रात्री अचानक तब्येत बिघडली, कर्जाचा डोंगर उभा करुन आईला मृत्यूच्या दारातून वाचवलं, डोळ्यांमधून पाणी आणणारी कहाणी

आजच्या मदर डेच्या निमित्ताने अशात एका मुलाची कहाणी आम्ही सांगणार आहोत ज्या मुलाने आपल्या आईला मृत्यूच्या दारातून सुखरुप बाहेर काढलं (Youth save his corona positive mother life in Nandurbar).

रात्री अचानक तब्येत बिघडली, कर्जाचा डोंगर उभा करुन आईला मृत्यूच्या दारातून वाचवलं, डोळ्यांमधून पाणी आणणारी कहाणी
सलाम ! मृत्यूच्या दारातून आईला वाचवलं, डोळ्यांमधून पाणी आणणारी कहाणी
Follow us
| Updated on: May 09, 2021 | 7:03 PM

नंदुरबार : जगभरात आज ‘मदर्स डे‘ साजरा केला जातोय. आईचं आपल्या आयुष्यातील स्थान दुसरं कोणीही घेऊ शकत नाही. आई आपल्या लेकरासाठी स्वत:चा जीवही संकटात टाकू शकते. तिची माया, तिचं प्रेम कुठेही मिळणार नाही. त्यामुळे आपण ‘स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी’ असं आपण म्हणतो. या आईच्या उतारवयात तिला आपल्या आधाराची खूप गरज असते. तिचे ऋृण फेडण्याची तिच एक संधी असते. आजच्या मदर डेच्या निमित्ताने अशात एका मुलाची कहाणी आम्ही सांगणार आहोत ज्या मुलाने आपल्या आईला मृत्यूच्या दारातून सुखरुप बाहेर काढलं (Youth save his corona positive mother life in Nandurbar).

नेमकं काय घडलं?

नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर शहरातील नव्या महादेव गल्लीत पाटील कुटुंब वास्तव्यास आहे. कुटुंबातील मीनाबाई राजेंद्र पाटील (वय-54 वर्ष) यांची रात्री अचानक प्रकृती बिघडली. त्यांना श्वास घेण्यास अडचण येऊ लागली. त्यांना तातडीने नवापूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, रुग्णालयात फक्त तीन तास पुरेल इतकाच ऑक्सिजनचा साठा शिल्लक होता. डॉक्टरांनी आधी मीनाबाई यांची ऑक्सिजन लेव्हल तपासली. तेव्हा ऑक्सिजनती लेव्हल 70 होती. त्यामुळे डॉक्टरांनी त्यांचा मुलगा निलेश पाटील यांना तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल करण्याचा सल्ला दिला (Youth save his corona positive mother life in Nandurbar).

आधी नवापूरमधील खासगी रुग्णालयात दाखल केलं

नंदुरबारमधील सर्व सरकारी आणि खाजगी रूग्णालये हाऊसफुल होती. निलेश यांच्यासह त्यांच्या कुटुंबियांना काय करावे ते सुचत नव्हते. त्यांनी आधी ऑक्सिजनयुक्त रूग्णवहिकेचा शोध घेतला. रूग्णवाहिका मिळाली पण ऑक्सिजन मिळालं नाही. त्यांनी अजिबात वेळ न दडवता आईला नवापूर शहरातील खाजगी रुग्णालयात दाखल केलं. डॉक्टरांनी रूग्णाची परिस्थिती नाजूक असल्याचं सांगत तातडीने गुजरातला घेऊन जाण्याचा सल्ला दिला.

मित्राकडून ऑक्सिजन सिलेंडरची व्यवस्था

रात्रीचे अकरा वाजले होते. निलेश यांच्या संजय पाटील नावाच्या मित्राने ऑक्सिजन सिलेंडरची व्यवस्था केली. त्यानंतर निलेश पाटील आपल्या आईला घेऊन बारडोली येथील खाजगी रुग्णालयात गेले. त्यांच्यासोबत काका महेंद्र पाटील हे देखील होते. यादरम्यान ते देखील कोरोना पॉझिटिव्ह आले. त्यानंतर एकट्या निलेश यांच्यावर जबाबदार पडली.

आईच्या फुफ्फुसात 70 टक्के इन्फेक्शन

निलेश यांनी आईचा सिटीस्कॅन केला. त्यामध्ये आईच्या फुफ्फुसात 70 टक्के इन्फेक्शन झाल्याची माहिती समोर आली. डॉक्टरांनी 12 तासाची मुदत दिली होती. उपचारासाठी लाखो रूपयांचा खर्च येणार होता. मुलाने खर्चाची परवा न करता लाखो रुपये व्याजाने घेतले. त्यामुळे आईवर उपचार सुरू झाला. आईवर आठ दिवस उपचार सुरू राहिला. बिल साडेतीन लाख रूपये आले. आईच्या प्रकृतीत थोडा सुधार झाला. पण ऑक्सिजन काही दिवस ठेवावा लागेल, असे सांगून घरी सोडण्यात आले. ऑक्सिजन दररोज लागणार होता. निलेश यांनी ऑक्सिजन मशीन घरी आणले. यासाठी दररोज दोन हजार रूपये खर्च येत होता. निलेश यांनी पैशांची पर्वा न करता आईवर इलाज सुरू ठेवला.

आईला मरणाच्या दारातून सुखरूप घरी आणले

एकीकडे आई बरी होत होती. दुसरीकडे पैशांचा बोजा वाढत होता. पाटील कुटुंबाची आर्थिक परिस्थिती नाजूक होती. वडीलाचे छत्र हरपलेले, घरात गतीमंद भाऊ, पत्नी, एक लहान मुलगा संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी एकट्यावर होती. दिवसाला 300 रुपये कमावणारा निलेश राजेंद्र पाटील या युवकाने डोक्यावर कर्जाचा डोंगर चढवत कोरोनाबाधित आईला मरणाच्या दारातून सुखरूप घरी आणले.

अनेकजण कोरोनाच्या आजाराला आणि लागणाऱ्या पैशांना घाबरतात, बऱ्याचदा शेवटी हाती केवळ मृत्यू येतो. पण निलेश पाटील या तरुणाने अगदी संयमाने परिस्थिती सांभाळून आईला मरणाच्या दारातून सुखरूप घरी आणले. हे नक्कीच कौतुकास्पद आहे. आर्थिक परिस्थिती नसली तरी आईच्या प्रेमापोटी त्याने आपल्या आईला कोरोनावर मात करीत बरे केले. सकारात्मकता आणि प्रबळ इच्छाशक्ती असली तर कोरोनासारख्या आजारावरही सहजपणे मात करता येते याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे मीना पाटील. आपली मिळकत तुटपुंजी असली तरी आईला मानसिक आधार देत थेट मृत्यूच्या दारातून आपल्या आईला सुखरूप परत आणले, त्या निलेश पाटीलला आणि त्याच्या दुर्दम्य इच्छाशक्तीला सलाम !

हेही वाचा : नागपुरातील प्रत्येक ऑक्सिजन टँकरसोबत आता पोलीस! गडकरींची माहिती, मुंबई महापालिका आयुक्तांचंही कौतुक

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.