नाहीतर ठेकेदाराला बघून घेतो, उपमुख्यमंत्री अजितदादांनी भरला दम!
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आरोग्यवर्धीनी केंद्राचं उद्घाटन केलं. त्यावेळी अजितदादांनी कंत्राटदाराला चांगलाच दम भरला.
बारामती : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आरोग्यवर्धीनी केंद्राचं उद्घाटन केलं. त्यावेळी अजितदादांनी कंत्राटदाराला चांगलाच दम भरला. रणवरे नावाच्या कंत्राटदारानं काम केलं आहे. काम दर्जेदार केलंय. पण नेमकं काम कसं झालं ते पावसाळ्यात कळेल. नाहीतर ठेकेदाराला बघून घेतो. लाईटचं काम केलेल्या खपले या ठेकेदारालाही काम चांगलं नसेल तर खपवतो, अशा शब्दात अजित पवार यांनी ठेकेदारांना सूचनावजा दम भरलाय. या कार्यक्रमाला राज्यमंत्री दत्तात्रय भरणेही उपस्थित होते.(Ajit Pawar inaugurates health center in Malegaon)
माळेगाव इथल्या आरोग्यवर्धिनी केंद्राचं उद्धान अजित पवारांनी केलं. त्यावेळी बोलताना विकासकामं करणं हे आमचं प्राधान्य आहे. सामान्य माणसांसाठी शासनाकडून आरोग्यकेंद्र उभारलं जातं. माळेगावसारखं प्राथमिक आरोग्य केंद्र काटेवाडीतही नाही, असं अजित पवार म्हणाले. यावेळी पक्षानं दिलेली जबाबदारी यशस्वीपणे पार पाडायची असते, असा सल्लाही अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना दिला. तसंच आपल्या कार्यकाळात विकासकामं झाल्याचं एक वेगळंच समाधान असतं. आरोग्यविषयक सुविधा कमी पडू नयेत याकडे सरकारचं लक्ष असल्याचंही अजित पवारांनी यावेळी सांगितलं.
मास्क न वापरणाऱ्यांना कानपिचक्या
आरोग्यकेंद्राच्या उद्घाटन कार्यक्रमावेळी बहुतेक लोकांनी मास्क घातले नव्हते. त्यावरुन अजितदादांनी उपस्थितांना कानपिचक्या दिल्या. इथे तर कुणी मास्कच घातले नाहीत. आता कोरोना कुठल्या कुठे पळून जाईल, अशी मिश्किल टिप्पणी करताना, असं करु नका. काळजी घ्या. मागच्या काळात कोरोनामुळे फार मोठं नुकसान झालं आहे. आम्ही तर जबाबदारी घेतोच आहोत. पण तुम्हीही खबरदारी घेणं आवश्यक असल्याचं आवाहन अजित पवार यांनी उपस्थितांना केलंय.
अजितदादांच्या कार्यकर्त्यांना कानपिचक्या
अजित पवार यांच्या हस्ते बारामतीत पोलिओ लसीकरणाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. कार्यकर्त्यांशी संवाद साधताना अजितदादांनी जोरदार बॅटिंग केली. कार्यकर्त्यांचे कान उपटतानाच त्यांना फसवणुकीपासून सावध राहण्याच्या सूचनाही दिल्या. शिवाय राष्ट्रवादीला नंबर वनचा पक्ष करण्यासाठी कंबर कसून काम करण्याचे आवाहनही त्यांनी केलं.
अजित पवार यांनी यावेळी कार्यकर्त्यांना कोरोनापासून सावध राहण्याच्या सूचना केल्या. अजूनही कोरोनाबद्दल काळजी घ्या. मास्क वापरा, सुरक्षित अंतर ठेवा. तुम्हाला स्पष्ट ऐकता यावं यासाठी मी मास्क काढलाय. भाषण झालं की पुन्हा मास्क घालणार. तुम्हीही सर्वजण दक्षता घ्या. परदेशात सध्या परिस्थिती गंभीर आहे. त्यामुळे आपणही दक्षता घेण्याची गरज आहे. सध्या आपल्याकडे कोरोनाचं प्रमाण कमी झालंय. त्याचं सर्व श्रेय कोरोना योद्ध्यांचं आहे, असं सांगतानाच नाव चुकल्यामुळे मी जरा चिडलो. काम चांगलं झालं की बरं वाटतं. नाहीतर चिडावं लागतं. तुम्ही म्हणाल, हा बाबासारखाच चिडतो, असं अजित पवार म्हणाले. पवार यांनी हे भाष्य करताच उपस्थितांमध्ये एकच खसखस पिकली.
संबंधित बातम्या :
‘त्या’ भगिनीला काय सांगू; इथे सर्वच गोष्टी विकण्याचा कार्यक्रम; जयंत पाटलांचा थेट मोदींवर निशाणा
Ajit Pawar : इक्बाल चहल, शेवटी माझ्या लेकामुळेच मी BMC मध्ये आलो : अजित पवार
Ajit Pawar inaugurates health center in Malegaon