मोदीनंतर आता शाह महाराष्ट्रात, पुणे निवडणुकीत करणार एन्ट्री

अमित शाह यांचा महाराष्ट्र दौरा आगामी महापालिका निवडणुका आणि 2024 च्या लोकसभा निवडणुका लक्षात घेऊन आहे. महाराष्ट्रात भाजपची ताकद वाढवण्यासाठी करावी लागणाऱ्या तयारीचा आढावा ते घेणार आहेत.

मोदीनंतर आता शाह महाराष्ट्रात, पुणे निवडणुकीत करणार एन्ट्री
अमित शाह, केंद्रीय मंत्री
Follow us
| Updated on: Feb 12, 2023 | 12:46 PM

पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी मुंबई दौऱ्यावर होते. या दौऱ्यात त्यांनी महाराष्ट्रात दोन वंदे भारत एक्स्प्रेस गाड्या सुरु केल्या. मुंबई ते शिर्डी आणि मुंबई ते सोलापूर या गाड्या सुरु झाल्या. आता नरेंद्र मोदी यांच्या मुंबई दौऱ्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येणार आहेत. 17, 18 आणि 19 फेब्रुवारीला ते नागपूर, पुणे आणि कोल्हापूर दौऱ्यावर असतील. या दौऱ्यात शाह अनेक विकासकामांचे उद्घाटन करणार आहेत. तसेच भाजपच्या संघटनात्मक बैठकांना हजेरी लावणार आहे. पुण्याचा कसबा पेठ आणि पिंपरी चिंचवडचा चिंचवड निवडणुकीची रणनितीही त्यांच्या या दौऱ्यात ठरणार आहे.

भाजपचे चाणक्य म्हणून ओळखले जाणारे अमित शाह यांचा महाराष्ट्र दौरा आगामी महापालिका निवडणुका आणि 2024 च्या लोकसभा निवडणुका लक्षात घेऊन आहे. महाराष्ट्रात भाजपची ताकद वाढवण्यासाठी करावी लागणाऱ्या तयारीचा आढावा ते घेणार आहेत. तसेच कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीसाठी 26 फेब्रुवारीला मतदान होणार आहे. त्यावरही चर्चा होणार आहे.

पुस्तकाचे प्रकाशन

हे सुद्धा वाचा

‘मोदी @ 20’ हे पुस्तक 18 फेब्रुवारीला प्रकाशित होणार आहे. याशिवाय 19 फेब्रुवारीला शिवाजी महाराज यांची जयंती आहे. विधानसभा पोटनिवडणूक आणि शिवाजी महाराज यांची जयंती याचा फायदा घेण्यासाठी भाजपने अमित शाह यांना बोलवले असल्याची चर्चा आहे.

या दौऱ्यात दिवंगत बाबासाहेब पुरंदरे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित कार्यक्रमात ते उपस्थित राहणार आहेत. याआधी 17 फेब्रुवारीला अमित शहा नागपुरात अनेक विकासकामांचे उद्घाटन करणार असून 19 फेब्रुवारीला ते कोल्हापुरात जाहीर सभेला संबोधित करणार आहेत.

कसबा पेठेची तयारी

पुण्यातील कसबा पेठ पोटनिवडणुकीसाठी भाजप आणि काँग्रेसने जोरदार तयारी केली आहे. काँग्रेसचे बंडखोर उमेदवार बाळासाहेब दाभेकर यांनी राहुल गांधी यांनी सांगितल्यानंतर उमेदवारी मागे घेतली. परंतु भाजपच्या दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर त्यांच्या परिवारात भाजपने तिकीट दिले नाही.

यामुळे ब्राम्ह्मण समाज भाजपवर नाराज आहे. त्यामुळेच ब्राह्मण महासंघाचे अध्यक्ष अनिल दवे निवडणूक लढवत आहेत. या भागात ब्राह्मण मतदार 30 टक्के आहेत. दुसरीकडे महाविकास आघाडीचे संयुक्त उमेदवार म्हणून काँग्रेसने रवींद्र धंगेकर यांना तिकीट दिले आहे.

पिंपरीत रणनिती

भाजपचे दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप यांना पिंपरी चिंचवडने तिकीट दिले आहे. दुसरीकडे राष्ट्रवादीने महाविकास आघाडीचे संयुक्त उमेदवार म्हणून नाना काटे यांना रिंगणात उतरवले आहे. मात्र महाविकास आघाडीत सहभागी असलेले शिवसेना नेते राहुल कलाटे यांनी बंडखोरी करत उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्याचा फायदा भाजपला होणार आहे. अमित शाह यांच्या दौऱ्यात या सर्व रणनितींवर चर्चा होणार आहे.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.