VIDEO: नगरपरिषदेत शिवसेनेचा धुव्वा उडणार, बढाया मारत नाही; नारायण राणेंनी शिवसेनेला डिवचले
जिल्ह्यातील चारही नगरपरिषदा आमच्या ताब्यात आहेत. त्या आमच्याकडेच राहणार आहेत. या नगरपरिषदांच्या निवडणुकीत शिवसेनेचा धुव्वा उडणार आहे.
वेंगुर्ला: जिल्ह्यातील चारही नगरपरिषदा आमच्या ताब्यात आहेत. त्या आमच्याकडेच राहणार आहेत. या नगरपरिषदांच्या निवडणुकीत शिवसेनेचा धुव्वा उडणार आहे. त्यामुळे आम्ही बढाया मारत नाही. आमची ताकद असून आम्ही चारही नगरपरिषदा जिंकूच, अशा शब्दात केंद्रीय सुक्ष्म, लघु आणि मध्यम विकास मंत्री नारायण राणे यांनी शिवसेनेला डिवचले.
वेंगुर्ला नगरपरिषदेने आयोजित केलेल्या कार्यक्रमानंतर ते मीडियाशी बोलत होते. जिल्ह्यातील चारही नगरपरिषदा आमच्या ताब्यात आहेत. त्यांनी यावं आणि नगरपरिषदा घेऊन जाव्या असं व्हायला आम्ही काही डोळे मिटून आहोत का?. शिवसेनेची ताकद काय आहे? चारही नगरपरिषदा आमच्या आहेत. आमच्याकडेच राहणार आहेत. या निवडणुकीत शिवसेनेचा धुव्वा उडणार. त्यामुळे आम्ही बढाया मारत नाही. आमची ताकद आहे. चारही नगरपरिषदा आम्ही आमच्या ताब्यात येऊ द्या. या सरकारने जिल्हा परिषद आणि नगरपरिषदांना पैसे कुठे दिले? एवढं नुकसान झालं. पण पाच पैसे दिले नाही. मग मतदारांनी यांना निवडून का द्यावं, असा सवाल त्यांनी केला.
यावेळी झालेल्या कार्यक्रमातही त्यांनी भाषण केलं. आमचे मित्र दिपक केसरकर ऑनलाईन दिसले आता. पण ते असल्या चांगल्या कार्यक्रमात येत नाहीत, असा टोला लगावतनाच आम्ही विकासाच्या कामात राजकारण पाहत नाही, असं ते म्हणाले.
विमानतळाशी तुमचा काय संबंध?
माझा देश भर दौरा सुरू आहे. मात्र अशी इमारत पाहिली नाही. याचं कौतूक व्हायला पाहिजे. चांगल्याला चांगल म्हटलं पाहिजे. आम्ही काम आणि कार्याचं नेहमी कौतुक करतो. मी मुंबईतून सिंधुदुर्गात आल्या नंतर या जिल्ह्यात भयावह परिस्थिती होती. शिक्षण क्षेत्राची तर दयनीय अवस्था होती. निवडून आलो तेव्हाच ठरवलं जिल्ह्याचा विकास करायचा. विमानतळ, चौपदरीकरण आदी कामं मी केली. तुमचा काय संबंध होता? कधी होता तुम्ही? आम्ही भूमिपूजन केलं. त्यालाही यांनी विरोध केला. आता विमानतळ तयार झाल्यावर म्हणतात आम्हीच केलं, असा हल्लाही त्यांनी चढवला.
मोदीं एवढं कुणी काम करतं का?
देश आत्मनिर्भर होण्यासाठी काम करा, असं मला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सांगितलं. मी त्यांना येस सर म्हणून सांगितलं. देशातील जनतेसाठी मोदी 18-18 तास काम करतात. कोणता नेता एवढे काम करतो का? असा सवालही त्यांनी केला.
VIDEO : 4 मिनिटे 24 हेडलाईन्स | 19 December 2021#FastNews #News #Headlinehttps://t.co/PXbmIaoSCq pic.twitter.com/gY6mVehqZ8
— TV9 Marathi (@TV9Marathi) December 19, 2021
संबंधित बातम्या:
मोदी सरकारवर आरएसएसचा रिमोट कंट्रोल आहे का?; मोहन भागवतांनी सांगितली ‘मन की बात’