AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Maharashtra Assembly Election 2024 : महाराष्ट्रात सत्तांतर अटळ? विधानसभा निवडणुकीआधी सर्वात मोठा पोल, कुणाला किती जागा मिळणार?

लोकसभा निवडणुकीच्या निकालानुसार विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचं सरकार येण्याची शक्यता आहे. लोकसभेच्या निकालानुसार महाराष्ट्रात महाविकास आघाडी विधानसभेत 158 जागा विजयी होऊ शकतात.

Maharashtra Assembly Election 2024 : महाराष्ट्रात सत्तांतर अटळ? विधानसभा निवडणुकीआधी सर्वात मोठा पोल, कुणाला किती जागा मिळणार?
| Updated on: Jun 11, 2024 | 6:26 PM
Share

देशात नुकतंच लोकसभा निवडणूक पार पडली. या निवडणुकीत महाराष्ट्रात महायुतीला सर्वात मोठा धक्का बसला. महाविकास आघाडीला या निवडणुकीत चांगलं यश आलं. याच निवडणुकीच्या निकालानुसार काढण्यात आलेल्या पोलनुसार महाराष्ट्रात आगामी काळात महाविकास आघाडीचं सरकार स्थापन होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रात पुढच्या चार महिन्यांनी विधानसभेची निवडणूक पार पडणार आहे. त्याआधी विधानसभेबाबतचा महत्त्वाचा पोल समोर आला आहे. या पोलनुसार महायुतीला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे महायुतीचे नेते आता ही निवडणूक जिंकण्यासाठी काय-काय रणनीती आखतात? ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

लोकसभा निवडणुकीच्या निकालानुसार विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचं सरकार येण्याची शक्यता आहे. लोकसभेच्या निकालानुसार महाराष्ट्रात महाविकास आघाडी विधानसभेत 158 जागा विजयी होऊ शकतात. तर महायुतीला 127 जागांवर यश मिळू शकतो. त्यामुळे महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं सरकार स्थापन होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण 288 जागा आहेत. महाराष्ट्रात सत्ता स्थापन करण्यासाठी महाविकास आघाडी किंवा महायुतीला 155 जागांवर विजय मिळवावा लागणार आहे.

नेमका कल काय?

महाराष्ट्रात सध्या भाजपचे 105 आमदार आहेत. पोलनुसार, आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपच्या 105 आमदरांपैकी 42 आमदारांच्या मतदारसंघात महाविकास आघाडीच्या उमेदलारांना लीड मिळण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या 40 आमदरांपैकी 17 आमदारांच्या मतदारसंघांमध्ये महाविकास आघाडीच्या उमेदवारांना लीड मिळण्याची शक्यता आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पक्षाच्या 40 आमदारांपैकी 25 आमदारांच्या मतदारसंघात महायुतीचे उमेदवार पिछाडीवर असण्याची शक्यता आहे. लोकसभेत महायुतीच्या विद्यमान 84 आमदारांच्या विधानसभेत महाविकास आघाडी पुढे आहे.

कुणाला किती जागा मिळणार?

पोलनुसार, शिवसेना ठाकरे गटाचे सध्या 15 आमदार आहेत. पण आगामी विधानसभा निवडणुकीत ठाकरे गटाचे आणखी 15 आमदार वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे ठाकरे गटाचे 30 आमदार जिंकून येण्याची शक्यता आहे. काँग्रेसचे सध्या 45 आमदार आहेत. या आमदारांची संख्या विधानसभा निवडणुकीनंतर 27 क्रमांकाने वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे काँग्रेसच्या आमदारांची संख्या ही थेट 72 वर जाण्याची शक्यता आहे. शरद पवार गटाचे सध्या 12 आमदार आहेत. विधानसभा निवडणुकीत शरद पवार गटाचे 40 आमदार वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत शरद पवार गटाचे 52 आमदार निवडून येण्याची शक्यता आहे.

त्यांच्यासोबत जाणं परवडणारं नाही! मलिकांबाबत शिरसाट यांचं मोठं विधान
त्यांच्यासोबत जाणं परवडणारं नाही! मलिकांबाबत शिरसाट यांचं मोठं विधान.
सुप्रिया सुळेंकडून मुख्यमंत्र्यांचे तोंडभरून कौतुक! म्हणाल्या...
सुप्रिया सुळेंकडून मुख्यमंत्र्यांचे तोंडभरून कौतुक! म्हणाल्या....
नाना पटोलेंचा भाजपवर सत्तेतून आमदार विकत घेतल्याचा आरोप
नाना पटोलेंचा भाजपवर सत्तेतून आमदार विकत घेतल्याचा आरोप.
हिंगोलीत कॉंग्रेसला खिंडार! प्रज्ञा सातव यांचा भाजपात प्रवेश
हिंगोलीत कॉंग्रेसला खिंडार! प्रज्ञा सातव यांचा भाजपात प्रवेश.
नागपूर सत्र न्यायालयाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी!
नागपूर सत्र न्यायालयाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी!.
ठाकरे बंधू भाजपचा पराभव करणार! संजय राऊतांचा मोठा दावा
ठाकरे बंधू भाजपचा पराभव करणार! संजय राऊतांचा मोठा दावा.
दोन मंत्री गेले, हा काळिमा! राऊतांचा सरकारवर गंभीर आरोप
दोन मंत्री गेले, हा काळिमा! राऊतांचा सरकारवर गंभीर आरोप.
त्यांना पुन्हा मंत्री करणं सोपं नाही! संजय राऊतांनी स्पष्टच सांगितले
त्यांना पुन्हा मंत्री करणं सोपं नाही! संजय राऊतांनी स्पष्टच सांगितले.
दादांची राष्ट्रवादी, शरद पवारांसोबत लढण्यास इच्छुक!
दादांची राष्ट्रवादी, शरद पवारांसोबत लढण्यास इच्छुक!.
नागपूर मनपा निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादीत चढाओढ!
नागपूर मनपा निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादीत चढाओढ!.