दोन तरुण बाईकवर, अज्ञात वाहनाची जोरात धडक, दोघांचा जागीच मृत्यू, वाहन चालक पसार

भुसावळ राष्ट्रीय महामार्गावर भरधाव अज्ञात वाहनाने दुचाकीला धडक दिल्याने भुसावळातील दोघा तरुणांचा जागीच मृत्यू झाला (two bikers death in accident at Bhusawal).

दोन तरुण बाईकवर, अज्ञात वाहनाची जोरात धडक, दोघांचा जागीच मृत्यू, वाहन चालक पसार
सांकेतिक फोटो
Follow us
| Updated on: Jun 21, 2021 | 12:23 AM

जळगाव : भुसावळ राष्ट्रीय महामार्गावर भरधाव अज्ञात वाहनाने दुचाकीला धडक दिल्याने भुसावळातील दोघा तरुणांचा जागीच मृत्यू झाला. माळी भवनाजवळील उड्डाणपुलावर रात्री सव्वा नऊ वाजेच्या सुमारास हा अपघात घडला. अपघातानंतर अज्ञात वाहन चालक पसार झाला. दरम्यान, महामार्गावर अपघातांचे सत्र कायम असून चार दिवसांपूर्वीच भुसावळातील सिंधी कॉलनीतील भावंडाचा साकेगावजवळ अपघाती मृत्यू झाल्याची घटना घडली होती. ही घटना ताजी असतानाच पुन्हा अपघात झाल्याने ग्रीन पार्क भागात शोककळा पसरली आहे. अपघातातील मयत रेल्वेत गँगमन असल्याचे समजते (two bikers death in accident at Bhusawal).

दुचाकीचा अक्षरशः चुराडा

भुसावळातील दोघा तरुणांचा अपघाती मृत्यू समजलेल्या माहितीनुसार, साकेगावकडून भुसावळच्या दिशेने भुसावळातील तरुण दुचाकीने येत होते. यावेळी अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली. यामध्ये अल्ताउद्दीन बशिरोद्दीन शेख (वय 24) आणि शेख शरीफ शेख इद्रीस (वय 25) या तरुणांचा मृत्यू झाला. दोघं तरुण हे भुसावळमधील ग्रीन पार्क परिसरात राहायचे. अज्ञात वाहनाने इतकी जोरदार धडक दिली की दुचाकीचा अक्षरशः चेंदामेंदा झाला. अपघातानंतर अज्ञात वाहन चालक पसार झाला.

अपघातामुळे वाहतूक ठप्प

माळी भवनापासून काही अंतरावर उड्डापणपुलावर रविवारी (20 जून) रात्री सव्वा नऊ वाजेच्या सुमारास अपघात झाल्यानंतर वाहतूक ठप्प झाली. बाजारपेठचे निरीक्षक दिलीप भागवत, सहा, आदींनी घटनास्थळी धाव घेत वाहतूक सुरळीत केली (two bikers death in accident at Bhusawal).

हेही वाचा : तुमच्या गल्लीत गुंडांची दादागिरी? घाबरु नका, नाव गुप्त ठेवू, बिनधास्त तक्रार करा, नागपूर पोलिसांची ग्वाही

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.