पूजा खेडकर यांचे वडील दिलीप खेडकर यांचे मंत्री विखे पाटलांवर खळबळजनक आरोप

पूजा खेडकर यांचे वडील दिलीप खेडकर यांनी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. "माझ्या मुलीला जो त्रास झाला तो माझ्यामुळे झाला. मी राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मुलाच्या विरोधात निवडणूक लढविली होती. त्यामुळे माझ्या मुलीची बदनामी झाली", असा आरोप दिलीप खेडकर यांनी केला.

पूजा खेडकर यांचे वडील दिलीप खेडकर यांचे मंत्री विखे पाटलांवर खळबळजनक आरोप
पूजा खेडकर
Follow us
| Updated on: Oct 04, 2024 | 8:11 PM

बडतर्फ प्रशिक्षणार्थी IAS अधिरापी पूजा खेडकर यांचे वडील दिलीप खेडकर यांनी राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर खळबळजनक आरोप केले आहेत. दिलीप खेडकर यांनी ‘टीव्ही 9 मराठी’ला प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी आपल्या मुलीवर झालेले आरोप खोटे असल्याचं स्पष्ट केलं. आपल्याविरोधात एफआयआर दाखल असल्याने दबाव होता. त्यामुळे आपण इतके दिवस समोर येऊ शकलो नाही, असा खळबळजनक आरोप दिलीप खेडकर यांनी केला आहे. त्यामुळे आता या प्रकरणाला वेगळं वळण लागण्याची चिन्हं आहेत. “माझी मुलगी डॉ. पूजा खेडकर हिच्या बाबतीत जी माहिती दिली गेली ती वस्तुस्थितीला धरून नाही. तिच्या बाबतीत एक फ्रॅाड मुलगी म्हणून सिलेक्शन झाल्याची माहिती गेली ती चुकीची आहे. तिचे आयुष्य उद्ध्वस्थ झाले आहे. माझ्या विरोधातही एफआयआर दाखल करण्यात आला होता म्हणून मला समोर येता आले नाही”, असं दिलीप खेडकर म्हणाले.

दिलीप खेडकर यांचा विखे पाटील यांच्यावर आरोप

“माझ्या मुलीला जो त्रास झाला तो माझ्यामुळे झाला. मी राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मुलाच्या विरोधात निवडणूक लढविली होती. त्यामुळे माझ्या मुलीची बदनामी झाली. प्रस्थापितांना वाटत होतं उभं राहू नये. या नेत्यांनी जाणूनबुजून त्रास दिला. विखे पाटील यांच्या मनामध्ये राग होता. त्यांच्याकडे महसूल खाते होते. त्याचा शासकीय अधिकाऱ्यांवर प्रभाव पडला आहे. पण नैसर्गिक न्याय आम्हाला मिळायला पाहीजे होता. तो मिळाला नाही”, असा आरोप दिलीप खेडकर यांनी केला.

“युपीएससीनं जे आरोप केले आहेत. त्यात युपीएससने म्हटलं आहे की पूजा खेडकर यांनी स्वतःचं नाव बदलले. पण तिने नाव बदलले नाही. युपीएससीने कोणाच्यातरी दबावाखाली कारवाई केली आहे. पूजा खेडकर ही वंजारी आहे. ओबीसी प्रमाणपत्र खोटं नाही. त्या वर्गवारीत जे ॲटम्प्ट दिले ते योग्य आहे. पर्सन विथ बेंचमार्कमध्ये ३०-४० आजार आहेत. ॲाम्लोपिया हा आजार पूजा खेडकरला आहे. पीएच वर्गवारीत हा आजार २०१८ ला आला. दोन्ही वर्गवारीचे ॲटम्प्ट वेगवेगळे आहेत”, असा दावा दिलीप खेडकर यांनी केला आहे.

सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.