महाड शहराच्या स्वच्छतेसाठी तातडीचा 50 लाखांचा निधी, 2 दिवसांत वितरण होणार, एकनाथ शिंदे यांची घोषणा

महाड शहराची स्वच्छता करण्यासाठी 50 लाख रुपयांचा निधी देण्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले.

महाड शहराच्या स्वच्छतेसाठी तातडीचा 50 लाखांचा निधी, 2 दिवसांत वितरण होणार, एकनाथ शिंदे यांची घोषणा
EKNATH SHINDE
Follow us
| Updated on: Jul 24, 2021 | 10:45 PM

रायगड :  महाड शहराची स्वच्छता करण्यासाठी 50 लाख रुपयांचा निधी देण्याचे नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी जाहीर केले. हा निधी पुढील दोन दिवसात वितरित करण्याबाबत त्यांनी जिल्ह्या प्रशासनाला आशवस्त केले. महाड शहरात झालेल्या प्रलयंकारी पावसानंतर संपूर्ण शहराचे अतोनात नुकसान झाले आहे. या शहराला पुन्हा सावरण्यासाठी शिंदे यांनी शहरातील मदत केंद्राला भेट देऊन तातडीने आढावा बैठक घेतली. (Urban Development Minister Eknath Shinde has announced a fund of Rs 50 lakh for cleaning Mahad city maharashtra)

शहर स्वच्छ करण्यासाठी सामान खरेदी करावे

या बैठकीत शहराची स्वच्छता करून रोगराईपासून बचाव व्हावा म्हणून प्रयत्न केले जाणार आहेत. निधी मंजूर करण्यासोबतच शहर स्वच्छ करण्यासाठी लागणारी डीडीटी पावडर, डीटर्जंट आणि जंतूंनाशक खरेदी करावे, शहर स्वच्छ करण्यासाठी फायर ब्रिगेडची वाहने, शहरात घरे दुकाने याबाहेर साचलेला कचरा उचलण्यासाठी डंपर, जेसीबी भाडेतत्त्वावर घ्यावे, असे एकनाथ शिंदे यांनी सांगितले. तसेच शहरात जागोजागी अडकलेली वाहने काढण्यासाठी हायड्रो क्रेन घ्याव्या असेदेखील त्यांनी निर्देशित केले. महाड शहरातील घरे, दुकाने यांना सावरण्यासाठी तातडीने शहरातील नुकसानीचे पंचनामे पूर्ण करून मदत म्हणून घरटी 5 हजार रुपये तातडीने देण्याचे आदेशही त्यांनी प्रशासनला दिले.

वैद्यकीय पथकाचा कॅम्प रविवारपासून शहरात कॅम्प

शहरातील पुलाचे पाणी 20 फुटापर्यंत वाढल्याने संपूर्ण शहर पाण्याने वेढले गेले होते. त्यामुळे आता शहर स्वच्छ करण्याचे मोठे आव्हान प्रशासनासमोर आहे. त्यामुळे या कामासाठी वेगवेगळ्या नगरपालिकांचे कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. याशिवाय ठाणे महानगरपालिकेने मदत म्हणून ड्रेनेज स्वच्छ करणारे टँकर्स महाडला पाठवले आहेत. शहरातील गरजेपुरती विजेची गरज पूर्ण करण्यासाठी पुणे महानगरपालिकेने तीन जनरेटर्स पाठवले आहेत. हे जनरेटर्सदेखील आजच स्थानिक प्रशासनाला सुपूर्त करण्यात आले.

तसेच शिवसेना वैद्यकीय मदत कशाच्या माध्यमातून वैद्यकीय पथकाचा कॅम्प शहरात उद्यापासून सुरू केला जाणार असून त्या माध्यमातून लोकांची तातडीने तपासणी करण्यात येईल असेही शिंदे यांनी स्पष्ट केले. रोगराईचा शिरकाव होण्यापूर्वी लवकरात लवकर हे शहर स्वच्छ करण्यास प्राथमिकता असल्याने उद्यापासून स्वच्छता मोहीम हाती घेऊन चार दिवसात महाड शहर पूर्णपणे स्वच्छ करावे असेही त्यांनी स्थानिक प्रशासनाला निर्देशित केलेले आहे.

महाडमधील बाधित गावांचे पुनर्वसन आणि पुलांच्या पुनर्बांधणीला प्राधान्य

महाड पोलादपूर येथे झालेल्या पावसामुळे इथे अनेक ठिकाणी दरडी कोसळल्या आहेत. शहराप्रमाणे आजूबाजूची 30 गावेही बाधित झालेली आहेत. त्यांना दिलासा देण्याचाही सरकार प्रयत्न करेल. तसेच महाड आणि आजूबाजूच्या गावातील वाहून गेलेल्या पुलाच्या पुनर्बांधणीसाठी लवकरच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत बैठक घेऊन नक्की जास्तीत जास्त निधी उपलब्ध करून देऊ असेही शिंदे यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केले.

इतर बातम्या :

Kokan Flood and Landslide : उद्धव ठाकरे, नारायण राणे, देवेंद्र फडणवीस एकाच दिवशी चिपळूणमध्ये

VIDEO : लाखो दिल की धडकन असलेली ‘ऑडी’, पार्किंगमध्ये उभी असताना अचानक कशी पेटली?

Breaking : लिफ्ट कोसळून 4 जणांचा मृत्यू, वरळीच्या हनुमान गल्लीतील धक्कादायक घटना

(Urban Development Minister Eknath Shinde has announced a fund of Rs 50 lakh for cleaning Mahad city maharashtra)

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.