लाकूड ओढण्यात ‘सोन्या’ने मारली बाजी, तर लहान गटात ‘रावणा’चा आला पहिला नंबर
कोल्हापूरः इचलकरंजी विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रकाशआण्णा आवाडे (Prakash Anna Awade) यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत येथील डीकेटीई नारायण मळ मैदानावर घेण्यात आलेल्या लाकूड ओढण्याच्या शर्यतीस (Race) तरुणांचा उदंड प्रतिसाद लाभला. या स्पर्धेत मोठ्या गटात पप्पू पाटील यांच्या सोन्या बैलाने (Bull) तर लहान गटात बलराम देशमाने यांच्या रावण बैलाने प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळवले. विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षिसे […]
कोल्हापूरः इचलकरंजी विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रकाशआण्णा आवाडे (Prakash Anna Awade) यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत येथील डीकेटीई नारायण मळ मैदानावर घेण्यात आलेल्या लाकूड ओढण्याच्या शर्यतीस (Race) तरुणांचा उदंड प्रतिसाद लाभला. या स्पर्धेत मोठ्या गटात पप्पू पाटील यांच्या सोन्या बैलाने (Bull) तर लहान गटात बलराम देशमाने यांच्या रावण बैलाने प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळवले. विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षिसे प्रदान करण्यात आली. तब्बल आठ वर्षांच्या प्रदीर्घ काळानंतर शहरात प्रथमच लाकूड ओढण्याच्या शर्यती झाल्याने मैदान गर्दीने फुलून गेले होते. मोठ्या गटात पप्पू पाटील यांच्या बैलाने 31.6 सेकंद अशी वेळ नोंदवत पहिला क्रमांक पटकविला, तर ज्युनिअर राजा याने 31.8 आणि राहुल घाट यांच्या बैलाने 32.9 अशी वेळ नोंदवून द्वितीय व तृतीय क्रमांक मिळविला.
प्रकाश आवाडे क्रीडा अकादमी, ताराराणी पक्ष आणि इचलकरंजी शेतकरी तरुण व बेंदूर उत्सव मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने या भव्य लाकूड ओढण्याच्या शर्यती आयोजित केल्या होत्या. बैलगाडासह विविध शर्यतीवरील बंदी उठल्यानंतर प्रथमच शहरात या स्पर्धा होत असल्याने क्रीडा शौकिनांमध्ये उत्साहाचे वातावरण होते. स्पर्धेचा शुभारंभ सहकार महर्षी माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे यांच्या हस्ते मैदान व लाकूड पूजन करून करण्यात आले. या प्रसंगी स्पर्धेचा शुभारंभ सहकार महर्षी माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे यांच्या हस्ते मैदान व लाकूड पूजन करून करण्यात आला. याप्रसंगी आमदार प्रकाश आवाडे, कल्लाप्पाण्णा आवाडे इचलकरंजी जनता सहकारी बँकेचे संचालक स्वप्नील आवाडे, जिल्हा परिषद सदस्य डॉ. राहुल आवाडे, इचलकरंजी शेतकरी तरुण व बेंदूर उत्सव मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब कलागते यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
ताराराणी पक्षाचे इचलकरंजी विधानसभा अध्यक्ष प्रकाश दत्तवाडे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. स्पर्धेसाठी इचलकरंजीसह आसपासच्या भागातून दोन्ही गटात मिळून 26 बैलांचा सहभाग होता. सकाळपासूनच तरुण गटागटाने स्पर्धेच्या ठिकाणी दाखल होत होते. यावेळी संपूर्ण मैदान गर्दीने फुलून गेले होते. स्पर्धेमध्ये विजेतेपदासाठी दोन्ही गटात चांगलीच चुरस दिसून येत होती. मोठ्या गटात पप्पू पाटील यांच्या बैलाने 31.6 सेकंद अशी वेळ नोंदवत पहिला क्रमांक पटकविला, तर ज्युनिअर राजा याने 31.8 आणि राहुल घाट यांच्या बैलाने 32.9 अशी वेळ नोंदवून द्वितीय व तृतीय क्रमांक मिळविला.
स्पर्धेचा निकाल
मोठा गटः पप्पू पाटील (प्रथम), ज्युनिअर राजा (द्वितीय) व राहुल घाट (तृतीय).
लहान गटः बलराम देशमाने (प्रथम), श्रीकांत मिठारी (द्वितीय) व श्री. नांद्रे (तृतीय). मोठ्या गटातील पहिल्या तीन क्रमांकाना अनुक्रमे 51 हजार रुपये व निशाण, 31 हजार व 21 हजार अशी तर लहान गटातील पहिल्या तीन क्रमांकाना 31 हजार रुपये व निशाण, 21 हजार आणि 11 हजार रुपये अशी बक्षिसे देण्यात आली.
याप्रसंगी प्रकाश मोरे, अहमद मुजावर, श्रेणीक मगदूम, बाबासो पाटील, संजय केंगार, पापालाल मुजावर, उत्तम आवाडे, आदित्य आवाडे, शैलेश गोरे, महादेव कांबळे, प्रशांत कांबळे, राजू बोंद्रे, सुभाष जाधव, संजय जगताप, नितेश पोवार यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी, आवाडे समर्थक उपस्थित होते. स्पर्धा यशस्वीतेसाठी राहुल घाट, तानाजी भोसले, बिलाल पटवेगार, किशोर पाटील, इरफान आत्तार, बाळासाहेब पाटील, दत्ता शेळके, विजय देसाई, सुधाकर कोळेकर आदींनी परिश्रम घेतले.
संबंधित बातम्या