shivneri fort : वय वर्षे फक्त ९५, पाहा या तरुण आजीबाईने शिवाजी महाराजांचा किल्ला कसा केला सर

shivaji maharaj shivneri fort : वय कोणत्याही सहसाच्या आडी येऊ शकत नाही. फक्त तुमचा निश्चिय गरजेचा असतो. एका ९५ वर्षीय आजीबाने असाच निश्चिय केला आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा किल्ला सर केला.

shivneri fort : वय वर्षे फक्त ९५, पाहा या तरुण आजीबाईने शिवाजी महाराजांचा किल्ला कसा केला सर
Follow us
| Updated on: Aug 21, 2023 | 9:41 AM

पुणे | 21 ऑगस्ट 2023 : छत्रपती शिवाजी महाराज यांचा शौर्यागाथेने प्रत्येक मराठी व्यक्तीच नाही तर देशातील प्रत्येक जण भारवून जातो. महाराजांच्या पराक्रमासंदर्भात ऐकताना वयाचे भान राहत नाही. अगदी बाल्यअवस्थेतील चिमुरडा असो की ९०-९५ वर्षाचा युवा असो त्याच्या अंगात जोश भरतो. यामुळे शिवाजी महाराजांचे गड, किल्ले पाहण्यासाठी गर्दी होत असते. परंतु वयाच्या ९५ वर्षी पाय जाऊन महाराजांचा किल्ला सर करण्याचा निश्चिय केला तर? अनेकांना वाटेल हे शक्य नाही. परंतु एका आजीबाईने हे शक्य करुन दाखवले. महाराजाच्या जन्मस्थळी जाऊन त्या नतमस्तक झाल्या.

कोण आहेत आजीबाई

आपल्याकडे साठीनंतर व्यक्ती निवृत्त होतो. ८० वर्षानंतर अनेकांना गडावरील धार्मिक स्थळावर जाणे अवघड होते. परंतु वय कोणत्याही सहसाच्या आडी येऊ शकत नाही. हे एका ९५ वर्षीय आजीबाईने दाखवून दिला. त्यांना छत्रपती शिवाजी महाराज यांचा किल्ला सर करण्याचा निर्णय घेतला. या ९५ वर्षीय आजीने पायी चालत शिवनेरी किल्ला केला. जुन्नर तालुक्यातील छत्रपती शिवाजी महाराज यांचे जन्मस्थळी जाऊन दर्शन घेण्याची इच्छा कौसाबाई महादु ढोले यांनी व्यक्त केली. त्यांच्या या इच्छेला कुटुंबियांकडून लागलीच प्रतिसाद मिळाला.

हे सुद्धा वाचा

अन् सुरु केली मोहीम

कौसाबाई ढोले यांनी चारही बाजूंनी कठीण चढाव असलेला शिवनेरी पायीच जाऊन सर करण्याचा निर्णय घेतला. याच ठिकाणी शिवाजी महाराज यांचा जन्म झाला होता. ३५०० फूट उंचीचा हा किल्ला गिरीदुर्ग प्रकारातील आहे. दुर्ग म्हणजे जिथे शिरकाव करणे कठीण असते असे बांधलेले ठिकाण आहे. मग आजाबाईंनी हा किल्ला सर केला. या वयात छत्रपती शिवाजी महाराज यांची जन्मभूमी असलेल्या शिवनेरी त्यांनी सर केल्यामुळे सर्वच आवक झाले.

काय म्हणतात आजीबाई

कौसाबाई ढोले गडावर पोहचल्यावर म्हणाल्या, माझी शिवाजी महाराज यांचे जन्मस्थळ पाहण्याची इच्छा होती. यामुळे हा गड चढून आले. या ठिकाणी शिवाजी महाराजांचा पाळणा पहिला. संपूर्ण किल्ला पाहिला. मजा आली, खूप आनंद झाला. किल्ला चढताना फारसा थकवाही जणावला नाही.

'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.