Wine in Maharashtra: भरकटलेल्या सरकारचा हा भरकटलेला निर्णय, बेवड्यांची काळजी, निर्णयानंतर भाजप आक्रमक

भरकटलेल्या सरकारचा भरकटलेला निर्णय आहे, अशा शब्दात विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी सरकारवर हल्लाबोल चढवला आहे. शेतकऱ्यांची नाही तर दारूड्यांची काळजी करणार हे सरकार आहे, अशी प्रतिक्रिया दरेकरांनी दिली आहे.

Wine in Maharashtra: भरकटलेल्या सरकारचा हा भरकटलेला निर्णय, बेवड्यांची काळजी, निर्णयानंतर भाजप आक्रमक
Pravin darekar
Follow us
| Updated on: Jan 27, 2022 | 7:30 PM

मुंबई : आजच्या कॅबिनेटच्या बैठकीत एक मोठा निर्णय घेण्याात आला आहे. आता दुकानात (Wine in Store) आणि सुपरमार्केटमध्येही (Wine in Supermarket) वाईन मिळणार असल्याचे मंत्री नवाब मलिक यांनी जाहीर केले आहे. त्यानंतर भाजप नेत्यांनी मात्र महाविकास आघाडी सरकारवर (Mahavikas Aghadi) टीकेची झोड उडवली आहे. महाराष्ट्राचा मध्यराष्ट्र बनवण्याचा प्रकार खपवून घेतला जाणार नाही, असा इशारा विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे. तर भरकटलेल्या सरकारचा भरकटलेला निर्णय आहे, अशा शब्दात विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी सरकारवर हल्लाबोल चढवला आहे. शेतकऱ्यांची नाही तर दारूड्यांची काळजी करणार हे सरकार आहे, अशी प्रतिक्रिया दरेकरांनी दिली आहे. तसेच उद्याची पिढी बर्बाद कशी होईल याच्याशी ह्या सरकारला काही देणघेण नाही, बेवड्यांना समर्पित असा हा सरकारचा निर्णय आहे, असे दरेकर म्हणाले आहेत. ना मंदीरांची काळजी, ना शिक्षण आणि शिक्षकांची काळजी, पण दारू विक्रेत्यांची ह्या सरकारला काळजी आहे, असा टोला त्यांनी लगावला आहे.

शेतकऱ्यांची नाही बेवड्यांची काळजी

शेतकऱ्यांच्या भल्याच्या नावावर मुंबईत सुपर मार्केटमध्ये वाईन विकणे म्हणजे हा एक प्रकारचा व्यभिचार महाराष्ट्रातील जनतेसोबत हे सरकार करत आहे. बेवड्यांना समर्पित अशा प्रकारचा निर्णय महाविकास आघाडी सरकारने घेतला आहे. ना मंदिरांची काळजी, ना शिक्षणासारख्या पवित्र मंदिरांची काळजी. ना तेथील लोकांची काळजी परंतु दारू विक्रेत्यांची आणि दारू पिऊन कुटुंबच्या कुटुंब उध्वस्त करणा-यांना हे सरकार अप्रत्यक्षरित्या प्रोत्साहन देत आहे. हा निर्णय म्हणजे भरकटलेल्या सरकारने घेतलेला भरकटलेला निर्णय असल्याची जोरदार टिका विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी दिली आहे.

दरेकरांचे ट्विट काय?

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही तर महाराष्ट्राचे ‘मद्यराष्ट्र’करण्याचा हा प्रकार खपवून घेतला जाणार नाही, असा इशाराच ठाकरे सरकारला दिलाय.‘शेतकरी-कष्टकरी, गरीब, बारा-बलुतेदार अशा एकाही घटकाला राज्य सरकारनं गेल्या दोन वर्षाच्या कोरोना कालखंडात मदत केली नाही. सरकारचे प्राधान्य केवळ आणि केवळ दारुलाच! महाविकास आघाडीचे हे सरकार नेमके आहे तरी कुणाचे? सत्तेच्या ‘नशे’त धुंद सरकारनं गरिबांना थोडी तरी मदत करावी. पेट्रोल-डिझेलऐवजी दारु स्वस्त! दारुबंदी संपवून दारुविक्रीला परवानगी! महाराष्ट्रात नवीन दारुविक्री परवाने देण्याचा निर्णय! आणि आता थेट सुपर मार्केट, किराणा दुकानातून घरोघरी दारू! महाराष्ट्राला ‘मद्यराष्ट्र’ करण्याचा हा प्रकार खपवून घेतला जाणार नाही’, अशा शब्दात देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारच्या निर्णयाचे वाभाडे काढले.

‘बेवड्यांना समर्पित सरकार’, मुनगंटीवारांचा हल्लाबोल; तर ‘सरकारला शेतकऱ्यांची नाही, बेवड्यांची काळजी’ दरेकरांचाही घणाघात

‘महाराष्ट्राचे ‘मद्यराष्ट्र’ करण्याचा प्रकार खपवून घेतला जाणार नाही’, फडणवीसांचा ठाकरे सरकारला इशारा

Wine in Maharashtra: किराणा दुकानात, सुपर मार्केटमध्ये वाईन मिळणार; राज्य मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.