Pune fire incident : पुणे नाशिक महामार्गावर भोसरीजवळ प्लायवूडच्या गोडाउनला भीषण आग; जीवितहानी नाही
पुणे नाशिक महामार्गावर (Pune Nashik highway) भोसरीजवळ (Bhosari) प्लायवूडच्या गोडाउनला आग (Fire) लागल्याचा प्रकार घडला आहे. आगीसह धुराचे मोठमोठे लोट बाहेर पडत होते. महामार्गालगत असलेल्या लोकवस्तीत हे गोडाउन आहे.
पिंपरी चिंचवड : पुणे नाशिक महामार्गावर (Pune Nashik highway) भोसरीजवळ (Bhosari) प्लायवूडच्या गोडाउनला आग (Fire) लागल्याचा प्रकार घडला आहे. आगीसह धुराचे मोठमोठे लोट बाहेर पडत आहेत. महामार्गालगत असलेल्या लोकवस्तीत हे गोडाउन आहे. हे आता आगीच्या भस्मस्थानी पडले आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या अग्निशामक दलाची एक गाडी घटनास्थळी दाखल होत आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न करण्यात आले. आगीसह धुराचे लोट असल्याने आगीवर नियंत्रण मिळविण्यात अडथळा निर्माण झाला. दरम्यान, आग लागल्याचे कारण मात्र अस्पष्ट आहे. या दुर्घटनेत सुदैवाने कुठलीही जीवितहानी झाली नाही. धुराचे मोठमोठे लोट आकाशात आणि हवेत पसरत होते. यावेळी येथील नागरिकांची पळापळ झाली. आग लागल्यानतंर लगेच अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आले. अग्निशामक दलाने आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न केले.
धुराचे काळे लोट
समोर आलेल्या व्हिडिओमध्ये आगीची तीव्रता लक्षात येवू शकते. अत्यंत मोठ्या प्रमाणात आग आणि त्यासोबतच धुराचे काळे लोट या व्हिडिओत पाहायला मिळतात. आग नेमकी कशामुळे लागली, याचा शोध घेतला जात आहे.
#Pune : पुणे नाशिक महामार्गावर भोसरीजवळ प्लायवूडच्या गोडाउनला आग लागली. सुदैवानं यात जीवितहानी झाली नाही.#FireAccident #godown #firebrigade अधिक बातम्यांसाठी क्लिक करा https://t.co/pJlmH04UAs pic.twitter.com/lFSMa4Tkf4
— TV9 Marathi (@TV9Marathi) April 16, 2022