पुणे येथील 80 मुलांना विषबाधा, दुपारी जेवण करताचा झाला त्रास

विषबाधा झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये मुलींची संख्या आधिक आहे. मुलांना त्रास झाल्यानंतर त्यांना चांडोली रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यांवर उपचार करणारे डॉक्टरच दारुच्या नशेत असल्याचा आरोप पालकांनी केला आहे.

पुणे येथील 80 मुलांना विषबाधा, दुपारी जेवण करताचा झाला त्रास
Image Credit source: Google
Follow us
| Updated on: Feb 09, 2023 | 6:55 PM

राजगुरुनगर, पुणे : विद्यार्थ्यांना शाळेत दिला जाणारा पोषण आहारच त्यांच्यांसाठी बाधक ठरला आहे. पुणे जिल्ह्यातील एका शाळेमधील विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याचा प्रकार घडला आहे. सुमारे 80 विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा झाल्याचा प्रकार समोर आला आहे. सर्व विद्यार्थ्यांना शासकीय रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. पुणे जवळील राजगुरुनगर शहरातील हुतात्मा राजगुरु विद्यालयातील 80 मुलांना विषबाधा झाली आहे. या प्रकारामुळे पालकही संतप्त झाले आहे. सर्व मुलांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती रुग्णालयातील सूत्रांनी दिली.

हुतात्मा राजगुरु विद्यालयातील विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहारातून विषबाधा झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. या विद्यार्थ्यांनी दुपारी जेवण केले.शाळेतून देण्यात येणार पोषण आहार या विद्यार्थ्यांनी खाल्ला होता.शाळेत पाचवी ते सातवीतील विद्यार्थ्यांना पोषण आहार दिला जातो. तो खाल्यानंतर विद्यार्थ्यांना मळमळ, उलटी आणि जुलाब हा प्रकार सुरू झाला. सर्व विद्यार्थ्यांना चांडोली ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

हे सुद्धा वाचा

मुलींची संख्या आधिक

विषबाधा झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये मुलींची संख्या आधिक आहे. मुलांना त्रास झाल्यानंतर त्यांना चांडोली रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यांवर उपचार करणारे डॉक्टरच दारुच्या नशेत असल्याचा आरोप पालकांनी केला आहे. पालकांना मुलांना भेटू दिले नाही. यामुळे पालक संतप्त झाले आहेत.

दोन आठवड्यांपुर्वी सांगलीत घटना

सांगली येथील सुमारे 32 विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा झाल्याचा प्रकार २७ जानेवारी रोजी समोर आला होता. विजयनगर इथल्या वानलेसवाडी हायस्कूल येथील पाचवी ते सातवीतील देण्यात आलेल्या पोषण आहार मधून विषबाधा झाल्याचा समोर आला होता. मळमळ, उलटी आणि जुलाब हा प्रकार सुरू झाल्यानंतर शिक्षकांनी तातडीने या मुलांना स्थानिक आरोग्य केंद्रामधील डॉक्टरांना बोलून दाखवलं. मात्र, त्यानंतर अधिक त्रास होणाऱ्या 32 विद्यार्थ्यांना सांगलीच्या शासकीय रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात होते.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.