AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pune News | पुणे येथील या पद्धतीच्या अनेक हॉटेल्सवर महानगरपालिकेची कारवाई

pune rooftop restaurant | पुणे शहर खवय्यांसाठी प्रसिद्ध आहे. पुण्यातील अनेक हॉटेल्सच्या स्वादाची चर्चा होत असते. आता पुण्यातील विशिष्ट प्रकारच्या हॉटेल्स महानगरपालिकेच्या रडारवर आल्या आहेत. मनपाकडून या हॉटेल्सवर कारवाई केली जात आहे.

Pune News | पुणे येथील या पद्धतीच्या अनेक हॉटेल्सवर महानगरपालिकेची कारवाई
file photo
| Updated on: Oct 15, 2023 | 8:11 AM
Share

पुणे | 15 ऑक्टोंबर 2023 : पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील अनेक हॉटेल्स मनपाच्या रडारवर आले आहेत. नेहमी वेगवेगळ्या पदार्थ्यांच्या चवीसाठी प्रसिद्ध असलेल्या या हॉटेल्सवर पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेकडून कारवाई केली जात आहे. पुणे येथील आलिशान पद्धतीच्या असलेल्या ‘रुफटॉप हॉटेल्स’वर कारवाई केली जात आहे. मनपाकडून या हॉटेलसंदर्भात आक्रमक भूमिका घेत सरसकट कारवाई करण्याचे धोरण अवलंबले गेले आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये सुरु असलेले एकही रुफटॉप हॉटेल अधिकृत नाही. यामुळे पिंपरी चिंचवडमधील नऊ हॉटेल्सवर कारवाई करण्यात आली.

कोट्यवधी रुपयांचा बुडतोय कर

पिंपरी चिंचवड मनपाने केलेल्या पाहणीत शहरात 49 रुफटॉप हॉटेल्स आहे. या हॉटेल्स सुरु करताना बांधकामाची परवानगी घेतली गेली नाही. अग्नीशमन दलाची परवानगी नाही. या हॉटेल्समधील आवाजामुळे परिसरातील नागरिकांना त्रास होत असल्याच्या तक्रारी आल्या आहेत. तसेच या हॉटेल्समुळे कोट्यवधी रुपयांचा कर बुडत आहे. त्यामुळे महापालिकेने या हॉटेल्सवर कारवाई करण्यास सुरुवात केली. आतापर्यंत 9 रुफ टॉप हॉटेल्सवर महापालिकेने हातोडा चालवला आहे.

इमारतीच्या गच्चीवर हॉटेल्स

पुणे शहरातील वाकड, पिंपळे गुरव, पिंपळे सौदागर, चिंचवड, निगडी, स्पाईन रोड, भोसरी, आकुर्डी या भागांत रुफटॉप हॉटेल सुरु झाले आहेत. कोणतेही परवानगी न घेता किचन तयार करुन इमारतीच्या गच्चीवर हॉटेल सुरु करण्यात आले आहेत. या हॉटेल्सला मनपाकडून नोटीस बजावण्यात होती. त्यानंतर हॉटेल बंद झाल्या नाहीत. यामुळे मनपाने कारवाई सुरु केली आहे. वाकड परिसरात सर्वाधिक 19 रुफटॉप हॉटेल्स आहेत.

आवाजाचा परिसरातील लोकांना त्रास

पुणे येथील अनेक रुफटॉप हॉटेल्समध्ये बार आहेत. हे बार रात्री उशीरापर्यंत सुरु असतात. यामुळे हॉटेलमध्ये येणाऱ्या लोकांच्या आवाजाचा त्रास परिसरातील नागरिकांना होत असतो. बार असल्यामुळे कधीकधी भांडणे होतात. हॉटेलमध्ये गाणे सुरु असतात. त्या आवाजाचा त्रास होत असल्याच्या तक्रारी स्थानिक नागरिकांनी दिल्या आहेत. शहरात किचनसह सुरु असलेली एकही रुफटॉप हॉटेल अधिकृत नसल्याची माहिती मनपाचे अतिक्रमण विभागाचे सहायक आयुक्त विजयकुमार सरनाईक यांनी दिले.

त्यांच्यासोबत जाणं परवडणारं नाही! मलिकांबाबत शिरसाट यांचं मोठं विधान
त्यांच्यासोबत जाणं परवडणारं नाही! मलिकांबाबत शिरसाट यांचं मोठं विधान.
सुप्रिया सुळेंकडून मुख्यमंत्र्यांचे तोंडभरून कौतुक! म्हणाल्या...
सुप्रिया सुळेंकडून मुख्यमंत्र्यांचे तोंडभरून कौतुक! म्हणाल्या....
नाना पटोलेंचा भाजपवर सत्तेतून आमदार विकत घेतल्याचा आरोप
नाना पटोलेंचा भाजपवर सत्तेतून आमदार विकत घेतल्याचा आरोप.
हिंगोलीत कॉंग्रेसला खिंडार! प्रज्ञा सातव यांचा भाजपात प्रवेश
हिंगोलीत कॉंग्रेसला खिंडार! प्रज्ञा सातव यांचा भाजपात प्रवेश.
नागपूर सत्र न्यायालयाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी!
नागपूर सत्र न्यायालयाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी!.
ठाकरे बंधू भाजपचा पराभव करणार! संजय राऊतांचा मोठा दावा
ठाकरे बंधू भाजपचा पराभव करणार! संजय राऊतांचा मोठा दावा.
दोन मंत्री गेले, हा काळिमा! राऊतांचा सरकारवर गंभीर आरोप
दोन मंत्री गेले, हा काळिमा! राऊतांचा सरकारवर गंभीर आरोप.
त्यांना पुन्हा मंत्री करणं सोपं नाही! संजय राऊतांनी स्पष्टच सांगितले
त्यांना पुन्हा मंत्री करणं सोपं नाही! संजय राऊतांनी स्पष्टच सांगितले.
दादांची राष्ट्रवादी, शरद पवारांसोबत लढण्यास इच्छुक!
दादांची राष्ट्रवादी, शरद पवारांसोबत लढण्यास इच्छुक!.
नागपूर मनपा निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादीत चढाओढ!
नागपूर मनपा निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादीत चढाओढ!.