Omicron threat in Pune | पुणे जिल्ह्यात ओमिक्रॉनचे रुग्ण वाढतायत ; महापालिका on Alert Mode, सण साधेपणाने साजरे करण्याचे आवाहन

पुणे शहरातील कोरोनाच्या रुग्णसंख्या नियंत्रणात असली तरी ओमिक्रॉनच्या विषाणूंचे नवीन संकट डोक्याभोवती फिरत आहे. याला अटकाव घालण्यासाठी शहरात कोरोनाची वेगवान लसीकरण मोहीम राबवण्यासाठी महापालिकेकडून प्रयत्न केले जात आहेत. सद्यस्थितीला शहरातील या 185  लसीकरण केंद्रावर महापालिकेकडून लसीकरण मोहीम राबवली जात आहे.

Omicron threat in Pune | पुणे जिल्ह्यात ओमिक्रॉनचे रुग्ण वाढतायत ; महापालिका on Alert Mode, सण साधेपणाने साजरे करण्याचे आवाहन
Omicron
Follow us
| Updated on: Dec 24, 2021 | 10:26 AM

पुणे- जिल्ह्यात कोरोनाची रुग्णसंख्या काहीशी घटली असली तरी ओमिक्रॉनच्या विषाणूने डोके वर काढले आह. जिल्ह्यात नव्याने ओमिक्रॉनचे 13 रुग्ण आढळून आल्याने प्रशासनाची डोके दुखी वाढली आहे. सद्यस्थितीला जिल्ह्यात ओमिक्रॉनची एकूण रुग्ण संख्या 35 इतकी झाली आहे. ओमिक्रॉनच्या वाढत असलेल्या रुग्णसंख्येमुळे महापालिका प्रशासन सर्तक (Municipal administration alert)  झाले आहे. नागरिकांनीही सतर्क राहण्याचे आवाहन पालिका प्रशासनानाने केले आहे.

नाताळ व नवीन वर्ष साधेपणाने साजरे करा दिवाळी दरम्यान शहारातील कोरोनाची(corona) रुग्णसंख्या बरीच दिलासा दायक झाली होती. मात्र दिवाळीनंतर पुन्हा शून्यावर गेलली रुग्णसंख्येने 100 पॅरा केल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे. यात अगदी काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या नाताळ व नवीन वर्षामुळे पुन्हाएकदा बाजारपेठा खाऊ गल्ल्या गजबजू लागल्या आहेत. ठीक ठिकाणी गर्दी होताना दिसून येत आहे. या सुट्ट्यांमध्ये अनेक प्रवाश्यांचीही ये- जा वाढणार आहे. त्यामुळे संक्रमणाचा धोकाही वाढणार आहे. साहजिकच ओमिक्रॉन व कोरोनासाठी पूरक वातावरण निर्माण होईल अशी भीती महापालिकेला वाटतं आहे. त्यामुळे नागरिकांनी कोरोनाच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे तसेच नाताळ व नववर्ष साधेपणाने साजरे करावे असे आवाहन महापालिकेने केले आहे.

जिल्ह्यातील  ओमिक्रॉनची स्थिती

गुरुवारी राज्य आढळल्या ओमिक्रॉनच्या 23 रुग्णांपैकी 13 रुग्ण हे एकट्या पुणे जिल्ह्यातील आहेत. यामुळे जिल्ह्यातील ओमिक्रॉनच्या रुग्णांची संख्या 35  वर जाऊन पोहचली आहे. 13  रुग्णांपैकी तीन रुग्ण महापालिकेच्या क्षेत्रातील आहेत. तर तीन पुणे ग्रामीण परिसरातील आहेत. सात रुग्ण पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रातील आहेत.

कोरोनाचे रुग्ण किती? जिल्ह्यात काल( गुरुवार) 187  कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. यातील 79 रुग्ण पुणे महानगरपालिकेत तर पिंपरीत 52  नवे रुग्ण आढळून आले आहेत. तीन रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. आतापर्यंत जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णांची संख्या 11 लाख 61 हजार784 इतकी झाली आहे. तसेच पुणे शहरात आतापर्यंत चार लाख 98 हजार 618 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

वेगवान लसीकरण मोहीम राबवण्यावर भर

पुणे शहरातील कोरोनाच्या रुग्णसंख्या नियंत्रणात असली तरी ओमिक्रॉनच्या विषाणूंचे नवीन संकट डोक्याभोवती फिरत आहे. याला अटकाव घालण्यासाठी शहरात कोरोनाची वेगवान लसीकरण मोहीम राबवण्यासाठी महापालिकेकडून प्रयत्न केले जात आहेत. सद्यस्थितीला शहरातील या 185  लसीकरण केंद्रावर महापालिकेकडून लसीकरण मोहीम राबवली जात आहे. त्याबरोबरच कोरोना व ओमिक्रॉनच्या रुग्णांसाठी महापालिकेच्या रुग्णालये सुज्ज आहे. याबरोबरच शहरातील जम्बो कोविड रुग्णालयाची ‘रेडी टू युझ’ (Ready To Use)या स्थितीत तयार ठेवले आहे. वाढता धोका लक्षात घेत वैद्यकीय यंत्रणाही तयार असल्याची माहिती महापालिका प्रशासने दिली आहे.

नागरिकांनी या नियमांचे पालन करणे बंधनकारक

– सोशल डिस्टंटचे पालन करणे – मास्कचा वापर करणे. – गर्दी करणे टाळा – याबरोबरच नाताळ सण ही साधेपणाने साजरे करण्याचे आवाहन महापालिकेने केले आहे.

 लोणावळ्यात  लसीचे दोन डोस बंधनकारक

लोणावळ्यामध्ये नाताळ सण आणि नवीन वर्ष साजरा करायला मोठ्या प्रमाणात पर्यटक येत असतात. त्यामुळे मोठी गर्दी होत असते त्यामध्ये कोरोनाचा प्रसार होऊ नये, म्हणून लोणावळा नगरपरिषद आणि लोणावळा पोलिसांचा निर्णय घेण्यात आला आहे.  या भागातील हॉटेल,लॉज,बंगले मालकांना देखील सूचना देण्यात आल्या आहेत. पर्यटकांचे दोन लसीचे डोस झाले असल्याचे प्रमाणपत्र पाहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. जे या नियमांचे उल्लंघन करतील त्यांच्यावर कडक कारवाई करणार असल्याचं प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे.

Corona Omicron New Guidelines : ओमिक्रॉनचं संकट, मुंबईसह राज्यात कोरोना दुप्पट ; ठाकरे सरकार ॲलर्ट, आज नवी नियमावली जाहीर होणार

नाशिककरांना 2 तासांत दिल्ली गाठता येणार; जानेवारीत विमानसेवा होणार सुरू, गोव्यासाठीही हवाहवाई…!

children vaccination : मुलांच्या लसीकरणासाठी मुंबई महापालिकेची ‘ब्लू प्रिंट’, असे आहे नियोजन

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.