्ये सेवा बजावून 2020 मध्ये ते वैभववाडी पोलीस स्थानकात रुजू झाले होते.

Video : खाकीलाही रडू येतं! पोलीस निरीक्षकाला निरोप देताना अख्खा गाव गहिवरला, अश्रू ढासळतच मिरवणूकही काढली!
Image Credit source: tv9
Follow us
| Updated on: Jun 06, 2022 | 4:01 PM

मुंबई : पोलीस अधिकारी (Police officer) म्हटंले एक वेगळाच रूबाब आणि दरारा असतो. खूप कमी वेळा पोलिस अधिकारी आणि सामान्य नागरिकांचे सूत जुळते. सर्वसामान्य माणूस आणि पोलिसांमध्ये एक मोठी दरी नेहमीच असते. मात्र, या सर्वांना अपवाद ठरते म्हणजे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी पोलीस स्थानकातील पोलीस निरीक्षक अतूल जाधव (Police Inspector Atul Jadhav) हे. नुकताच जाधव यांची बदली झाली आणि त्यांना पोलिस ठाण्यातून निरोप देण्यासाठी अख्खा गावच जमला. इतके नाहीतर कर्मचाऱ्यांपासून ते गावकऱ्यांपर्यंत प्रत्येकाच्या डोळ्यामध्ये पाणी होते. जाधव यांच्या कोणी पाया पडत होते तर कोणी रडत रडत गळा भेट घेते होते. कदाचित असे चित्र या अगोदर कधीही महाराष्ट्राने (Maharashtra) बघितले नसावे.

वैभववाडी पोलीस स्थानकात 2020 पासून कार्यरत

आपल्या अतूल जाधव साहेबांना निरोप द्यायच्या या विचारांनी पोलिस कर्मचारी अश्रू देखील रोखू शकत नव्हते. तरूण वयातील मुले पुष्षगुच्छ हातामध्ये देत जाधव यांच्या पाया पडत होते. ज्येष्ठ मंडळींपासून ते लहान मुलांपर्यंत सर्वचजण जाधव यांना निरोप देण्यासाठी ठाण्यात जमतच होते. जाधव यांनी तब्बल 11 वर्ष मुंबईमध्ये सेवा बजावून 2020 मध्ये ते वैभववाडी पोलीस स्थानकात रुजू झाले होते. शांत आणि अत्यंत समजूतदार स्वभावामुळे जाधव यांनी प्रत्येकाला आपलेसे केले. इतकेच नाहीतर 2 वर्षांच्या कालावधीत त्यांनी आपल्या पोलीस ठाण्यातील प्रत्येक अधिकारी व कर्मचारी यांच्या मनात आपल वेगळे स्थान निर्माण केले होते.

हे सुद्धा वाचा

इतिहासामध्ये कदाचित पहिल्यांदाच असे चित्र

जाधव यांची खासियत म्हणजे अगदी गोरगरीब माणूसही त्यांच्या चेंबरमध्ये बिनधास्त जायचा आणि आपल्या समस्या मांडायचा. यामुळे गावातील प्रत्येकाला जाधव हे आपले जवळचेच वाटायचे. तालुक्याच्या इतिहासात पहिल्यांदाच एखाद्या अधिकाऱ्याची बदली झाल्यानंतर इतक्या मोठ्या संख्येने लोक जमा झाले. सामान्य लोकच नाहीतर सर्वपक्षीय नेते देखील जाधव यांना निरोप देण्यासाठी उपस्थित होते. इतिहासामध्ये कदाचित पहिल्यांदाच असे चित्र असेल की, एखादा अधिकारी पोलिस ठाण्यातून निरोप घेतो आहे आणि अख्खे पोलिस कर्मचारी रडत आहेत. आपल्या अधिका-याला निरोप देण्यासाठी फुलांनी सजवलेल्या गाडीत बसवून कर्मचाऱ्यांनी आणि लोकांनी शहरात भव्य मिरवणूक काढली आणि पुष्पवृष्टी देखील केली.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.