competitive exams | स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून शासनाकडे कोट्यवधींचा निधी, रद्द परीक्षांचे पैसे…

maharashtra government competitive exams | राज्यात सध्या विविध जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु आहे. जवळपास 75 हजार जागांची भरती होणार आहे. या भरतीसाठी आकारलेल्या जाणाऱ्या शुल्कासंदर्भात महत्वाची माहिती समोर आली आहे.

competitive exams | स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून शासनाकडे कोट्यवधींचा निधी, रद्द परीक्षांचे पैसे...
Follow us
| Updated on: Oct 19, 2023 | 3:50 PM

पुणे | 19 ऑक्टोंबर 2023 : देशाचा अमृत महोत्सवी वर्ष साजरा केला जात असल्यामुळे राज्य सरकारने मागील वर्षी मोठा निर्णय घेतला होता. राज्यात गेल्या अनेक वर्षांपासून रिक्त असलेल्या जागांची भरती करण्याचा निर्णय घेण्यात आला. देशाच्या स्वातंत्र्यास 75 वर्षे पूर्ण झाल्यामुळे राज्यातही 75 हजार जागांची भरती करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. ही भरती राज्यातील विविध विभागात करण्यात येत आहे. त्यासाठी स्पर्धा परीक्षा घेतली जात आहे. या परीक्षांच्या माध्यमातून शासनाकडे कोट्यवधी रुपयांचे शुल्क जमा झाले आहे. ती माहिती समोर आली आहे.

पाच वर्षांत किती जमा झाला निधी

राज्य शासनाने गेल्या 5 वर्षात विविध पदासाठी स्पर्धा परीक्षा घेऊन भरती केली आहे. सरकारी नोकरीसाठी होणाऱ्या या भरतीसाठी विद्यार्थ्यांकडून मोठ्या प्रमाणावर शुल्क जमा झाले आहे. त्यातून शासनाकडे जवळपास 334 कोटी जमा झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यात चालू वर्षांतच शासनांकडे 267 कोटी रुपये जमा झाले आहे. चालू वर्षांत पोलीस भरती, जिल्हा परिषद भरती, महानगरपालिका भरती, तलाठी भरती आणि एमपीएससीसाठी परीक्षा घेण्यात आल्या.

किती जागा आहेत रिक्त

राज्यात शासकीय कर्मचाऱ्यांचा सुमारे 2 लाख 44 हजार 405 जागा रिक्त असल्याचा दावा केला जात आहे. राज्यातील रिक्त झालेल्या पदांची एकूण संख्या टक्केवारीत 23 टक्के आहे. यामुळे दीर्घ कालवाधीनंतर राज्यात 75 हजार जागा भरण्याचा निर्णय राज्य सरकारकडून घेण्यात आला. काही भरती एमपीएससीमार्फत तर काही भरती इंस्टीट्यूट ऑफ बँकिंग सिलेक्शन या संस्थेकडून होत आहे.

हे सुद्धा वाचा

रद्द झालेल्या परीक्षांमधून कमाई

राज्य शासनाने भरतीसाठी जाहिरात काढल्या. परंतु काही कारणांमुळे भरती झालेली नाही आणि परीक्षाही झालेली नाही. अशा अनेक परीक्षा आहेत. या रद्द झालेल्या भरतीमध्ये परीक्षा शुल्काचे ६७ कोटी रुपये शासनाकडे जमा झाले आहेत. भरती रद्द झाली तरी हे पैसे विद्यार्थ्यांना परत दिले नसल्याची माहिती मिळाली आहे. यासंदर्भात आमदार रोहित पवार यांनी अनेकवेळा मुद्दा उपस्थित केला. परंतु अजूनही विद्यार्थ्यांच्या खात्यात पैसे जमा झालेले नाही.

'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?.
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?.