गौतमी पाटील बैलासमोर नाचेल नाही तर आणखी कुणासमोर तुला काय त्रास आहे?; अजितदादांनी उडवली टर

राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी बारसूला जाणार असल्याचं म्हटलं आहे. तसेच बारसू प्रकरणी आंदोलकांवर लाठीमार करू नका. त्यांच्याशी चर्चा करा. त्यांचं म्हणणं ऐकून घ्या आणि मार्ग काढा, असा सल्लाही अजित पवार यांनी दिला आहे.

गौतमी पाटील बैलासमोर नाचेल नाही तर आणखी कुणासमोर तुला काय त्रास आहे?; अजितदादांनी उडवली टर
Follow us
| Updated on: Apr 29, 2023 | 9:31 AM

पुणे : प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटील हिचा मुळशीत नृत्याचा कार्यक्रम पार पडला. यावेळी गौतमी हिने बैलासमोर डान्स केला. तिचा हा व्हिडीओ तुफान व्हायरल झाला. चक्क बैलासमोर गौतमी नाचल्याने त्याची चर्चाही सुरू झाली आहे. एका पत्रकाराने राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांना याबाबतच प्रश्न विचारला. त्यावर अजित पवार यांनी आपल्या खास शैलीत उत्तर देत या प्रश्नाचीच टर उडवली. यावेळी अजित पवार यांनी बारसूतील आंदोलनापासून काँग्रेसचे नेते मल्लिकार्जुन खरगे यांच्यावरील विविध प्रश्नांना उत्तरे दिली.

गौतमी पाटील बैलासमोर नाचेल किंवा आणखी कोणासमोर नाचेल, तुला काय त्रास आहे? तिचं काम आहे ती करणार. बैल गाडामध्ये पहिला आलेला हा बैल आहे. त्यासाठीच हा कार्यक्रम घेण्यात आला आहे. असं तिला सांगितलं असेल. त्यामुळे तिनेही नृत्य करण्यास होकार दिला असेल. त्यामुळे कुणाला त्रास होण्याचं काय कारण आहे, असा चिमटा अजित पवार यांनी काढला. बारामतीमध्ये अवकाळी पाऊस आहे. हवामान खात्याने अजून गारपिट होणार असल्याचं सांगितलं आहे. ज्या शेतात पीक आहेत त्याबद्दल मुख्यमंत्री सांगतात ताबडतोब मदत करेल. पण शेतकऱ्यांना मदत होत नाही. हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांना मदत करायला हवी, असं एका प्रश्नाला उत्तर देताना अजित पवार म्हणाले.

हे सुद्धा वाचा

बारसूत पर्यावरणाचा ऱ्हास होणार नाही हे बघितलं पाहिजे. उदय सामंत यांच्याशी बोललो. त्यांना सांगितलं की तिथल्या लोकांचा कुठल्या गोष्टीला विरोध आहे हे विचारायला हवं. तिथल्या लोकांचा व्यवसाय अडचणीत येऊ शकतो म्हणून हा विरोध आहे का? का इतर कारण आहेत? हे बघायला हवं. लाखो लोकांना यातून रोजगार मिळणार आहे. पण परिसरातील कायमचे नुकसान होणार असेल तर विरोध नक्की करा. पण त्यातून जर फायदा होणार असेल तर त्याचा विचार करायला हवा, असं ते म्हणाले.

चर्चा करून निर्णय घ्या

राजन साळवी यांनी केलेलं वक्तव्य मी पाहिलेलं आहे. साळवी उद्धव ठाकरे यांच्यासोबत आमदार राहिले आहेत. साळवी यांनी बारसूला पाठिंबा दिला आहे. पर्यावरणाचा ऱ्हास होणार नसेल आणि त्या ठिकाणी असलेल्या जनजीवनावर जर परिणाम होणार नसेल तर प्रकल्पावर सर्वांशी बोलून चर्चा करावी. जे विरोध करत आहेत त्यांना विश्वासात घ्यायला हवं. उद्धव साहेब म्हणाले आहेत मी जनते सोबत आहे. राष्ट्रवादी ची भूमिका विकासाबाबत नेहमी सकारात्मक राहिली आहे. अनेक प्रकल्प राज्यातून बाहेर गेलेले आपण पाहिले. पण यातून जर रोजगार येऊन आणि तिथे वातावरण आणि निसर्गाला बाधा येणार नसेल तर शहानिशा करायला हवी, असं त्यांनी सांगितलं.

भोपाळची पुनरावृत्ती नको

स्वतः उदय सामंत यांनी शरद पवार यांची भेट घेतली आहे. या प्रकल्पाच्या निमित्ताने भोपाळची पुनरावृत्ती व्हायला नको. काही लोकांनी बारसूमध्ये आंदोलन सुरू केलं आहे. त्यांच्यावर लाठीचार्ज सारखे प्रकार होऊ नये. नागरिकांना बैठीकला बोलवायला हवं. लोकांच्या शंकांचं निरसन होईपर्यंत सर्व्हेक्षण थांबवा असं मी म्हणालो होतो. गरज पडली तर सर्वपक्षीय बैठक घ्यायला हवी. जन सुनावणी घ्यावीच लागेल. मी बारसू ला जायचं ठरवले नाही पण वेळ पडली तर जाईल, असंही त्यांनी सांगितलं.

बॅनर लावू नका

भावी मुख्यमंत्री म्हणून अजित पवार यांचे बॅनर्स लागले आहेत. त्यावर बोलताना अजितदादांनी अतिउत्साही कार्यकर्त्यांचे कान टोचले आहेत. माझे बॅनर लावू नका. असे बॅनर लावून कोणी मुख्यमंत्री होत नाही. 145 मॅजिक फिगर लागते. एकनाथ शिंदे यांनी युक्ती लढवून ती मिळवली आणि मुख्यमंत्री झाले आहेत. त्यामुळे बॅनरबाजी करू नका, असं पवार म्हणाले.

मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.
खातेवाटपानंतर पालकमंत्रिपदासाठी रस्सीखेच, कोणत्या जिल्ह्यात स्पर्धा?
खातेवाटपानंतर पालकमंत्रिपदासाठी रस्सीखेच, कोणत्या जिल्ह्यात स्पर्धा?.
महायुतीचं खातेवाटप जाहीर, फडणवीस-दादा अन् शिंदेंच्या वाटेला कोणत खातं?
महायुतीचं खातेवाटप जाहीर, फडणवीस-दादा अन् शिंदेंच्या वाटेला कोणत खातं?.