सोमय्या म्हणाले, कोव्हिड घोटाळ्याला ठाकरे जबाबदार, आदित्य म्हणतात, सगळीकडचा गाळ काढण्याचं काम करतोय

पुण्यातील जम्बो कोव्हिड घोटाळ्याला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे जबाबदार आहेत, असा गंभीर आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे. सोमय्या यांच्या या आरोपावर आदित्य ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

सोमय्या म्हणाले, कोव्हिड घोटाळ्याला ठाकरे जबाबदार, आदित्य म्हणतात, सगळीकडचा गाळ काढण्याचं काम करतोय
सोमय्या म्हणाले, कोव्हिड घोटाळ्याला ठाकरे जबाबदार, आदित्य म्हणतात, सगळीकडचा गाळ काढण्याचं काम करतोय
Follow us
| Updated on: Feb 13, 2022 | 1:22 PM

पुणे: पुण्यातील जम्बो कोव्हिड घोटाळ्याला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm uddhav thackeray) आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे जबाबदार आहेत, असा गंभीर आरोप किरीट सोमय्या (kirit somaiya) यांनी केला आहे. सोमय्या यांच्या या आरोपावर आदित्य ठाकरे (aaditya thackeray) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आम्ही सगळीकडची घाण साफ करण्याचं काम करत आहोत, असा टोला आदित्य ठाकरे यांनी लगावला आहे. मात्र, या प्रकरणावर आदित्य यांनी अधिक भाष्य टाळलं. दोन दिवस गोव्यात शिवसेना उमदेवारांचा प्रचार केल्यानंतर आज आदित्य ठाकरे पुण्यात होते. यावेळी मीडियाशी संवाद साधताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली. उद्या गोव्यात दुसऱ्या टप्प्यासाठी मतदान होत आहे. त्यावरही त्यांनी भाष्य केलं. मतदानासाठी 24 तास शिल्लक आहेत. तिथली आचारसंहिता कडक झाली आहे. आपण इथल्या पर्यावरणावर बोलूयात, असं सांगत आदित्य यांनी गोव्यातील राजकीय परिस्थितीवर भाष्य करण्यास नकार दिला.

पर्यावरण वातावरण निर्माण झालं पाहिजे. येथील नदीतील 10 हजार टन गाळ काढला आहे. नदीतील गाळ काढून नदी स्वच्छ केली जाईल. ज्यांनी कोणी गाळ टाकलाय त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असं सांगतानाच स्थानिक नागरिकांनी स्वच्छतेची मोहीम हाती घ्यावी, असं आवाहन आदित्य ठाकरे यांनी केलं.

सीसीटीव्ही बसवण्याचं काम सुरू

पुण्याची हिरवळ जपली पाहिजे. तीन टप्प्यात अभयारण्याचं काम केलं जाईल. नदीत गाळ होऊ नये म्हणून या ठिकाणी सीसीटीव्ही बसवण्याचं काम सुरू आहे. या ठिकाणी पोलीस चौकी उभारायला सांगितली आहे, असं त्यांनी सांगितलं.

काय आहे वाद?

यापूर्वीही सोमय्या यांनी या घोटाळ्यावरून आरोप केले होते. लाईफ लाईन हॉस्पिटल सर्व्हिसेस मॅनेजमेंट हे साळुंखे यांचं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पीएमआरडीएचे चेअरमन आहेत. त्यांच्यामुळेच लाईफ लाईन हॉस्पिटल सर्व्हिसेस मॅनेजमेंटला जम्बो कोविड सेंटरचं काम देण्यात आलं. लाईफ लाईनला काम देताना मुख्यमंत्र्यांनी दबाव आणला. या रुग्णालयात अनेकांचे मृत्यू झाले. 9 दिवसांत लाईफ लाईनला ब्लॅक लिस्ट करण्यात आलं. उद्धव ठाकरे यांचा आग्रह आणि दबावामुळेच लाईफ लाईनला महाराष्ट्रात 7 कोविड सेंटर चालवण्यासाठी देण्यात आले. 65 कोटी रुपयांचं पेमेंट करण्यात आलं. जी कंपनी अस्तित्वात नाही, त्या कंपनीने कंत्राट मिळवण्यासाठी बोगस कागदपत्रे सादर केली. उद्धव ठाकरे यांचा राईट हॅन्ड या कंपनीचा मालक आहे. त्याची चौकशी सरकार करणार का? असा सवाल किरीट सोमय्या यांनी विचारला होता. तसेच साळुंखेंना पुण्यातील 100 कोटींच्या जम्बो कोव्हिड सेंटरचं कंत्राट दिल्याचा आरोप त्यांनी केला होता.

संबंधित बातम्या:

कोण आहेत मुंबईतले चहावाले राजीव साळुंखे ज्यांना थेट पुण्यातलं कोविड सेंटर चालवायला मिळालं?

पुण्याच्या जम्बो कोव्हिड सेंटरमध्ये कोणताही भ्रष्टाचार नाही, अजित पवारांचं किरीट सोमय्यांना उत्तर

VIDEO: चहावाला पंतप्रधान होऊ शकतो तर मी कोव्हिड सेंटर चालवू शकत नाही का?; राऊतांमुळे सोमय्यांच्या टार्गेवर असलेल्या चहावाल्याचं ‘टीव्ही9’ला रोखठोक उत्तर

Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश.
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?.
'माझ्यापेक्षा जास्त अभ्यास असणाऱ्यांना...', पंकजा मुंडेंचं खोचक उत्तर
'माझ्यापेक्षा जास्त अभ्यास असणाऱ्यांना...', पंकजा मुंडेंचं खोचक उत्तर.
एसटी महामंडळात फ्री स्टाइल हाणामारी, दोन कंडक्टर आले आमने-सामने....
एसटी महामंडळात फ्री स्टाइल हाणामारी, दोन कंडक्टर आले आमने-सामने.....
फडणवीस, दादा नव्हे, या नेत्यामुळे मनसेची महायुतीसोबतची युती फिस्कटली?
फडणवीस, दादा नव्हे, या नेत्यामुळे मनसेची महायुतीसोबतची युती फिस्कटली?.
दिल्ली विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं, कधी होणार मतदान अन् निकाल कधी?
दिल्ली विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं, कधी होणार मतदान अन् निकाल कधी?.
बांगलादेशी बनला रत्नागिरीकर... शिरगाव ग्रामपंचायतीला पोलिसांची नोटीस
बांगलादेशी बनला रत्नागिरीकर... शिरगाव ग्रामपंचायतीला पोलिसांची नोटीस.
महाराष्ट्राची चिंता वाढली;7 वर्षीय मुलासह 13 वर्षीय मुलीला HMPVची लागण
महाराष्ट्राची चिंता वाढली;7 वर्षीय मुलासह 13 वर्षीय मुलीला HMPVची लागण.
मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'
मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'.
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी.