Ankita Patil | हर्षवर्धन पाटलांनंतर नवविवाहित लेकही कोरोनाच्या विळख्यात, अंकिता पाटील कोव्हिड पॉझिटिव्ह

माझी तब्येत व्यवस्थित आहे. डॉक्टरांच्या सल्ल्याने मी पुढील उपचार घेणार आहे. माझ्या संपर्कात आलेल्यांनी आपली कोरोना चाचणी करून घ्यावी व सर्वांनी आपली काळजी घ्यावी, असे ट्वीट अंकिता पाटील यांनी केले

Ankita Patil | हर्षवर्धन पाटलांनंतर नवविवाहित लेकही कोरोनाच्या विळख्यात, अंकिता पाटील कोव्हिड पॉझिटिव्ह
अंकिता पाटील यांना कोरोनाची लागण
Follow us
| Updated on: Jan 02, 2022 | 12:00 PM

मुंबई : भाजप नेते आणि माजी मंत्री हर्षवर्धन पाटील (Harshvardhan Patil) यांच्या पाठोपाठ कन्या अंकित पाटील (Ankita Patil) यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. अंकिता पाटील यांनी ट्विटरवरुन याविषयी माहिती दिली. गेल्याच आठवड्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे पुतणे निहार बिंदूमाधव ठाकरे (Nihar Thackeray) आणि अंकिता विवाहबंधनात अडकले आहेत.

“आज माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आलेली आहे. माझी तब्येत व्यवस्थित आहे. डॉक्टरांच्या सल्ल्याने मी पुढील उपचार घेणार आहे. माझ्या संपर्कात आलेल्यांनी आपली कोरोना चाचणी करून घ्यावी व सर्वांनी आपली काळजी घ्यावी.” असे ट्वीट अंकिता पाटील यांनी केले आहे.

हर्षवर्धन पाटलांनाही कोरोनाची लागण

“गेल्या काही दिवसांपासून कोरोना वाढत आहे. आपल्या सर्वांच्या व सहकाऱ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून मी काल कोरोना तपासणी केली असता ती पॉझिटिव्ह आली आहे. पुढील उपचारासाठी मी रूग्णालयात दाखल झालो आहे. इच्छा असताना देखील ही निर्बंधांमुळे व आपल्या सुरक्षेच्या कारणास्तव आपल्या सर्वांना भेटता येत नाही व आपले प्रश्न सोडवता येत नाहीत. परंतु प्रत्यक्ष मी जरी आपल्या सर्वांना भेटू शकत नसलो तरीही आपण मला दूरध्वनीद्वारे किंवा माझ्या कार्यालयास संपर्क करून आपल्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी निसंकोचपणे सांगू शकता” असे ट्वीट हर्षवर्धन पाटील यांनी 31 डिसेंबरला केले होते.

आठवड्याभरापूर्वी विवाहबंधनात

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नातू आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे पुतणे निहार बिंदूमाधव ठाकरे यांचा विवाह 28 डिसेंबर रोजी भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांची कन्या अंकिता पाटील यांचासोबत झाला. मोठ्या शाही थाटात मुंबईतील ‘ताज’ हॉटेलमध्ये दोघं लग्नबंधनात अडकले.

कोण आहेत अंकिता पाटील?

अंकिता पाटील या भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांच्या कन्या आहेत. लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी संपल्यानंतर लागलीच पुण्यातील बावडा-लाखेवाडी जिल्हा परिषद गटाची पोटनिवडणूक झाली. त्यामध्ये अंकिता पाटील यांनी विजय मिळवत राजकारणात पाऊल टाकलं. जिल्हा परिषदेची निवडणूक त्यांनी विक्रमी मताधिक्क्याने जिंकली होती. हर्षवर्धन पाटील भाजपमध्ये गेले असले तरी अंकिता पाटील अद्याप काँग्रेसमध्येच आहेत.

2014 च्या निवडणुकीतील प्रचार यंत्रणा, सोशल मीडिया या सर्व जबाबदाऱ्या अंकिता पाटील यांच्याकडे होत्या. त्यानंतरच्या काळात खासगी साखर उद्योगाच्या  संघटनेतही त्यांना सदस्य म्हणून काम करण्याची संधी मिळाली. त्यांनी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये शिक्षण घेतले आहे. तसेच त्या इंडियन शुगर मिल असोसिएशनच्या सदस्या आहेत.

हर्षवर्धन पाटील काँग्रेसमधून भाजपात

विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने हर्षवर्धन पाटील आणि अजित पवार यांच्यातील कलगीतुरा राज्याने पाहिला होता. लोकसभेत सुप्रिया सुळेंना पाठिंबा देऊनही, राष्ट्रवादीने विधानसभेला इंदापूरची जागा आपल्याला सोडली नाही, असा आरोप करत हर्षवर्धन पाटील यांनी काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केला होता. काँग्रेस पक्ष सोडताना त्यांनी मित्रपक्ष राष्ट्रवादीवर आगपाखड केली होती. मात्र इंदापुरात भाजपच्या तिकीटावर निवडणूक लढवूनही हर्षवर्धन पाटलांना सलग दुसऱ्यांदा पराभवाचा धक्का बसला.

संबंधित बातम्या :

उद्धव ठाकरेंचा पुतण्या हर्षवर्धन पाटलांचा जावई, अंकिता-निहार विवाह बंधनात

हर्षवर्धन पाटील लेकीसह ‘शिवतीर्थ’वर, अंकिता पाटलांची राज ठाकरेंशी भेट

Ajit Pawar : 10 मंत्री, 20 आमदार कोरोनाबाधित, गरज पडल्यास कठोर निर्बंध लागू करणार : अजित पवार

ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला.
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.