AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

गडचिरोलीत आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई, 12 नक्षलवाद्यांना कंठस्नान, पोलिसांना 51 लाखांचं बक्षीस

गडचिरोली नक्षलवाद्यांविरोधात आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई करण्यात पोलिसांना यश आलं आहे. पोलिसांनी या कारवाईत तब्बल 12 नक्षलवाद्यांना यमसदनी पाठवलं आहे. गडचिरोली पोलिसांनी केलेल्या या कारवाईमुळे सरकारकडून त्यांना 51 लाखांंचं बक्षीस जाहीर करण्यात आलं आहे.

गडचिरोलीत आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई, 12 नक्षलवाद्यांना कंठस्नान, पोलिसांना 51 लाखांचं बक्षीस
गडचिरोलीत आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई, 12 नक्षलवाद्यांना कंठस्नान
| Updated on: Jul 17, 2024 | 9:12 PM
Share

गडचिरोली पोलीस आणि माओवाद्यांमध्ये आज मोठी चकमक झाली. या चकमकीत 12 नक्षलवाद्यांना कंठस्नान घालण्यात गडचिरोली पोलीस दलास यश आलं आहे. या कारवाईत पोलिसांकडून नक्षलवाद्यांकडील अनेक स्वयंचलित शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत. छत्तीसगढ सीमेजवळील वांडोली गावात 12 ते 15 नक्षलवादी तळ ठोकून असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. याच माहितीच्या पोलिसांकडून सर्च ऑपरेशन सुरू करण्यात आले होते. जवळपास सहा ते सात पोलीस आणि नक्षलवादी यांच्यात चकमक चालली. अखेर या कारवाईत आतापर्यंत 12 नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात पोलिसांना यश आल्याची माहिती समोर येत आहे.

या शोध अभियानात आतापर्यंत 12 नक्षलवाद्यांचे मृतदेह सापडले आहेत. तसेच आतापर्यंत 3 AK47, 2 INSAS, 1 कार्बाइन, 1 SLR यासह 07 ऑटोमोटिव्ह शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत. मृत नक्षलवाद्यांपैकी एकांची ओळख पटली असून तो टिपागड दलमचा प्रभारी DVCM लक्ष्मण आत्राम, विशाल आत्राम असल्याची माहिती आहे.

या यशस्वी आणि मोठ्या अभियानासाठी सरकारकडून C60 कमांडो आणि गडचिरोली पोलिसांना 51 लाख रुपयांचे रोख बक्षीस जाहीर करण्यात आले आहे. दरम्यान, या चकमकीत एक जवान जखमी झाला असून त्यांची प्रकृती धोक्याच्या बाहेर असल्याची देखील माहिती समोर येत आहे.

नेमकी कारवाई कशी झाली?

कारवाईचे नेतृत्व डेप्युटी एसपींनी केले. त्यांच्या नेतृत्वाखाली C-60 च्या 7 तुकड्या छत्तीसगड सीमेजवळील वांदोली गावात पाठवण्यात आल्या होत्या. या दरम्यान आज दुपारी जवान आणि नक्षलवाद्यांमध्ये जोरदार गोळीबार सुरू झाला. दुपारपासून संध्याकाळी उशिरापर्यंत 6 तासांपेक्षा जास्त वेळ पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक सुरू होती. यानंतर जवानांनी परिसरात शोध मोहीम सुरू केली. यातून आतापर्यंत 12 नक्षलवाद्यांचे मृतदेह सापडले आहेत. ठार झालेल्या नक्षलवाद्यांची ओळख पटवली जात आहे.

देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया काय?

या कारवाईनंतर राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. “महाराष्ट्र छत्तीसगड सीमेजवळ कांकेरमध्ये C 60 ने मोठं ऑपरेशन करून 12 माओवाद्यांना ठार केले. दिवसभर हे ऑपरेशन सुरू होतं. त्यांचे मृतदेह, ऑटोमॅटिक मशीन गण जप्त केले आहेत. एक सब इन्स्पेक्टर आणि कॉन्स्टेबल जखमी झाले आहेत. त्यांना नागपूरला उपचारासाठी हलविले आहे. हे ऑपरेशन गेल्या काही वर्षांतील सगळ्यात मोठं ऑपरेशन असल्याने गडचिरोली पोलिसांना 51 लाखांचे बक्षीस आणि पुरस्कार राज्य सरकारकडून जाहीर करण्यात आलं आहे”, अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

भाजपात इनकमिंग सुरूच, 22 नगरसेवकांसह पदाधिकाऱ्यांचा पक्षात प्रवेश
भाजपात इनकमिंग सुरूच, 22 नगरसेवकांसह पदाधिकाऱ्यांचा पक्षात प्रवेश.
बाबरच्या नावाने मशीद बांधली तर कारसेवक तिथे जातील अन्... राणांचा इशारा
बाबरच्या नावाने मशीद बांधली तर कारसेवक तिथे जातील अन्... राणांचा इशारा.
BMC निवडणुकीसाठी मनसे अ‍ॅक्टिव्ह...राज ठाकरेंच्या मनसेची मोर्चेबांधणी
BMC निवडणुकीसाठी मनसे अ‍ॅक्टिव्ह...राज ठाकरेंच्या मनसेची मोर्चेबांधणी.
ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात भाजपची रणनीती, शिंदे सेना-BJP समान जागा लढणार
ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात भाजपची रणनीती, शिंदे सेना-BJP समान जागा लढणार.
3 वर्गमित्र, 3 वेगळे पक्ष अन् प्रभाग एक... राजकारणापलीकडची मैत्री
3 वर्गमित्र, 3 वेगळे पक्ष अन् प्रभाग एक... राजकारणापलीकडची मैत्री.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? युगेंद्र पवारांनी एका वाक्यात म्हटलं..
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? युगेंद्र पवारांनी एका वाक्यात म्हटलं...
मुंबईत शिंदेंची सेना खरंच स्वबळावर लढणार की 84 जागांसाठी दबाव?
मुंबईत शिंदेंची सेना खरंच स्वबळावर लढणार की 84 जागांसाठी दबाव?.
माणिकराव कोकाटे यांना जामीन मंजूर पण आमदारकीचा निर्णय अध्यक्षांकडे!
माणिकराव कोकाटे यांना जामीन मंजूर पण आमदारकीचा निर्णय अध्यक्षांकडे!.
पुढचा राजीनामा शिंदे यांचा...उद्धव ठाकरे यांच्या सनसनाटी दाव्यानं खळबळ
पुढचा राजीनामा शिंदे यांचा...उद्धव ठाकरे यांच्या सनसनाटी दाव्यानं खळबळ.
निवडणुकीच्या तोंडावर ठाकरेंची युती रखडली, जागा वाटपामुळे तिढा कायम
निवडणुकीच्या तोंडावर ठाकरेंची युती रखडली, जागा वाटपामुळे तिढा कायम.