पिंपरीत थरार, ढिगाऱ्याखालून मुलीला वाचवलं, जवानांना खांद्यावर घेऊन जल्लोष

पिंपरी चिंचवडच्या फुगेवाडी परिसरात आज सकाळी मातीचे बांधकाम असलेली दोन मजली इमारत कोसळली. या दुर्घटनेमध्ये पौर्णिमा संभाजी मडके ही 14 वर्षीय मुलगी ढिगाऱ्याखाली अडकली होती. अग्निशमन दलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न करत या मुलीला वाचवण्यात यश मिळवलं आहे.

पिंपरीत थरार, ढिगाऱ्याखालून मुलीला वाचवलं, जवानांना खांद्यावर घेऊन जल्लोष
Follow us
| Updated on: Aug 28, 2021 | 3:40 PM

पिंपरी : पिंपरी चिंचवडच्या (Pimpri Chinchwad) फुगेवाडी (Fugewadi) परिसरात आज सकाळी मातीचे बांधकाम असलेली दोन मजली इमारत कोसळली. या दुर्घटनेमध्ये पौर्णिमा संभाजी मडके ही 14 वर्षीय मुलगी ढिगाऱ्याखाली अडकली होती. अग्निशमन दलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न करत या मुलीला वाचवण्यात यश मिळवलं आहे. मुलीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. (A girl trapped under a pile of buildings was rescued by firefighters In Pimpri-Chinchwad)

फुगेवाडी परिसरात आज सकाळी दोन मजली इमारतीचं छत कोसळलं. मिळालेल्या माहितीनुसार ही इमारत जुनी झालेली होती. दुर्घटना घडल्यानंतर इमारतीच्या ढिगाऱ्याखाली एक महिला आपल्या दोन मुलींसह अडकली होती. इमारत कोसळल्याची माहिती मिळताच भोसरी पोलीस आणि अग्निशमन दलाचे जवान तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. काही वेळाने महिला आणि एका मुलीला वाचवण्यात अग्नीशमन दलाच्या जवानांना यश आलं. पण 14 वर्षीय दुसरी मुलगी बराच वेळ ढिगाऱ्याखाली अडकून होती.

जवानांना खांद्यावर घेऊन जल्लोष

पौर्णिमा मडके या मुलीला बाहेर काढण्यासाठी अग्नीशमन दलाच्या जवानांनी तात्काळ रेस्क्यू ऑपरेशन सुरू केलं. मोठ्या शर्थीने बराच वेळानंतर तिला इमारतीच्या ढिगाऱ्याकाढून सुखरूप बाहेर काढण्यात जवानांना यश आलं. मुलीला बाहेर काढल्यानंतर नागरिकांनी एकच जल्लोष केला. ज्या जवानांनी त्यांना मुलीला वाचवले त्यांना खांद्यावर घेत परिसरातल्या नागरिकांनी जल्लोष केला.

जखमी पौर्णिमावर रुग्णालयात उपचार सुरू

बराच वेळ ढिगाऱ्याखाली अडकल्यामुळे पौर्णिमा मडके जखमी झाली आहे. अग्निशमन दलाच्या जवानांनी तिला सुखरूप बाहेर काढल्यानंतर तिला जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. तिच्यावर उपचार सुरू आहेत.

इतर बातम्या :

पुण्यात 25 वर्षीय महिलेवर घरात घुसून अत्याचार, पोलिसांनी दरवाजा तोडून चौघांना रंगेहाथ पकडलं

VIDEO: तोल गेला अन् गाढव टेकडीवरून घसरलं, दगडांवरुन ठेचकाळत खाली आलं, पण क्षणात उभं राहून चालायला लागलं

‘कार हळू चालव’ म्हटल्याने डोक्यात गेला राग, लाथाबुक्क्यांनी मारलं, रक्तबंबाळ व्यक्तीचा अखेर मृत्यू

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.