सरकारी कर्मचाऱ्यांना आणखी एका धक्का, आता काय घेतला शिंदे-फडणवीस सरकारने निर्णय

अनेक वर्ष एकाच ठिकाणी काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना शिंदे-फडणवीस सरकारने धक्का दिला आहे. पुणे जिल्ह्यातील तहसीलदारांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. त्याचवेळी पुणे मनपाने अभियंत्यांचाही बदल्या केल्या आहेत.

सरकारी कर्मचाऱ्यांना आणखी एका धक्का, आता काय घेतला शिंदे-फडणवीस सरकारने निर्णय
सरकारी कर्मचारीImage Credit source: टीव्ही९ नेटवर्क
Follow us
| Updated on: Apr 13, 2023 | 12:34 PM

योगेश बोरसे, पुणे : एकनाथ शिंदे-देवेंद्र फडणवीस सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांना आणखी एक धक्का दिला आहे. एकाच विभागामध्ये वर्षानुवर्षे काम करणारे अधिकाऱ्यांना हा धक्का दिला आहे. राज्य शासनाचे सहसचिव माधव वीर यांनी काढलेल्या आदेशामुळे अनेक अधिकाऱ्यांना आपले सध्याचे कार्यालय सोडावे लागणार आहे. या अधिकाऱ्यांना नवीन ठिकाणी जाण्यासाठी कमी मुदत दिली आहे. येत्या १७ एप्रिलपर्यंत त्यांना नवीन जागेवर रुजू व्हावे लागणार आहे. यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून एकाच ठिकाणी ठाण मांडलेल्या अधिकाऱ्यांना हा धक्का आहे. पुणे मनपातील अधिकाऱ्यांनाही धक्का दिला आहे.

काय घेतला निर्णय

पुणे विभागातील 13 तहसीलदारांच्या बदल्या शिंदे-फडणवीस सरकारने केल्या आहेत. या सर्व जणांना 17 तारखेपर्यंत नवीन ठिकाणी हजर राहण्याचे आदेश सहसचिव माधव वीर यांनी काढले आहेत. पुणे जिल्ह्यातील बारामती, आंबेगाव, मावळ, वेल्हा ,मुळशी या पाच तालुक्यातील तहसीलदारांच्या बदल्या झाल्या आहेत.

हे सुद्धा वाचा

पुणे मनपात बदल्या

अनेक वर्ष एकाच विभागात काम करणाऱ्या अभियंत्यांच्या बदल्या पुणे महानगरपालिकेने केल्या आहेत. 132 अभियंत्यांच्या बदल्या महापालिका प्रशासनाकडून करण्यात आल्या आहेत. अभियंत्यांना तीन वर्षापेक्षा एकाच विभागात जास्त काळ ठेऊ नये असा आदेश असताना काहीजण सहा सहा वर्षे एकाच विभागात होते.

राजकीय पक्षांच्या तक्रारी

अधिकारी अन् कर्मचाऱ्यांकडून नागरिकांची अडवणूक होते, भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप राजकीय पक्षांनी केला होता. त्यानंतर प्रशासनाने 132 कनिष्ठ अभियंत्यांच्या तडकाफडकी बदल्या केल्या आहेत. स्थापत्य पदावरील 109, विद्युत पदावरील 17 आणि यांत्रिकी पदावरील 6 कनिष्ठ अभियंत्यांचा समावेश आहे. पुढील काही दिवसांतच अधीक्षक आणि लिपिकांच्या देखील बदल्या करण्यात येणार आहे.

यांनी केली होती तक्रार

काँग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे आणि शिवसेना (शिंदे गट) शहरप्रमुख नाना भानगिरे यांनी महापालिका आयुक्तांना निवेदन देऊन तक्रारी केल्या होत्या. पुणे मनपातील अनेक अधिकारी वर्षानुवर्षे एकाच विभागात असल्याचा आरोप त्यांनी केला होता. हे अधिकारी नागरिकांची अडवणूक करतात. त्यांची तातडीने बदली करावी, अन्यथा आंदोलन करण्यात येईल, असा इशारा दिला होता.त्याची दखल घेत महापालिकेच्या सामान्य प्रशासनाने सहा वर्षे एकाच विभागात कार्यरत असलेल्या 132 अभियंत्यांच्या बुधवारी तडकाफडकी बदल्या केल्या.

हे ही वाचा

Ratan Tata House Photos : रतन टाटा यांचे घर पहिले का? काय आहेत सुविधा जाणून घ्या?

 

दोन दिवस राज्यातील जवळपास सर्वच जिल्ह्यांना यलो अलर्ट, गारपीट अन् अवकाळीचे संकट

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.