पुणे नाशिक महामार्गावर भीषण अपघात, 5 महिलांचा मृत्यू

पुणे शहरातून खेड तालुक्यातील शिरोली येथील मंगल कार्यालयात स्वयंपाकासाठी या महिला गेल्या होत्या. काम संपवून त्या महिला घरी जात होत्या. परंतु घरी पोहचण्यापुर्वीच काही महिलांना काळाने गाठले

पुणे नाशिक महामार्गावर भीषण अपघात, 5 महिलांचा मृत्यू
दोन दुचाकींच्या धडकेत दोघांचा मृत्यू
Follow us
| Updated on: Feb 14, 2023 | 12:13 PM

सुनिल थिगळे, राजगुरुनगर, पुणे : पुणे-नाशिक महामार्गावरील भीषण अपघात झाला. महामार्गावरील राजगुरुनगरजवळ असणाऱ्या शिरोली परिसरात सोमवारी मध्यरात्री हा अपघात झाला. या घटनेत भरधाव वेगात जाणाऱ्या अज्ञात वाहनाने रस्ता ओलांडणाऱ्या महिलांच्या घोळक्याला जोरदार धडक दिली. पुणे– नाशिककडे जाणाऱ्या लेनवर रात्री 11 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. या अपघातात पाच महिलांचा मृत्यू झाला असून तर 17 महिला जखमी झाल्या आहेत. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी पोलिसांनी अज्ञात वाहनचालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलीस चालकाचा शोध घेत आहेत.

कसा झाला अपघात

हे सुद्धा वाचा

पुणे नाशिक महामार्गावर खरापुडी फाटाजवळ महिला रस्ता ओलंडत होती. त्यावेळी पायी रस्ता ओलांडताना अज्ञात वाहनाने 17 महिलांना जोरदार धडक दिली. त्यात 5 महिलांचा मृत्यू झाला आहे. तर 17 महिला जखमी असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. सुशीला देढे, इंदुबाई कोंडीबा कांबळे ( वय ४६) अशी दोन मृत महिलांची नावे असून अन्य मृतांची नावे समजू शकली नाहीत. जखमी महिलांवर खाजगी आणि चांडोली ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. महिंद्रा कंपनीच्या कारने या महिलांना रस्ता ओलांडताना धडक दिली.

स्वयंपाक करुन घरी जात होत्या

पुणे शहरातून खेड तालुक्यातील शिरोली येथील मंगल कार्यालयात स्वयंपाकासाठी या महिला गेल्या होत्या. काम संपवून त्या महिला घरी जात होत्या. परंतु घरी पोहचण्यापुर्वीच काही महिलांना काळाने गाठले. दरम्यान याप्रकरणी पोलिसांनी अज्ञात वाहनचालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलीस चालकाचा शोध घेत आहेत.

तातडीने मिळाली मदत

अपघात झाल्यानंतर स्थानिक नागरिकांनी पोलिसांना माहिती दिली. यानंतर पोलिसांनी तातडीने मदत पुरवली. यामुळे जखमी महिलांना लवकर उपचार मिळाले. स्थानिक पोलिसांनी प्रशासकीय यंत्रणेसोबत संपर्क केला अन् तातडीने जखमी महिलांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. या महिलांना चांडोली ग्रामीण रुग्णालयासह राजगुरूनगर परिसरातील खासगी रुग्णालयात दाखल केले.

दुचाकीने पेट घेतला

एका दुसऱ्या घटनेत महाड – पंढरपूर मार्गावरील पुण्याच्या भोर तालुक्यातील वडगाव गावाजवळ रस्त्यावर धावणाऱ्या दुचाकीने अचानक पेट घेतला. गाडीने पेट घेतल्याचं लक्षात येताच चालकाने प्रसंगावधान दाखवत वेळीच दुचाकी रस्त्याच्या कडेला थांबविल्यानं मोठा अनर्थ टळलाय. दुचाकी शिरवळहून भोरच्या दिशेने येतं असताना ही घटना घडली. स्थानिकांनी तात्काळ मदतीसाठी धावून येतं गाडीवर पाणी मारून ही आग आटोक्यात आणली. या घटनेत दुचाकी जळून खाक झाली.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.