भाड्यासाठी तगादा लावल्यामुळे हॉटेल व्यावसायिकाची आत्महत्या, गळफास घेत स्वत:ला संपवलं
मालकाने भाड्यासाठी वारंवार तगादा लावल्यामुळे एका हॉटेल व्यावसायिकाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना विरारमध्ये घडली.
पालघर : मालकाने भाड्यासाठी वारंवार तगादा लावल्यामुळे एका हॉटेल व्यावसायिकाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना विरारमध्ये घडली. आत्महत्या करण्याचे कारण हे भाड्यासाठी तगादा लावणे हेच असल्याचा प्राथमिक अंदाज बांधला जातोय. करुणाकरण पुत्रण(Karunakaran Putraan, वय 48) असे आत्महत्या केलेल्या व्यावसायिकांचे नाव असून, पुत्रण यांना दोन लहान मुलं आहेत. या घटनेमुळे विरार परिसरात खळबळ उडाली आहे. गळफास घेत पुत्रण यांनी स्वत:ला संपवलं आहे. (Virar hotelier committed suicide by hanging himself due to rent)
पुत्रण यांना हॉटेल व्यवसायात म्हणावा तेवढा फायदा झाला नाही
मिळालेल्या माहितीनुसार विरार पश्चिमेकडील वायके नगर परिसरात स्टार प्लॅनेट नावाचे एक हॉटेल आहे. हे हॉटेल करुणाकरण पुत्रण मागील काही दिवसांपासून चालवत होते. मात्र, यापूर्वी लागू करण्यात आलेला लॉकडाऊन आणि सध्याचे निर्बंध यामुळे पुत्रण यांना हॉटेल व्यवसायात म्हणावा तेवढा फायदा झाला नाही. ग्राहकच नसल्यामुळे पैसे मिळाले नाहीत. परिणामी हॉटेलचे भाडे थकले.
पैशांसाठी त्रास दिल्यामुळे आत्महत्या केल्याची चर्चा
मात्र, दुसरीकडे हॉटेलच्या मालकाने या काळात भाडे वाढवले. तसेच थकित असलेल्या भाड्यासाठी तगादा लावला. पैशांसाठी वारंवार त्रास दिल्यामुळे शेवटी पुत्रण यांनी स्वत:ला संपवण्याचा निर्णय घेतला. शेवटी त्यांनी गळफास घेत आत्महत्या केली.
पुण्यात शिक्षकाची आत्महत्या
दरम्यान, फेसबुकवर ‘बाय बाय डिप्रेशन’ असा मेसेज लिहून (Suicide Note) पुण्यातील शिक्षकाने 14 जुलै रोजी विहिरीत उडी मारुन आत्महत्या केली. सासवडजवळील भिवरी गावातील एका शेतातील विहिरीत उडी मारुन त्यांनी आत्महत्या केली. प्रफुल दादाजी मेश्राम Praful Meshram (वय 45) असं आत्महत्या केलेल्या शिक्षकाचे नाव आहे.
प्रफुल्ल दादाजी मेश्राम हे कमिन्स महाविद्यालयात (Commins College Pune) नोकरी करत होते. गेल्या काही दिवसांपासून ते मानसिक तणावाखाली होते. एका आजारातून ते नुकतेच बाहेर पडले होते. गेले काही दिवस ते कुणाशीही बोलत नव्हते, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे
विशेष बातम्या
Video | भोजपुरी गाण्यावर काकूंचा ‘धमाका डान्स’; हातवारे, चेहऱ्यावरील हावभाव एकदा पाहाच !
(Virar hotelier committed suicide by hanging himself due to rent)