“मी अजित पवार, महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतो की…” पुण्यात नेमके काय घडले?
ajit pawar birthday celebration: अजित पवार यांनी वाढदिवसाच्या एका दिवसापूर्वी कापला. कार्यकर्त्यांनी त्यांचा वाढदिवस आजच साजरा देखील केला. केक कापल्यानंतर अजित पवारांनी केक खाल्ला. यावेळी केकवरील मजकूर वाचून अजितदादांच्या चेहऱ्यावरील उमटलेले स्मित हास्य देखील लपून राहिले नाही.
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना अनेक वेळा मुख्यमंत्री पदाने हुलकावणी दिली. ते सर्वाधिक वेळा राज्याचे उपमुख्यमंत्री राहिले आहेत आणि सध्या त्यांची उपमुख्यमंत्रीपदाची पाचवी टर्म आहे. यासंदर्भात त्यांनीही यापूर्वी जाहीरपणे मनातील भावना व्यक्त केल्या आहेत. किती वेळ उपमुख्यमंत्री राहणार? मुख्यमंत्री केव्हा होणार? असा प्रश्न त्यांनाच पडला आहे. अजित पवार यांच्याप्रमाणे त्यांच्या समर्थकांनाही दादांनी मुख्यमंत्री व्हावे, अशीच मनोकामना केली आहे. यामुळेच पिंपरी-चिंचवडमधील अजित पवार यांच्या समर्थकांनी अनोखा केक आणला. अजित पवार यांचा २२ जुलै रोजी वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने अजित पवार यांनीच हा केक कापला. या केकवर लिहिले होते, “मी अजित आशा- अनंतराव पवार, महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतो की…”, आता या केकची चांगली चर्चा पुणे शहरात रंगली आहे. तसेच अनेक ठिकाणी अजितदादा भावी मुख्यमंत्री, असे बॅनर्स लागले आहेत.
किती वेळा उपमुख्यमंत्री राहणार
अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंड केला. शरद पवार यांच्यापासून वेगळी भूमिका घेत त्यांनी जवळपास ४० आमदारांसह पक्षावर दावा केला. त्यावेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला मुख्यमंत्रीपदाची संधी असूनही शरद पवार यांनी ती घेऊ दिली नाही, असे जाहीरपणे म्हटले. तसेच आता उपमुख्यमंत्री म्हणून किती वेळ काम करायचे. माझी ही पाचवी टर्म आहे. सर्वाधिक वेळा उपमुख्यमंत्री राहण्याचा माझा विक्रम झाला आहे, असे अजित पवार यांनी म्हटले होते.
अजित पवार यांच्या चेहऱ्यावर उमटले हास्य
अजित पवार भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनर्स पुणे आणि मुंबईत अनेक वेळा लागले होते. त्यावेळी सुप्रिया सुळे यांचे भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनर्स लागले होते. त्यामुळे राष्ट्रवादीमधील मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत बहीण-भाऊ असल्याचा मेसेज गेला होतो. त्यानंतर अजित पवार यांनी मागील वर्षी जून महिन्यात बंड केले. परंतु मुख्यमंत्री होण्याची त्यांची महत्वकांक्षा कायम आहे. त्यांच्या पक्षातील आमदार आणि मंत्रीही ही भावना बोलून दाखवत आहेत. यामुळे अजित पवार यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने ते मुख्यमंत्रीपदाची शपथ घेत असल्याचा मजकूर केकवर लिहिला.
अजित पवार यांचा वाढदिवस…कार्यकर्त्यांनी बनवला शपथविधी सोहळा…@MumbaiNCP @AjitPawarSpeaks #NCP pic.twitter.com/cx5TQqj1xE
— jitendra (@jitendrazavar) July 21, 2024
हा केक कापून अजित पवार यांनी वाढदिवसाच्या एका दिवसापूर्वी कापला. कार्यकर्त्यांनी त्यांचा वाढदिवस आजच साजरा देखील केला. केक कापल्यानंतर अजित पवारांनी केक खाल्ला. यावेळी केकवरील मजकूर वाचून अजितदादांच्या चेहऱ्यावरील उमटलेले स्मित हास्य देखील लपून राहिले नाही.