Pune News | पुण्यात 3 तास खलबतं, अजित पवार यांच्या मोलाच्या सूचना, पडद्यामागे काय घडतंय?

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घडामोडींना प्रचंड वेग आलाय. विशेष म्हणजे पुण्यात प्रचंड घडामोडी घडत आहेत. एकीकडे मनसे अध्यक्ष राज ठाकरे सातत्याने पुणे दौऱ्यावर जात आहेत. तर दुसरीकडे अजित पवार यांनीदेखील पुणे शहराला गांभीर्याने घेतल्याचं बघायला मिळत आहे.

Pune News | पुण्यात 3 तास खलबतं, अजित पवार यांच्या मोलाच्या सूचना, पडद्यामागे काय घडतंय?
Follow us
| Updated on: Oct 21, 2023 | 4:41 PM

अभिजित पोते, Tv9 मराठी, पुणे | 21 ऑक्टोबर 2023 : उपमुख्यमंत्री अजित पवार आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर चांगलेच कामाला लागले आहेत. राज्यात सत्तांतर झालं त्यावेळी अजित पवार विरोधात होते. ते विरोधी पक्षनेते होते. त्यांनी विधानसभेत अनेकदा सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला. याशिवाय सभागृहाच्या बाहेर, प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया देताना देखील त्यांनी भाजप आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला होता. पण या सरकारला एक वर्ष पूर्ण होत नाही तेवढ्यात अजित पवार देखील सत्तेत सहभागी झाले. ते राज्य सरकारमधील प्रमुख मंत्री बनले. त्यांना अर्थ खातं मिळालं.

अजित पवार यांना अर्थ खातं मिळू नये, यासाठी शिंदे गटाच्या आमदारांनी विरोध केला होता. कारण महाविकास आघाडी सरकार असताना अजित पवार यांनी शिवसेनेच्या आमदारांना पुरेसा निधी दिला नव्हता, असा या आमदारांचा आरोप होता. पण भाजप नेत्यांच्या समजुतीतून अजित पवार यांना अर्थ खातं मिळालं. अर्थ खातं मिळाल्यानंतर अजित पवारांना पुण्याचं पालकमंत्रीपददेखील हवं होतं. पण हे पद भाजपचे मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे होतं. पुण्याच्या पालकमंत्रीपदावरुन चंद्रकांत पाटील यांच्या गटात धुसफूस होती. पण अखेर त्यांचं पुण्याचं पालकमंत्रीपद गेलं आणि अजित पवारांना पालकमंत्रीपद मिळालं.

अजित पवार मंत्री झाल्यानंतर पहिल्यांदा बारामतीत गेले तेव्हा त्यांचं जंगी स्वागत करण्यात आलं. अजित पवार यांच्या गटाने बारामतीत जोरदार शक्तीप्रदर्शन केलं. यावेळी अजित पवार यांनी बारामतीकरांना उद्देशून महत्त्वाचं वक्तव्य केलं. बारामतीचा सर्वाधिक विकास करण्यासाठी आपण प्रयत्न करत आहोत. त्यासाठीच आपण ही भूमिका घेतली आणि निधीची कोणतीही कमी भासणार नाही. सर्व रस्ते बनतील, विकास होईल, असं अजित पवार म्हणाले. सत्ता असली की अनेक गोष्टी आपल्या हातात असतात. हेच अजित पवारांना यावेळी सूचवायचं होतं, अशी चर्चा नंतर राजकीय वर्तुळात सुरु होती.

अजित पवारांची राष्ट्रवादीच्या माजी नगरसेवकांसोबत बैठक

अजित पवार यांच्या कामकाजांची गाडी सुसाट धावत आहे. आगामी लोकसभा, विधानसभा आणि महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अजित पवार पुण्यात चांगलेच कामाला लागले आहेत. अजित पवारांची आज पुणे शहरातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी नगरसेवकांसोबत बैठक पार पडली. अजित पवारांनी जवळपास 3 तास ही बैठक घेतली.

आपल्या आपल्या प्रभागात जनतेची कामं करा, प्रभागातील सगळे प्रश्न आणि अडचणी मार्गी लावा, असा आदेश अजित पवारांनी दिला. कुणाच्याच प्रभागात विकास कामांना निधी कमी पडू देणार नाही, असं आश्वासन अजित पवारांनी यावेळी दिलं. “आवश्यक असणाऱ्याच प्रकल्पाना निधी देणार, वायफळ खर्च टाळा”, असंदेखील अजित पवार यावेळी म्हणाले. तसेच राहिलेली सगळी कामे पूर्ण करा, अशा सूचना अजित पवारांनी महापालिका अधिकाऱ्यांना दिल्या.

मला काही सांगायचंय..., महाराष्ट्रातील राजकारण आता रंगमंचावर सादर होणार
मला काही सांगायचंय..., महाराष्ट्रातील राजकारण आता रंगमंचावर सादर होणार.
'त्या' मनसे कार्यकर्त्याचा मारहाणीमुळे मृत्यू,पोस्टमार्टम रिपोर्ट समोर
'त्या' मनसे कार्यकर्त्याचा मारहाणीमुळे मृत्यू,पोस्टमार्टम रिपोर्ट समोर.
'त्या दोन्ही वाचाळविरांना आवरा, अन्यथा..', नाना पटोलेंचा सरकारला इशारा
'त्या दोन्ही वाचाळविरांना आवरा, अन्यथा..', नाना पटोलेंचा सरकारला इशारा.
संजय गायकवाडांची वादग्रस्त वक्तव्यावरून माघार? पण राहुल गांधींसमोर अट
संजय गायकवाडांची वादग्रस्त वक्तव्यावरून माघार? पण राहुल गांधींसमोर अट.
'चेहऱ्याला बघून चाटायचं? तो कितीही चांगला...', बच्चू कडूंची जीभ घसरली
'चेहऱ्याला बघून चाटायचं? तो कितीही चांगला...', बच्चू कडूंची जीभ घसरली.
‘एक देश, एक निवडणूक’ प्रस्तावाला मोदी कॅबिनेटची मंजुरी
‘एक देश, एक निवडणूक’ प्रस्तावाला मोदी कॅबिनेटची मंजुरी.
अमित ठाकरेंना दिडोंशी विधानसभेतून उमेदवारी मिळणार?
अमित ठाकरेंना दिडोंशी विधानसभेतून उमेदवारी मिळणार?.
पुण्यात 27 तास झाले मिरवणूक सुरूच,गेल्या वर्षीचा रेकॉर्ड ब्रेक होणार?
पुण्यात 27 तास झाले मिरवणूक सुरूच,गेल्या वर्षीचा रेकॉर्ड ब्रेक होणार?.
रश्मी ठाकरे राज्याच्या पहिल्या मुख्यमंत्री? काय म्हणाल्या पेडणेकर?
रश्मी ठाकरे राज्याच्या पहिल्या मुख्यमंत्री? काय म्हणाल्या पेडणेकर?.
'२०२४ ला वाटच लावणार, मराठ्यांचे पोरं आता...',मनोज जरांगेंचा थेट इशारा
'२०२४ ला वाटच लावणार, मराठ्यांचे पोरं आता...',मनोज जरांगेंचा थेट इशारा.