AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

गोपीनाथ मुंडेंच्या फोटोकडे पाहून पंकजा म्हणातात, “मी राजकारणात का आले?”

पंकजा मुंडे यांचं राजकारणात मोठं प्रस्थ आहे. महाराष्ट्रभर समर्थक आहेत. ओघवत्या भाषण शैलीने ते हजारो लोकांच्या सभा जिंकतात. सभा असो किंवा साधी बैठक त्या नेहमीच त्यांचे वडील म्हणजेच भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांचे वेगवेगळे किस्से सांगतात. आजदेखील पंकजा यांनी गोपीनाथ मुंडेंची आठवण काढली.pankaja remembers gopinath munde said why i am in politics

गोपीनाथ मुंडेंच्या फोटोकडे पाहून पंकजा म्हणातात, मी राजकारणात का आले?
pankaja munde and gopinath munde
| Edited By: | Updated on: Nov 02, 2021 | 12:55 AM
Share

नाशिक : पंकजा मुंडे यांचं राजकारणात मोठं प्रस्थ आहे. त्यांचे महाराष्ट्रभर समर्थक आहेत. ओघवत्या भाषणशैलीने त्या हजारोंच्या सभा जिंकतात. सभा असो किंवा साधी बैठक त्या नेहमीच त्यांचे वडील म्हणजेच भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांचे वेगवेगळे किस्से सांगतात. आजदेखील पंकजा यांनी गोपीनाथ मुंडेंची आठवण काढली. पण यावेळी “मुंडे साहेबांच्या फोटोकडे बघून म्हणते मी राजकारणात का आले” असे म्हणत पंकजांनी श्रोत्यांचे लक्ष्य वेधून घेतले.

विचार करत होते की मी राजकारणात का आले ?

पंकजा नाशिकमध्ये एका कार्यक्रमात बोलत होत्या. बोलताना त्यांनी गोपीनाथ मुंडेंची आठवण काढली. “गोपीनाथ मुंडे यांच्या फोटोकडे मी जास्त पाहात नाही; कारण माझ्या हृदयात कालवतं. मी त्यांच्या फोटोकडे न पाहता तिसरीडेच पाहते. मला वाटतं की माझे बाबा आज नाहीत. आज मी समोरच्या मुंडे साहेबांच्या फोटोकडे बघत होते आणि विचार करत होते की मी राजकारणात का आले ? तसा प्रश्नही मी मुंडेसाहेबांना विचारला होता. त्यांनी सांगितलं ज्यांना कशाचा अधिकार नव्हता अशा लोकांचा आवाज बनावं लागेल. ज्यांचा कोणी वाली, ज्यांना कोणी मायबाप नाही अशा लोकांना राजकारणात आणण्यसाठी मी राजकारणात आलो. हा सगळा प्रवास माझ्याबरोबर संपून जाऊ नये म्हणून मी माझी मुलगी समाजाच्या झोळीत टाकली, असं त्यांनी मला सांगितलं होतं,” असं पंकजा म्हणाल्या.

आता राजकारण या शब्दाचा अर्थच बदलला आहे

तसेच पुढे बोलताना त्यांनी राजकारण आणि विकास यावर भाष्य केलं. “आता राजकारण या शब्दाचा अर्थच बदलला आहे. राजासारखं मन ठेवून काम करण्याची ज्याची इच्छा असते त्याला राजकारण म्हणायचं. जनतेचं हीत खड्ड्यात घालून पक्षाचं राजकारण करायचं यासाठी राजकारण नाही. प्रत्येकवेळी खुर्चीवरच बसायचं यासाठीदेखील राजकारण नाही,” असं पंकजा म्हणाल्या.

नाशिक आणि माझं नातं, मी माहेरीच येते

तसेच “आम्ही मराठवाड्यातून येतो. जिथे दुष्काळ, पाणी कमी, नोकऱ्या कमी, विकास कमी तिथे राजकारणच राजकारण. आमच्या काळात आम्ही खूप विकास केला. प्रत्येकाच्या घरापर्यंत विकास पोहोचवण्याचं काम केलं. नाशिकच्या लोकांचं काम करण्याचं मला कौतूक वाटलं. माझं आणि नाशिकचं काही नातं आहे. मी प्रत्येक सणाला नाशिकला येते. माझं आणि तुमचं नातं आहे. मी माहेरीच येते. आता कळलं मला साहेबांनी राजकारणात का आणलं,” असे म्हणत त्यांनी त्यांना नाशिक शहराबद्दल असलेला लगाव बोलून दाखवला.

इतर बातम्या :

तुम्ही मर्द आहात ना? मग डायरेक्ट देवेंद्रजींना टार्गेट करा, मला मध्ये आणू नका; अमृता फडणवीसांचा घणाघात

मलिकांच्या आरोपानंतर जयदीप राणाचं नाव का हटवलं? अमृता फडणवीस म्हणतात, तर काय चुकीचं आहे ?

लज्जास्पद! मोहम्मद शमीला पाठिंबा दिला म्हणून विराटच्या 10 महिन्यांच्या चिमुरडीवर बलात्काराच्या धमक्या? नेटीझन्स संतापले

माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद.
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.