AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राजकीय मतभेद विसरून वाडेश्वर कट्ट्यावर रंगला सर्वपक्षीय ‘दिवाळी फराळ’

पुण्याची राजकीय परंपरा आहे. विचारांची लढाई ही विचारांनीच लढली जाते. आज सणाचा दिवस आहे. शेवटी निवडणूका येतात- जातात.  मतभेद असावेत, मनभेद नसावेत, असा या दिवाळी फराळ मागचा उद्देश आहे.

राजकीय मतभेद विसरून वाडेश्वर कट्ट्यावर रंगला सर्वपक्षीय 'दिवाळी फराळ'
Diwali Faral' on Wadeshwar Katta
| Edited By: | Updated on: Nov 03, 2021 | 1:19 PM
Share

पुणे- यंदा दिवाळीत राज्यात ठिकठिकाणी राजकीय फटाके फुटत असताना पुण्यातल्या सगळ्या राजकीय पक्षांच्या शहराध्यक्षांनी एकमेकांचे तोंड गोड करत दिवाळी साजरी केली. गेल्या अनेक वर्षापासून वाडेश्वर कट्ट्यावर सुरू असलेली दिवाळी फराळ कार्यक्रमाची परंपरा यंदाही कायम राहिली. पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ(Murlidhar Mohal)  आणि माजी महापौर प्रशांत जगताप (Prashant Jagtap)यांनी दिवाळी आधीच एकमेकांवर आरोप करत फटाके फोडले होते. आज वाडेश्वर कट्ट्यावर मात्र एकमेकांना लाडू भरवून तोंड गोड करत गळाभेट घेतली. वाडेश्वर कट्ट्याने गेली अनेक वर्षे जपलेली संवादाची परंपरा यानिमित्ताने पुणेकरांना अनुभवता आली.

”पुण्याची राजकीय परंपरा आहे. विचारांची लढाई ही विचारांनीच लढली जाते. आज सणाचा दिवस आहे. शेवटी निवडणूका येतात- जातात.  मतभेद असावेत, मनभेद नसावेत, असा या दिवाळी फराळ मागचा उद्देश आहे. अंकुश आण्णा व त्यांच्या टीमच्या वतीनं वाडेश्वर कट्ट्यावर दिवाळी फराळ कार्यक्रमाचं आयोजन  केलं. या दिवाळी फराळाच्या निमित्ताने, मागील राजकीय मतभेद विसरून सर्वांनी एकत्र येवून, चांगल्या भावनेनं राजकारण करु”, असं मत महापौर मुरलीधर मोहोळ यांनी व्यक्त केले. ”भलीही पक्षांची विचारधारा वेगवेगळी असली, पक्षबांधणीसाठी प्रयत्न करत असले तरी कोणत्या प्रकारचा वैयक्तिक आकस मनात नसतो.  एकमेंकावरील आरोप हे शहराच्या विकासासाठी असतात त्यात कोणत्याही प्रकारचा मन भेद नसतो”, अशी भावना माजी   महापौर प्रशांत जगताप यांनी व्यक्त केली.

या फराळाच्या कार्यक्रमासाठी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष . प्रशांतदादा जगताप, मनसेचे शहराध्यक्ष वसंत मोरे, सभागृह नेते गणेश बीडकर आणि काँग्रेसचे गटनेते आबा बागुल सतीश देसाई , श्रीकांत शिरोळे, गोपाळ चिंतल आणि ,संदीप खर्डेकर उपस्थित होते.

संबंधित बातम्या :

इन्स्टावर ओळख, परदेशात पायलट असल्याचं सांगून पुणेकर महिलेला 10 लाखांना गंडा

रेल्वेत नोकरीच्या आमिषाने चौघांना गंडा, पिंपरीत आरोपीकडून 26 लाखांची फसवणूक

मराठी अन् मुस्लिम मतदारांच्या ध्रुवीकरणासाठी ठाकरे बंधूंची रणनिती ठरली
मराठी अन् मुस्लिम मतदारांच्या ध्रुवीकरणासाठी ठाकरे बंधूंची रणनिती ठरली.
मोदी आणि एपस्टीनचं काय नातं? एपस्टीन प्रकरणावरून चव्हाणांचा थेट सवाल
मोदी आणि एपस्टीनचं काय नातं? एपस्टीन प्रकरणावरून चव्हाणांचा थेट सवाल.
भाजपात इनकमिंग सुरूच, 22 नगरसेवकांसह पदाधिकाऱ्यांचा पक्षात प्रवेश
भाजपात इनकमिंग सुरूच, 22 नगरसेवकांसह पदाधिकाऱ्यांचा पक्षात प्रवेश.
बाबरच्या नावाने मशीद बांधली तर कारसेवक तिथे जातील अन्... राणांचा इशारा
बाबरच्या नावाने मशीद बांधली तर कारसेवक तिथे जातील अन्... राणांचा इशारा.
BMC निवडणुकीसाठी मनसे अ‍ॅक्टिव्ह...राज ठाकरेंच्या मनसेची मोर्चेबांधणी
BMC निवडणुकीसाठी मनसे अ‍ॅक्टिव्ह...राज ठाकरेंच्या मनसेची मोर्चेबांधणी.
ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात भाजपची रणनीती, शिंदे सेना-BJP समान जागा लढणार
ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात भाजपची रणनीती, शिंदे सेना-BJP समान जागा लढणार.
3 वर्गमित्र, 3 वेगळे पक्ष अन् प्रभाग एक... राजकारणापलीकडची मैत्री
3 वर्गमित्र, 3 वेगळे पक्ष अन् प्रभाग एक... राजकारणापलीकडची मैत्री.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? युगेंद्र पवारांनी एका वाक्यात म्हटलं..
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? युगेंद्र पवारांनी एका वाक्यात म्हटलं...
मुंबईत शिंदेंची सेना खरंच स्वबळावर लढणार की 84 जागांसाठी दबाव?
मुंबईत शिंदेंची सेना खरंच स्वबळावर लढणार की 84 जागांसाठी दबाव?.
माणिकराव कोकाटे यांना जामीन मंजूर पण आमदारकीचा निर्णय अध्यक्षांकडे!
माणिकराव कोकाटे यांना जामीन मंजूर पण आमदारकीचा निर्णय अध्यक्षांकडे!.