Amruta Fadnavis | वाईन ही दारुच, मोजक्या लोकांच्या फायद्यासाठी विक्रीचा निर्णय; अमृता फडणवीस यांची घणाघाती टीका
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांनीदेखील सरकारला लक्ष्य केलं. सुपर मार्केटमध्ये वाईन ठेवण अयोग्य आहे. वाईन ही दारूच आहे. दुकानात वाईन ठेवण्यास परवाना देऊन महाविकास आघाडी सरकार काही लोकांचा फायदा करत आहे, असा आरोप अमृता फडणवीस यांनी केलाय.
पुणे : सुपरमार्केटमध्ये वाईन (Wine) विक्री करण्यास राज्य सरकारने (State Government) परवानगी दिली आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या निर्णयानंतर विरोधकांकडून राज्य सरकारवर टीका केली जात आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांनीदेखील सरकारला लक्ष्य केलं. सुपर मार्केटमध्ये वाईन ठेवण अयोग्य आहे. वाईन ही दारूच आहे. दुकानात वाईन ठेवण्यास परवाना देऊन महाविकास आघाडी सरकार काही लोकांचा फायदा करत आहे, असा आरोप अमृता फडणवीस यांनी केलाय. त्या पुणे जिल्ह्यातील लोणावळा येथे माध्यमांशी बोलत होत्या. अमृता फडणवीस यांच्या अगोदर देवेंद्र फडणवीस यांनीदेखील महाराष्ट्राचे मद्यराष्ट्र होऊ देणार नाही, असे ठणकावत राज्य सरकारच्या या निर्णयाचा तीव्र विरोध केला होता. या मुद्द्यावरुन भाजप तसेच इतर विरोधी पक्षांनी सरकारला घेरलं आहे.
काही लोकांच्या फायद्यासाठी वाईन विक्री करण्यास परवानगी
“वाईन ही दारूच आहे. वाईन सुपर मार्केटमध्ये ठेवणं अयोग्य आहे. लहान मूल, महिला नेहमी त्या ठिकाणी जातात. वाईन दुकानात ठेवण्यास परवाना देऊन महाविकास आघाडी सरकार काही लोकांचा फायदा करत आहे,” असे अमृता फडणवीस म्हणाल्या. तसेच पुढे बोलताना त्यांनी ऑफलाईन परीक्षेविरोधात विद्यार्थ्यांनी छेडलेल्या आंदोलनाबद्दलही सडेतोड भाष्य केले. “आज राज्यात विद्यार्थी रस्त्यावर उतरले आहेत. महाविकास आघाडी सरकारमधील अर्ध्या नेत्यांना महाराष्ट्रात काय चालले आहे, हे माहीत नसतं. कुठलाही विभाग घ्या सगळीकडे नुसती धांदल सुरू आहे. विद्यार्थी आणि एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांकडे सरकार दुर्लक्ष करत आहे. ते केवळ मूठभर लोकांसाठी झटतात,” असा टोला अमृता फडणवीस यांनी लगावला.
शेतकऱ्यांच्या हितासाठी निर्णय
राज्यात किराणा दुकान आणि सुपर मार्केटमध्ये वाईन विक्रीसाठी (wine) उपलब्ध करून देण्याचा निर्णय 27 जानेवारी रोजी घेण्यात आला. जे सुपर मार्केट एक हजार स्क्वेअर फुटाच्यावर आहे; तिथे एक स्टॉल टाकून वाईन विक्रीला मुभा देण्यात आलीय. दहा वर्षांपूर्वीचा हा प्रस्ताव होता, त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला. शेतकऱ्यांच्या उत्पादनाला चालना मिळावा यासाठी हा निर्णय घेण्यात आला, असे राज्य सरकारने सांगितले आहे. शेतकऱ्यांच्या फल उत्पादनावर वायनरी चालत असल्याने हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आल्याचं राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी सांगितलं होतं.
इतर बातम्या :
समीर वानखेडे प्रकरणात नवाब मलिकांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश, मोहित कंबोज यांचा दावा
लव्ह ऑट फस्ट साईट, आयशानं एका नजरेत घायाळ केलं जग्गु दादाला, जाणून घ्या दोघांची लव्हस्टोरी