ठाकरे गट राष्ट्रवादीत कधी विलीन होणार?, संजय राऊत यांना किती कोटींची ऑफर ?; नितेश राणे यांचे धक्कादायक दावे

उद्धव ठाकरे आपला गट राष्ट्रवादीत विलीन करणार असल्याचा धक्कादायक दावा भाजप आमदार नितेश राणे यांनी केला आहे. तसेच राष्ट्रवादीत ठाकरे गट विलीन करण्यासाठी संजय राऊत यांना ऑफर असल्याचा दावाही त्यांनी केला आहे.

ठाकरे गट राष्ट्रवादीत कधी विलीन होणार?, संजय राऊत यांना किती कोटींची ऑफर ?; नितेश राणे यांचे धक्कादायक दावे
nitesh rane Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: May 31, 2023 | 12:13 PM

सिंधुदुर्ग : येत्या 19 जूनला उद्धव ठाकरे आपला पक्ष राष्ट्रवादीत विलीन करण्याची घोषणा करणार आहे. महाविकास आघाडी स्थापन होत असताना संजय राऊतांनी दलाली करण्यासाठी तेव्हा 200 कोटी घेतले होते अशी माझी माहिती आहे. तसेच उद्धव ठाकरे गट राष्ट्रवादीत विलीन करण्यासाठी राऊतांना 100 कोटींची ऑफर आहे, असा दावा भाजप आमदार नितेश राणे यांनी केला आहे. तसेच, 19 जूनला उद्धव ठाकरे यांना शिवसेनेचा वर्धापन दिन साजरा करण्याचा अधिकार नाही. शिवसेना एकनाथ शिंदेंकडे आहे. 19 जूनला होणारा उद्धव ठाकरेंचा षण्मुखानंदमधला मेळावा अनाअधिकृत आहे, असा दावाही नितेश राणे यांनी केला आहे. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.

उद्धव ठाकरेंचा टिनपाट कामगार आज सकाळी येऊन मोदी सरकारमुळे नाकी नऊ आलेले आहे, अराजकता आली आहे असं बरळला. पंतप्रधान नरेंद्र मोदींमुळे दहशतवादांच्या नाकीनऊ आले आहेत. भ्रष्टाचारी लोकांच्या नाकीनऊ आले आहे. मोदींच्या नेतृत्वात 9 वर्षात देशाने प्रगती केली आहे. कोणीही आपल्या देशाकडे वाकड्या नजरेने पाहत नाही. हे राऊत यांच्या सारख्या दलालांना कळणार नाही, अशी टीका नितेश राणे यांनी केली. म्हणे मोदी साहेब लोकांची मन की बात ऐकत नाही, पत्रकार परिषदा घेत नाही. मग तुझ्या मालकाने अडीच वर्षात फक्त फेसबुक लाईव्ह केलं. अडीच वर्षात किती लोकांची मन की बात ऐकली? की फक्त पाटणकरचीच बात ऐकली, असा सवाल नितेश यांनी केला.

हे सुद्धा वाचा

लंडनच्या शेठजीचं नाव जाहीर करू का?

तुमच्या मालकाने पाटणकरच्या दावणीला महाराष्ट्र बांधला होता त्यावर बोला. तुमच्या मालकाचा मुलगा रोज संध्याकाळी 7.30 नंतर डिनो मोरियाच्या घरी कोणा कोणाला नाचवायचा? तुमच्या मालकाकडे स्वतःचा झेंडा राहिला नाही. झेंड्याची काठी पण राहिली नाही आणि तुम्ही भाजपच्या झेंड्याबद्दल बोलता? मुंबईत मराठी माणूस राहिला नाही हे तुमच्या मालकामुळे घडलंय. आणि आता शेठजींबद्दल बोलताय? कपडे घ्यायला, शॉपिंग करायला शेठजी चालतात. लंडनचा खर्च करणाऱ्या शेठजीचे नाव जाहीर करू का?, असा इशारा त्यांनी दिला.

सतेज पाटील यांना प्रत्युत्तर

उद्धव ठाकरेंच्या माध्यमातून राज्यात दंगली घडवण्याचे षडयंत्र आहे. याची माहिती सतेज पाटलांना मातोश्रीतून मिळाली असेल म्हणून ते कोल्हापुरात दंगली होण्याचा अंदाज व्यक्त करीत आहेत, अशा शब्दात नितेश यांनी सतेज पाटील यांना प्रत्युत्तर दिलं.

दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?.
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?.
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर...
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर....
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.