ZP शाळेतील १२ वर्षाच्या मुलीच्या नृत्याने माजवली धूम, अमृता खानविलकरकडून कौतूक, पाहा व्हिडिओ

कोल्हापुरच्या शाहूवाडी तालुक्यातील प्राथमिक शाळेत शिकणारी हर्षदा कांबळे. या १२ वर्षाच्या मुलीने सोशल मीडियावर धूम माजवली आहे. तिच्या नृत्याचा अविष्कार पाहून कौतूक करण्याचा मोह अमृता खानविलकर यांनाही आवरता आला नाही.

ZP शाळेतील १२ वर्षाच्या मुलीच्या नृत्याने माजवली धूम, अमृता खानविलकरकडून कौतूक, पाहा व्हिडिओ
कोल्हापूरमधील हर्षदाचा डान्सImage Credit source: टीव्ही९ नेटवर्क
Follow us
| Updated on: Mar 22, 2023 | 2:42 PM

कोल्हापूर : देशातील ग्रामीण भागात अनेक नवरत्न असतात. फक्त या नवरत्नांचा शोध लागावा लागतो. मग क्रीडापासून अभ्यासापर्यंत गायनापासून नृत्यापर्यंत अनेक ठिकाणी ही छुपे रत्न सापडतात. आता सोशल मीडियामुळे या रत्नांना चांगला वाव मिळत आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकणाऱ्या १२ वर्षांच्या मुलीचे नृत्य सध्या तुफान व्हायरल होत आहे. तिचा नृत्य अविष्कार अचंबित करणार आहे. नृत्याचे कोणतेही शास्त्रय धडे न घेता तिने केलेल्या या नृत्याचे सोशल मीडियावर जोरदार कौतूक होत आहे.

कोल्हापुरच्या शाहूवाडी तालुक्यातील अनुस्कुरा गावातील प्राथमिक शाळेत ही मुलगी शिकते. इयत्ता सहावीत शिकणारी या मुलीचे नाव आहे हर्षदा कांबळे. हर्षदाने चंद्रा गाण्यावर आपला नृत्याविष्कार सादर केला आहे. तिने शाळेत केलेला हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. हर्षदा हिचा हा व्हायरल झालेला व्हिडिओ 8 मार्च जागतिक महिला दिनानिमित्त शाळेत घेण्यात आलेल्या कार्यक्रमा दरम्यानचा आहे.

यावेळी हर्षदा हिने हे सुंदर नृत्य सादर करून उपस्थितांची वाहवा मिळविली. त्यानंतर सोशल मीडियावर हा व्हिडिओ टाकताच चांगलाच व्हायरल झाला. हर्षदाचा हा व्हिडिओ इतका व्हायरल झालाय की चंद्रा गाण्यावर डान्स करणाऱ्या अमृता खानविलकरने ही हर्षदाच कौतुक केलय.

हर्षदाला नृत्याची आवड

हर्षदला नृत्याची खूप आवड आहे आणि तो अभ्यासातही तितकाच हुशार आहे. हर्षदा वक्तृत्वातही प्रवीण आहे आणि शाळेच्या प्रत्येक कार्यक्रमात ती उत्साहाने भाग घेतो. काही दिवसांपूर्वी आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा करण्यात आला, यावेळी ती शिकत असलेल्या जिल्हा परिषदेच्या शाळेत एक छोटासा कार्यक्रम झाला होता. यावेळी तिने ‘चंद्र’ गाण्यावर डान्स केला आणि त्याचा व्हिडिओ शाळेतील शिक्षकांनी शूट करून सोशल मीडियावर अपलोड केला. हर्षालीचा डान्स पाहता पाहता चांगलाच व्हायरल झाला.

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.