माझ्या मुलाने मुख्यमंत्री व्हावे, अजित पवार यांच्या मातोश्रींची इच्छा

Gram Panchayat Election | राज्यातील २ हजार ३५९ ग्रामपंचायतींसाठी रविवारी मतदान होत आहे. यावेळी राज्याचे लक्ष अजित पवार यांच्या काटेवाडी गावाकडे लागले आहे. अजित पवार यांच्या मातोश्री आशाताई पवार यांनी रविवारी सकाळीच मतदान केले. यावेळी त्यांनी अजित पवार यांनी मुख्यमंत्री व्हावे, ही इच्छा व्यक्त केली.

माझ्या मुलाने मुख्यमंत्री व्हावे, अजित पवार यांच्या मातोश्रींची इच्छा
asha pawar and sunetra pawarImage Credit source: tv9 Marathi
Follow us
| Updated on: Nov 05, 2023 | 8:31 AM

अभिजित पोते, बारामती, पुणे | 5 नोव्हेंबर 2023 : लोकांचे भरभरुन प्रेम मिळाले आहे. बारामतीमधील जनताही आमच्या सोबत आहेत. आता माझे वय ८६ झाले आहे. लोकांनाही वाटते अजित पवार यांनी मुख्यमंत्री व्हावे. माझ्या देखतच दादाने राज्याचे मुख्यमंत्री व्हावे, हीच माझी सुद्धा इच्छा आहे, हे बोल आहेत, अजित पवार यांच्या मातोश्री आशाताई पवार यांचे. राज्यातील ग्रामपंचायतीसाठी आज सकाळपासून मतदानास सुरुवात झाली. अजित पवार यांचे गाव असलेल्या काटेवाडीत अजित पवार यांच्या मातोश्री आशाताई पवार आणि अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी मतदान केले. त्यानंतर आशाताई पवार यांच्याशी माध्यमांनी संवाद साधला. लोकांनी भरभरुन प्रेम दिले. त्यामुळे आता ‘दादा’ने मुख्यमंत्री व्हावे, हीच आपली इच्छा राहिल्याचे त्यांनी सांगितले.

काटेवाडीत विजय निश्चित

काटेवाडी ग्रामपंचायतीवर अजित पवार यांचे वर्चस्व राहिले आहे. परंतु या वर्चस्वाला आता सत्तेत एकत्र असलेल्या भाजपकडून आव्हान दिले आहे. परंतु गावातील लोक आपल्या सोबतच आहे. आमचा विजय निश्चित आहे, असे आशाताई पवार यांनी सांगितले. मी काटेवाडीत आली तेव्हा गावात काहीच नव्हते. त्यानंतर सूनबाईने गावासाठी काम केले. आता खूप बदल झाले.

हे सुद्धा वाचा

अजित पवार करणार नाही मतदान

अजित पवार यांना अशक्तपणा आहे. त्यामुळे ते मतदानास येणार नाही, असे त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी सांगितले. अजित पवार यांना डेंग्यू झाला आहे. डॉक्टरांनी त्यांना विश्रांतीचा सल्ला दिला आहे. गावात आमचा विजय निश्चित आहे, असे त्यांनी सांगितले.

16 जागांसाठी निवडणूक

काटेवाडीत 16 जागांसाठी मतदानाला होत आहे. गावात एकूण 5000 जण मतदानाचा हक्क बजावणार आहे. मतदानाला सुरुवात झाली आहे. सकाळपासून मतदान केंद्रावर मतदानासाठी मोठी गर्दी झाली आहे. यंदा अजित पवार यांच्या पॅनलसमोर भाजपने आव्हान उभे केले आहे. आता त्यात कोण बाजी मारणार? हे सोमवारीच स्पष्ट होणार आहे. सरपंचपदासाठी दोन्ही पक्षाच्या पॅनलमध्ये थेट निवडणूक होत आहे.

शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप.
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी.
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील.
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ.
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय...
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय....
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?.
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा.
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे.
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे.
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई.