‘दोषी असते तर सोडलं नसतं, गडाख कुटुंबीयांचा काहीही संबंध नाही,’ प्रतिक काळेच्या आत्महत्येनंतर बहिणीचा मोठा खुलासा

अहमदनगर-औरंगाबाद रोडवर झाडीत प्रतिकने गळफास लावून आत्महत्या केली होती. या घटनेनंतर मयत प्रतीक काळे यांच्या बहिणीच्या फिर्यादीवरून संस्थेतील सात जनांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. यात गडाख कुटुंबाचा कोणताही संबंध नसल्याचे बहिणीने स्पष्ट केले.

'दोषी असते तर सोडलं नसतं, गडाख कुटुंबीयांचा काहीही संबंध नाही,' प्रतिक काळेच्या आत्महत्येनंतर बहिणीचा मोठा खुलासा
pratik kale
Follow us
| Updated on: Nov 03, 2021 | 9:27 PM

शिर्डी, अहमदनगर : अहमदनगर-औरंगाबाद रोडवर झाडीत प्रतिकने गळफास लावून आत्महत्या केली होती. या घटनेनंतर मयत प्रतीक काळे यांच्या बहिणीच्या फिर्यादीवरून संस्थेतील सात जनांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. यात गडाख कुटुंबाचा कोणताही संबंध नसल्याचे बहिणीने स्पष्ट केले. प्रतिकने व्हायरल केलेली ऑडिओ क्लिप दारूच्या नशेत केली असल्याचे बहिणीने सांगितले असून प्रतीकने मला आत्महत्येपूर्वी फोनवर सगळं सांगितले होते. त्यामुळे यात गडाख दोषी असते तर आम्ही सोडलं नसतं, असं प्रतिकच्या बहिणीने म्हटलंय.

नेमका प्रकार काय आहे ?

राज्याचे जलसंधारणमंत्री शंकरराव गडाख यांचे बंधू प्रशांत गडाख यांच्या अधिपत्याखाली असलेल्या नगरच्या दंत महाविद्यालयातील कर्मचारी प्रतिक काळे याने आत्महत्या केली. ही घटना 30 ऑक्टोबर रोजी घडली. रात्रीच्या वेळेस नगर-औरंगाबाद रोडवर प्रतिक याने आत्महत्या केली असून या घटनेने खळबळ उडालीय. या प्रकरणी संस्थेतील 7 जनाविरोधात नगरच्या MIDC पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. यातील 4 जणांना पोलिसांनी अटक केली. प्रतीक काळे याने काही वर्ष प्रशांत गडाख यांचे स्वीय सहाय्यक म्हणून काम पाहिल्याची प्राथमिक माहिती आहे.

दोषीवर कारवाई करण्याची मागणी

प्रतीक बाळासाहेब काळे या 27 वर्षीय तरुणाच्या आत्महत्ये प्रकरणी आरोपींवर लवकरात लवकर कारवाई व्हावी या मागणीसाठी भाजपने रास्ता रोको आंदोलन केले होते. तर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने पोलीस अधिक्षक कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाला नेवासा मतदार संघातील भाजपचे माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी देखील पाठिंबा दिलाय. प्रतीक काळे याने सोशल माध्यमांवर केलेल्या सुसाईड नोटप्रमाणे चौकशी होऊन जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांच्यासह सर्वांची चौकशी करून कारवाई करण्याची मागणी मुरकुटे यांनी केली.

कोणालाही पाठीशी घालणार नाही

दरम्यान, मयत प्रतिक काळे हा तरुण दंत‌ महाविद्यालयात कॉम्प्युटर ऑपरेटर होता. तो संस्थेचे‌ अध्यक्ष प्रशांत गडाख यांचे अत्यंत विश्वासू होता. मात्र ते मंत्री शंकरराव गडाख यांचे कधीही स्वीय‌ सहाय्यक नव्हते. काळे यांच्या‌ आत्महत्येनंतर सात‌ जणांविरोधात गुन्हा दाखल असून आमची संस्था कोणत्याही आरोपीस पाठीशी घालणार नाही असे दंत महाविद्यालयाचे‌ प्रशासकीय अधिकारी डॉ. श्रीपाद राजहंस यांनी सांगितलं.

इतर बातम्या :

खूशखबर! पेट्रोल डिझेल स्वस्त होणार; आज मध्यरात्रीपासून नवे दर लागू

मोठी बातमी: राहुल द्रविड टीम इंडियाचा नवा हेड कोच, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाची माहिती

अखेर भारताच्या Covaxin ला WHO ची मान्यता

pratik kale suicide case pratik sister said shankarrao gadakh and his family not involve in this matter

'एक खून करून पोट भरलं नाही?', जरांगे पाटलांचा थेट मुंडेंवर आरोप
'एक खून करून पोट भरलं नाही?', जरांगे पाटलांचा थेट मुंडेंवर आरोप.
'कोल्हेंच्या वक्तव्याची कीव, त्यांनीही...'; मित्रपक्षांकडून टीकास्त्र
'कोल्हेंच्या वक्तव्याची कीव, त्यांनीही...'; मित्रपक्षांकडून टीकास्त्र.
शरद पवार गटात अलबेल नाही? सत्तेत सहभागी होण्यासाठी 2 मतप्रवाह?
शरद पवार गटात अलबेल नाही? सत्तेत सहभागी होण्यासाठी 2 मतप्रवाह?.
वाल्मिक कराड लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष, बावनकुळेंचं समर्थन? म्हणाले..
वाल्मिक कराड लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष, बावनकुळेंचं समर्थन? म्हणाले...
'मुन्नीचं लय प्रेम पण ती बोलना, बोलली तर मुन्नीचे कपडे टराटरा...'
'मुन्नीचं लय प्रेम पण ती बोलना, बोलली तर मुन्नीचे कपडे टराटरा...'.
'EVM म्हणजे एव्हरी व्होट अगेन्स्ट मुल्ला',भाजपचा बडा नेता काय म्हणाला?
'EVM म्हणजे एव्हरी व्होट अगेन्स्ट मुल्ला',भाजपचा बडा नेता काय म्हणाला?.
'ठाकरे गट झोपेत, काँग्रेसची मोडलेली पाठ..',कोल्हेंच्या वक्तव्यानं खळबळ
'ठाकरे गट झोपेत, काँग्रेसची मोडलेली पाठ..',कोल्हेंच्या वक्तव्यानं खळबळ.
वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, 'मविआ'ला फटका बसण्याचं सांगितलं कारण
वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, 'मविआ'ला फटका बसण्याचं सांगितलं कारण.
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर.
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप.