अंजिल दमानिया X अजित पवार वॉर, अजितदादांच्या आव्हानास दमानियांचे असे उत्तर
anjali damania on ajit pawar: तुमचे विशाल अग्रवालचे संबंध नसतील, तुमचे आर्थिक व्यवहार नसतील आणि तुमच्या नार्को टेस्टमध्ये तुम्ही क्लीन आला तर मी तुम्हाला लिहून द्यायला तयार आहे, मी संन्यास घेईन. मी कुठलाही सामाजिक विषय कधीही लढणार नाही.
पुण्याच्या कल्याणीनगरमध्ये झालेल्या अपघात प्रकरणावरुन राजकारण चांगले रंगत आहे. आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. या अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणापासून पुण्याचे पालकमंत्री अजित पवार हे लांब राहिलेले दिसत होते. परंतु गेल्या दोन दिवसांपासून या प्रकरणात सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया आणि अजित पवार यांचे ‘वाक् -युद्ध’ रंगले आहे. दमानिया यांनी अजित पवार यांच्या नार्को टेस्टची मागणी केली. त्याला अजित पवार यांनी उत्तर दिले. ते म्हणाले “माझी नार्को टेस्टची तयारी आहे. त्या चाचणीत काही आढळले नाही तर अंजली दमानिया यांनी पुन्हा कुठे पुढे यायचे नाही. गप्प घरी बसून संन्यास घ्यायचा. आता त्यावर अंजली दमानिया यांनी उत्तर दिले.
अंजिल दमानिया यांनी आव्हान स्वीकारले
अंजिल दमानिया यांनी अजित पवार यांना तुम्ही नार्को टेस्ट लवकरात लवकर करा, असे म्हटले आहे. मी तुमचे आव्हान स्वीकारत आहे. त्यात तुम्ही दोषी आढळल्यास काय करणार, हे सांगा. तुम्ही दोषी आढळले नाही तर तुमच्या मागणीप्रमाणे मी घरी बसून राहील. कोणतेही सामाजिक काम करणार नाही. संन्यास घेईल. परंतु तुमची जी नार्को टेस्ट होईल, त्याची प्रश्नावली मी देणार आहे.
२४ तासांची वेळ गेली
तुमचे विशाल अग्रवालचे संबंध नसतील, तुमचे आर्थिक व्यवहार नसतील आणि तुमच्या नार्को टेस्टमध्ये तुम्ही क्लीन आला तर मी तुम्हाला लिहून द्यायला तयार आहे, मी संन्यास घेईन. मी कुठलाही सामाजिक विषय कधीही लढणार नाही. त्यांनी माझ्यावर जी वक्तव्य केली होती, त्याची माफी मागण्यासाठी २४ तासांची वेळ दिली होती. परंतु त्यांनी माफी मागितली नाही. यामुळे आता शक्य ते सर्व कायदेशीर पर्याय मी वापरणार आहे, असे अंजिली दमानिया यांनी म्हटले आहे.
तुमच्या पक्षातील लोकांना विचारा
कालची त्यांची दोन वाक्य होते एक सुपारी घ्यायला आणि दुसरा रिचार्जवर काम करणारे बाई आहे. त्यांना मला सांगायचे आहे, तुमच्या पक्षाचे नेत्यांना जाऊन विचारा, सुनील तटकरे यांना विचारा, छगन भुजबळांना विचारा की किती सिद्धांतावर काम करणारा बाई आहे. सुरज चव्हाण प्रकरणात तुम्हाला आनंदाने जे मोठे खुलासा करायचे आहे ते प्लीज कर, असे दमानिया यांनी म्हटले आहे.