मृत्यूनंतरही मरणयातना संपेना, पुण्यासारख्या शहरात ना मिळाली ॲम्बुलन्स ना मिळाली शववाहिका
Pune News : पुणे शहरात एका कुटुंबाला मृतदेह घेऊन रात्रभर भटकावे लागले. त्या कुटुंबाला रुग्णााहिका मिळाली नाही अन् शवागारात जागाही मिळाली नाही. कारण शवागार बंद होते. स्मार्ट सिटीमधील या प्रकारामुळे सर्वांना धक्का बसला आहे.
अभिजित पोते, पुणे : मृत्यूनंतरही मरणयातना संपेना, असे प्रकार अनेकवेळा दुर्गम भागात घडतात. कारण अजूनही त्या ठिकाणी पायाभूत सुविधा झालेल्या नाहीत. परंतु पुणे सारख्या स्मार्ट सिटीमध्ये मृत्यूनंतरही मरणायातना झाल्याचा प्रसंग येऊ शकतो का? या प्रश्नाचे उत्तर सर्व जणांकडून नाही मिळणार. पुणे सारख्या शहरात अनेक सरकारी योजना आहेत. सरकारी रुग्णालये आहेत. त्यांच्याकडे रुग्णवाहिकेपासून अनेक सुविधा आहेत. सोबत सामजिक अन् राजकीय पक्षांकडून आरोग्यसेवा दिली जाते. रुग्णवाहिका, शववाहिका दिली जाते, असे सर्व असताना पुण्यात एक कुटुंब रात्रभर शववाहिकेसाठी फिरले. परंतु त्यांना शववाहिका मिळाली नाही अन् रुग्णवाहिका मिळाली नाही.
काय घडली घटना
देशातील १०० स्मार्टसिटी शहरामध्ये पुण्याचा समावेश आहे. पुण्यात स्मार्टसिटीचे अनेक प्रकल्प सुरु आहे. स्मार्ट सिटी मिशनमध्ये मूलभूत सुविधा असतात. त्यात पाणीपुरवठा, वीजपुरवठा, स्वस्त सार्वजनिक वाहतुकीचा पर्याय, स्वस्त घरे या सुविधा असतात. ई-गव्हर्नन्स, लोकसहभाग, पर्यावरण संवर्धन, नागरिकांची सुरक्षा, महिला, बालके व वृद्धांचे आरोग् शिक्षण सुविधांना प्राधान्य देण्यात येते. परंतु स्मार्ट सिटी पुण्यात मृत्यू झालेल्या व्यक्तीसाठी त्याच्या कुटुंबियांना पुण्यात रात्रभर रुग्णवाहिका किंवा शववाहिका मिळाली नाही अन् शवागारही बंद होते. स्मार्ट सिटी पुण्यात मृत्यूनंतरही मृतदेहाची थट्टा झाली.
कुठे घडला प्रकार
पुणे शहरातील कॉन्टेन्टमेन्ट भागात धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पुणे शहरातील कॅन्टोन्मेंटमधील एका कुटुंबावर रात्रीच्या वेळी मृतदेह घेऊन वणवण करण्याची वेळ आली. याला कॅन्टोन्मेंटमधील प्रशासनाचा गलथानपणा जबाबदार असल्याचा आरोप आता सामान्य नागरिकांकडून केला जात आहे. मृत्यूनंतर मृतदेह नेण्यासाठी शव वाहिनीसाठी चालक मिळाला नाही. प्रमोद चाबुकस्वार यांचं कुटुंब वृद्ध महिलेचा मृतदेह घेऊन पुण्यात रात्रभर भटकत राहिले.
शवागार होते बंद
नवा मोदीखाना कँप येथून केवळ 500 मीटर अंतरावरील पटेल रुग्णालयात घरी मृत्यू झालेल्या 95 वर्षीय वृद्धेला शवागारात ठेवण्यासाठी रात्री 10 वाजता प्रमोद चाबुकस्वार निघाले होते. परंतु पुणे कॅन्टोन्मेंट हॅास्पिटलचे शवागारही बंद होते. त्यानंतर नातेवाइकांनी बोर्डाचे धोबी घाट येथील वाहन तळ गाठले. मात्र, त्या ठिकाणी शववाहिनी चालविण्यासाठी चालकच नव्हता. अखेर मृतदेह रिक्षातून रूग्णालयात मृतदेह आणला तर शवागारही बंद पडलेलं होतं. या सगळ्या गोंधळानंतर अनेक तासाने चाबुकस्वार कुटुंबाने मृतदेह ससून रुग्णालयात नेला. त्यानंतर त्या मृतदेहाच्या मरणानंतर संपल्या.