Nanded murder : 31 डिसेंबरची पार्टी त्याच्यासाठी शेवटची ठरली, मित्रांनी गच्चीतून फेकलं

नववर्षाच्या स्वागताच्या पार्टीत गच्चीवरून फेकून देऊन एका युवकाची हत्या झाल्याची घटना नांदेडमध्ये घडलीय. पोलिसांनी याप्रकरणी चार जणांना ताब्यात घेतले आहे.

Nanded murder : 31 डिसेंबरची पार्टी त्याच्यासाठी शेवटची ठरली, मित्रांनी गच्चीतून फेकलं
Follow us
| Updated on: Jan 01, 2022 | 5:22 PM

नांदेड : 31 डिसेंबरला सगळीकडे पार्ट्यांचा सपाटा असतो. सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी अनेकजण एकत्र येतात, अशावेळी मित्रांच्या दारु पार्ट्याही चर्चेत असतात. मात्र अशाच एका पार्टीवेळी नांदेडमध्ये एक धक्कादायक प्रकार घडलाय एका तरुणाला या पार्टीत आपला जीव गमवावा लागल्याने नांदेडमध्ये सध्या खळबळ उडाली आहे. कारण नववर्षाच्या स्वागताच्या पार्टीत गच्चीवरून फेकून देऊन एका युवकाची हत्या झाल्याची घटना नांदेडमध्ये घडलीय.

चार आरोपी पोलिसांच्या ताब्यात

नांदेड शहरातील मालेगांव रोडवरील गजानन मंदिराजवळची ही घटना आहे. संतोष हळदेकर हा तरुण मित्रांसोबत बिल्डिंगच्या छतावर पार्टी करत बसला होता, यावेळी वादावादीतून चार आरोपींनी संतोषला मारहाण करत छतावरून खाली फेकले, त्यात संतोषचा हळदेकरचा जागीच मृत्यू झालाय. भाग्यनगर पोलिसांनी गुन्हा दाखल करत चार आरोपीना ताब्यात घेतलंय, या घटनेमुळे नांदेडमध्ये खळबळ उडालीय. 31 डिसेंबरची रात्र संतोषसाठी काळरात्र ठरली आहे आणि ही पार्टी त्याच्यासाठी शेवटची ठरली आहे. दारुच्या नशेत आणि रागाच्या भरात अनेकदा अनुचित प्रकार घडतात, नांदेडमध्येही तेच झालंय.

घटनेने नांदेडमध्ये खळबळ

नववर्षाच्या तोंडवर ही घटना घडल्याने नांदेडमध्ये सध्या खळबळ पसरली आहे. या घटनेने संतोषच्य कुटुंबियांनाही मोठा धक्का बसला आहे. राज्यात ओमिक्रॉन आणि कोरोनाचा फैलाव पुन्हा वाढल्याने लोकांच्या जावाचा धोका लक्षात घेऊन राज्य सरकाने 31 डिसेंबरच्या पार्ट्यांवर आणि सेलिब्रेशनवर काही निर्बंध घातले होते. मात्र तरीही असा प्रकार घडल्याने परिसरात शोकाकूल वातावरण आहे. नांदेडमधील भाग्यनगर पोलीस या घटनेची अधिक चौकशी करत आहेत.

Corona Third Wave | ‘तेव्हा ऑटोमॅटिक लॉकडाऊन लागणार!’ आरोग्यमंत्री राजेश टोपेंचं महत्त्वाचं आणि मोठं विधान

Ravi Shastri| ‘चालू दे तुमचं’, रवी शास्त्रींनी सांगितला पंत-गिल बरोबरचा शौचालयातला ‘तो’ किस्सा

Kharif Season : खरिपातील या दोन पिकांच्या दरावरच शेतकऱ्यांचे अर्थकारण..!

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.