Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Raj Thackeray | लोक मला फुकट घालवत आहे, राज ठाकरेंनी बोलून दाखवली सल…

लोक मला फुकट घालवत आहेत, अशी सल मंगळवारी औरंगाबाद दौऱ्यावर असणारे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी बोलून दाखवली.

Raj Thackeray | लोक मला फुकट घालवत आहे, राज ठाकरेंनी बोलून दाखवली सल...
राज ठाकरे.
Follow us
| Updated on: Dec 14, 2021 | 2:45 PM

नाशिकः लोक मला फुकट घालवत आहेत, अशी सल मंगळवारी औरंगाबाद दौऱ्यावर असणारे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी बोलून दाखवली. मूळ प्रश्नाकडे कुणाला वळायचेच नाही. निवडणुकीवेळी सर्व प्रश्नांचा विसर पडतो. जनतेचा मतपेटीतून राग व्यक्त होत नाही, असे निरीक्षणही त्यांनी यावेळी नोंदवले.

मुख्य प्रश्न बाजूला

राज ठाकरे यांचा महाराष्ट्र दौरा सुरू आहे. त्यांनी काल नाशिकमध्ये पत्रकारांशी बोलतानाही हाच मुद्दा उपस्थित केला होता. तोच धागा पकडून राज म्हणाले की, आजही नाशिकमध्ये मनसेने चांगले काम केले असे म्हटले जाते. असा विकास झाला नाही, असा उल्लेख केला जातो. इतर ठिकाणीही रस्त्यापासून ते पाण्यापर्यंतचे प्रश्न आहेत. मात्र, निवडणुकीच्यावेळी मुख्य मुद्दे बाजूलाच राहतात. राजकारणी समाजाला बिघडवतो की, समाज राजकारण्यांना बिघडवतो. जोपर्यंत मतपेटीतून राग व्यक्त होणार नाही, तोपर्यंत कशाचाही अर्थ राहणार नाही. सध्या तरी मला लोक फुकट घालवत आहेत, अशी सल त्यांनी व्यक्त केली.

5 लाख व्यावसायिकांनी देश सोडला

राज ठाकरे म्हणाले, आपल्या देशातील 5 लाख व्यावसायिकांनी देश सोडला आहे. यावर चर्चा होत नाही. त्यांच्या उद्योग, व्यवसायावर असणाऱ्यांचे पुढे काय होणार. कोरोनामुळे अनेकांच्या नोकऱ्या गेल्या. शाळेची फी भरायचे पैसे लोकांकडे नाहीत. मात्र, आपण आर्यन खान प्रकरण, सुशांत सिंग प्रकरण, अंबानी प्रकरणात गुंतून पडतो. मीडियाही मूळ मुद्दे सोडून भलतेच दाखवतो. यातून काहीही निष्पण्ण होत नाही. कारण मूळ प्रश्न बाजूला पडतो. अंबानी यांच्या घराखाली वाझेंनी गाडी का ठेवली? या प्रश्नाचे उत्तर अजूनही मिळालेले नाही. मात्र, बाकी बरेच घडले. देशमुख तुरुंगात आहेत, या वक्तव्याचीही त्यांनी पुनरावृत्ती केली.

संभाजीनगरवर जाहीर सभेत बोलणार

राज ठाकरे यांना औरंगाबादचे संभाजीनगर होणार असल्याची चर्चा आहे. या नामकरणाबाबत विचारले असता आपण या विषयी जाहीर सभेत भूमिका मांडणार असल्याचे त्यांनी सांगितले. प्रत्येक जण पक्ष मोठा करण्यासाठी काम करतो. तसेच माझेही सुरू आहे. यावेळी त्यांनी कुण्या पक्षासोबत युती करणार का, या प्रश्नाला उत्तर देणे टाळले. ते येणाऱ्या काळात पाहता येईल. इथे सांगणे शक्य नसल्याचे सांगितले.

निवडणुका पुढे ढकलण्यासाठी गोंधळ?

ओबीसी आरक्षणावरून सुरू असलेला गोंधळ हा निवडणुका पुढे ढकलण्यासाठी आहे. सध्या शिक्षण संस्था खासगी झाल्या आहेत. नोकऱ्या खासगी आहेत. अनेक सरकारी संस्थांचे खासगीकरण सुरू आहे. खासगी उद्योग आणि शाळांमध्ये आरक्षण नाही. खरे तर ओबीसींच्या मोजणीसाठी फक्त 435 कोटींची गरज आहे. इतके पैसे म्हणजे सरकारचा दोन-तीन तासांचा भ्रष्टाचार आहे. यांना ठोस काहीही करायचे नाहीय. काही तरी कारण सांगून निवडणुका पुढे ढकलल्या जातील, अशी शक्यताही राज ठाकरे यांनी वर्तवली.

इतर बातम्याः

Raj Thackeray : म्हणावं इतकं काम झालं नाही? भाजपासोबत बोलणी होतेय? राज ठाकरे म्हणाले…

Raj Thackeray : महाविकास आघाडी सरकार पडेल असं वाटत नाही; राज ठाकरे यांचं मोठं विधान

महाराष्ट्रात विमानाने यायचा, रेल्वेने सोलापूर गाठायचा अन् मग..
महाराष्ट्रात विमानाने यायचा, रेल्वेने सोलापूर गाठायचा अन् मग...
गोरेंच्या सुपुत्राचा प्रताप! भैय्या पाटलांनी ट्विट केला व्हिडिओ
गोरेंच्या सुपुत्राचा प्रताप! भैय्या पाटलांनी ट्विट केला व्हिडिओ.
कराडने अनेक छोटे-मोठे गुंड जेलमध्ये बोलावून घेतलेत; आव्हाडांचं ट्विट
कराडने अनेक छोटे-मोठे गुंड जेलमध्ये बोलावून घेतलेत; आव्हाडांचं ट्विट.
वाल्मिक कराडने जेलरच्या ऑफिसमध्ये बसून सगळं प्लॅनिंग केलं - मीरा गीते
वाल्मिक कराडने जेलरच्या ऑफिसमध्ये बसून सगळं प्लॅनिंग केलं - मीरा गीते.
कराडला, घुलेला मारहाण होत असताना, बबन गीतेने शेअर केली पोस्ट
कराडला, घुलेला मारहाण होत असताना, बबन गीतेने शेअर केली पोस्ट.
मारहाण घटनेनंतर महादेव गीतेसह चौघांची हर्सुल कारागृहात रवानगी
मारहाण घटनेनंतर महादेव गीतेसह चौघांची हर्सुल कारागृहात रवानगी.
'...अन् देशमुख हत्याप्रकरणातील आरोपी एकमेकांना संपवतील' - मनोज जरांगे
'...अन् देशमुख हत्याप्रकरणातील आरोपी एकमेकांना संपवतील' - मनोज जरांगे.
मारामारी थापड थुपडीची झाली, पण..; धस नेमकं काय म्हणाले
मारामारी थापड थुपडीची झाली, पण..; धस नेमकं काय म्हणाले.
लाडकी बहीणबंद होणार?सरकारकडे पैसे नाहीत?सत्ताधारी-विरोधकांमध्ये जुंपली
लाडकी बहीणबंद होणार?सरकारकडे पैसे नाहीत?सत्ताधारी-विरोधकांमध्ये जुंपली.
घरात वडील आजारी अन् काढणीला आलेलं पीक; चिमुकला करतोय शेताची राखण
घरात वडील आजारी अन् काढणीला आलेलं पीक; चिमुकला करतोय शेताची राखण.