राज्यात ऑनर किलिंग, खोट्या प्रतिष्ठेपायी भावी डॉक्टर मुलीची केली हत्या

जन्मदात्या बापाने २३ वर्षीय मुलीची हत्या केली आहे. हत्या करुन मुलीचा मृतदेह जाळून टाकला. मृतदेहाची राख ओढ्यात फेकून दिली. माणूसकीला काळीमा फासणारा हा प्रकार कुटुंबियांनीच केल्यामुळे नांदेड हादरले आहे.

राज्यात ऑनर किलिंग, खोट्या प्रतिष्ठेपायी भावी डॉक्टर मुलीची केली हत्या
Image Credit source: Google
Follow us
| Updated on: Jan 27, 2023 | 3:12 PM

नांदेड : नांदेडमध्ये (Nanded News) ऑनर किलिंगचा (owner killing) धक्कादायक प्रकार समोर आलाय. जन्मदात्या बापाने २३ वर्षीय मुलीची हत्या केली आहे. हत्या करुन मुलीचा मृतदेह जाळून टाकला. मृतदेहाची राख ओढ्यात फेकून दिली. माणूसकीला काळीमा फासणारा हा प्रकार कुटुंबियांनीच केल्यामुळे नांदेड हादरले आहे. नांदेड जिल्ह्यातील लिंबगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पिंपरी माहिपाल येथे हा प्रकार झाला.

२३ वर्षीय शुभांगी जोगदंड ही BHMS च्या तिसऱ्या वर्षांत शिकत होती. तिचे गावातील एका तरुणासोबत प्रेम होते. परंतु कुटुंबियांनी हे मान्य नव्हते. त्यामुळे तीन महिन्यांपूर्वी तिची सोयरिक दुसरीकडे करुन दिली होती. मुलीने ही सोयरिकी आठ दिवसांत मोडली. यामुळे आपली गावात बदनामी झाली, या कारणामुळे कुटुंबियांनी रविवारी रात्री तिची हत्या केली. हत्येनंतर तिचा मृतदेह शेतात जाळून टाकला. मृतदेहाची राख बाजूच्या ओढ्यात टाकून दिली.

असा उघड झाला प्रकार

हे सुद्धा वाचा

तीन दिवसांपासून मुलगी गावात दिसत नव्हती. यामुळे यासंदर्भात गावातील काही नागरिकांनी माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली. तेव्हा ऑनर किलिंगचा प्रकार उघड झाला.

पाच जणांना अटक

पोलिसांनी तपासानंतर मुलीचे वडील, मामा, भाऊ आणि काकांची दोन मुलं अशा पाच जणांना अटक केलीय. या प्रकरणी अधिकचा तपास सुरु असल्याची माहिती पोलीस निरीक्षक चंद्रकांत पवार यांनी टीव्ही ९ ला दिली.

नांदेडमध्ये शुभांगी जोगदंड या तरुणीची वडील आणि भावांनी मिळून हत्या केली होती. हत्येनंतर गावाच्या दूर असलेल्या स्वतःच्या शेतात शुभागींचा मृतदेह आणून जाळण्याचा देखील प्रयत्न केला. या घटनास्थळाचा पोलिसांनी पंचनामा केला असून इथून काही पुरावा मिळतात का? ते तपासल्या जात आहे.

डिसेंबरमध्ये मराठवाड्यात ऑनर किलिंग

महिन्याभरात ऑनर किलिंगची ही मराठवाड्यातील दुसरी घटना आहे. औरंगाबाद जिल्ह्यात २९ डिसेंबर रोजी ऑनर किलिंग झाले होते. तीन वर्षापूर्वी बहिणीला पळवून नेणाऱ्या तरुणाची भर हत्या केली होती. त्यानंतर मृतदेहाजवळ जल्लोष देखील केला. या भयंकर घटनेने औरंगाबाद जिल्हा हादरला आहे. बापू खिल्लारे (वय ३० वर्षे) असे मृत तरुणाचा नाव होते.

ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...