गौतमी पाटील हिने आडनाव बदलावं काय? गौतमी हिच्या गावातील लोकांना काय वाटतं?; गावकरी म्हणतात…

गौतमी पाटील यांना ज्यांनी विरोध केला आहे ते कोणत्या संघटनेचे आहेत? आहे कुठल्या पक्षाचा पदाधिकारी आहे? विरोध करणाऱ्यांचं समाधानासाठी काय योगदान आहे? गौतमी पाटील यांना विरोध करणं हे चुकीचं आहे.

गौतमी पाटील हिने आडनाव बदलावं काय? गौतमी हिच्या गावातील लोकांना काय वाटतं?; गावकरी म्हणतात...
Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: May 28, 2023 | 6:59 AM

धुळे : प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटील हिच्या पाटील आडनावावरून वाद निर्माण झाला आहे. काही मराठा संघटनांनी गौतमीला पाटील आडनाव वापरण्यास मनाई केली आहे. गौतमीने पाटील आडनाव वापरल्यास तिचे कार्यक्रम बंद पाडू असा इशारा देण्यात आला आहे. तर इतर मराठा संघटनांनी गौतमीला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे गौतमीच्या आडनावाच्या मुद्द्यावरून मराठा संघटनांमध्येच फूट पडली आहे. मात्र, गौतमी पाटील हिच्या गावातील लोकांना काहीच औरच वाटत आहे. गौतमीच्या गावातील लोकांनी पुढे येऊन पहिल्यांदाच या प्रकरणावर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा या गावात गौतमी पाटील लहानाची मोठी झाली आहे. याच गावात तिचं बालपण गेलं. शिक्षण झालं. इथूनच नृत्यांगना म्हणून तिच्या करिअरची सुरुवात झाली. या गावात सध्या गौतमीचे मामा राहतात. पण तेही सध्या पुण्याला स्थायिक झाले आहेत. त्यामुळे त्यांच्या घराला कुलूप लावण्यात आलेले आहेत. गौतमीच्या गावातील लोकांनी तिच्या आडनाववरून संमिश्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. मात्र, तिच्या शेजाऱ्यांना तिचं कौतुक वाटतं. ते गौतमीच्या कलेची कदर करत तिला दादही देत आहेत.

हे सुद्धा वाचा

कला जातीशी जोडू नका

गौतमी पाटील ही पाटीलच आहे, काही लोकांना तिचे मोठे होणे आवडत नाही म्हणून विरोध केला जात असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. पाटील आडनाव लावण्याबाबत अनेकांचे सडतोड उत्तर आहे. कला आणि जात ही स्वतंत्र आहे. जातीशी कलेला जोडू नये, असे स्थानिकांचे मत आहे. एक प्रकारे गौतमीच्या गावातील लोकांनी तिला साथच दिली आहे. त्यामुळे गौतमीचं बळ वाढलं आहे. तर गौतमीने या आधी या वादात आपल्याला पडायचेच नसल्याचं म्हटलं आहे. लोक मला काहीही म्हणत असल्याचं गौतमीचं म्हणणं आहे.

गौतमी बेटी नाही का?

जळगाव जिल्ह्यातील पाटील सेवा संघानेही गौतमी पाटील हिला पाठिंबा दिला आहे. जळगावात गौतमीचा कार्यक्रम झाला तर पाटील सेवा संघ कार्यक्रमाला उपस्थित राहील. आम्ही आमच्या मुलाबाळांसह कार्यक्रमाला हजर राहू, अशी घोषणा सेवा संघाने केली आहे. गौतमी पाटील हिच्या आडनावाला पुण्यात विरोध झाल तर जळगावत मराठा सेवा संघाच्या पदाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक घेऊन गौतमीला पाठिंबा दिला आहे. केंद्र सरकारने ज्या प्रकारे बेटी बचाव, बेटी पढावची घोषणा केली आहे. गौतमी पाटील ही बेटी नाही का? असा सवाल समाजाच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे.

विरोध करणाऱ्यांचं योगदान काय?

गौतमी पाटील यांना ज्यांनी विरोध केला आहे ते कोणत्या संघटनेचे आहेत? आहे कुठल्या पक्षाचा पदाधिकारी आहे? विरोध करणाऱ्यांचं समाधानासाठी काय योगदान आहे? गौतमी पाटील यांना विरोध करणं हे चुकीचं आहे. गौतमीला संपूर्ण बहुजन समाजाचा पाठिंबा आहे. बहुजन समाज तिच्या पाठीशी उभा राहील. पाटील हे मराठा समाजाचं आडनाव नाही. ओबीसी. गुजर. ब्राह्मण. राजपूत या सर्व समाजात हे आडनाव मिळतं. त्यामुळे गौतमी पाटील नाव असल्याने बदनामी होते असे नाही, असंही सेवा संघाचं म्हणणं आहे.

फक्त शरद पवार नव्हे तर ठाकरे गटालाही अजित पवारांचा धक्का ?
फक्त शरद पवार नव्हे तर ठाकरे गटालाही अजित पवारांचा धक्का ?.
ईस्टर्न एक्सप्रेस फ्रीवे वर वाहतूक कोंडी, मुंबईकर हैराण
ईस्टर्न एक्सप्रेस फ्रीवे वर वाहतूक कोंडी, मुंबईकर हैराण.
गृहमंत्रीपदावरून राज्याचं सरकार अधांतरी लटकतंय, हे कसलं मजबूत सरकार ?
गृहमंत्रीपदावरून राज्याचं सरकार अधांतरी लटकतंय, हे कसलं मजबूत सरकार ?.
राज कुंद्राला समन्स, आज ईडीसमोर हजेरी
राज कुंद्राला समन्स, आज ईडीसमोर हजेरी.
'शिंदेंची प्रकृती नाजूक, त्यांना मांत्रिकाची गरज अन्..', राऊतांचा टोला
'शिंदेंची प्रकृती नाजूक, त्यांना मांत्रिकाची गरज अन्..', राऊतांचा टोला.
काठावर पास होणाऱ्या मुलानं बोलणं योग्य नाही, शिरसाट यांचा कोणाला टोला?
काठावर पास होणाऱ्या मुलानं बोलणं योग्य नाही, शिरसाट यांचा कोणाला टोला?.
शिंदे अचानक दरेगावला, विरोधकांच्या टीकेवर म्हणाले, 'असा कोणता नियम...'
शिंदे अचानक दरेगावला, विरोधकांच्या टीकेवर म्हणाले, 'असा कोणता नियम...'.
विधानसभेच्या पराभवानंतर मनसे नेत्याचा राजीनामा, राज यांना पाठवलं पत्र
विधानसभेच्या पराभवानंतर मनसे नेत्याचा राजीनामा, राज यांना पाठवलं पत्र.
येत्या 5 डिसेंबरला फडणवीस सरकारच्या शपथविधीला मोदींसह कोण-कोण येणार?
येत्या 5 डिसेंबरला फडणवीस सरकारच्या शपथविधीला मोदींसह कोण-कोण येणार?.
एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला मिळणार 'ही' ९ मंत्रिपदं, गृहखातं असणार?
एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला मिळणार 'ही' ९ मंत्रिपदं, गृहखातं असणार?.