कुलकर्णींचा मतदारसंघ गेला, टिळकांचा गेला, आता नंबर बापटांचा का?, कसबापेठेत लागले बॅनर्स; भाजपविरोधी वातावरण तापतंय?

कसबा पेठ पोटनिवडणुकीसाठी मुक्ता टिळक यांच्या कुटुंबातील सदस्याला उमेदवारी न देता हेमंत रासने यांना उमेदवारी दिल्याने अनेक जण नाराज असल्याचे बोलले जात आहे.

कुलकर्णींचा मतदारसंघ गेला, टिळकांचा गेला, आता नंबर बापटांचा का?, कसबापेठेत लागले बॅनर्स; भाजपविरोधी वातावरण तापतंय?
bjp Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Feb 06, 2023 | 7:30 AM

पुणे: एखाद्या लोकप्रतिनिधीचं निधन झाल्यास त्याच्या कुटुंबातील सदस्यालाच उमेदवारी देण्याची महाराष्ट्राची परंपरा आहे. चिंचवडमध्ये भाजपने ही परंपरा पाळली. मात्र, कसबापेठेत ही परंपरा पाळली नाही. कसब्यात हेमंत रासने यांना भाजपने उमेदवारी दिली आहे. त्यामुळे दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांचे पती शैलेश टिळक यांनी नाराजी व्यक्त केली. त्यानंतर भाजपमधील नाराजी नाट्य उघड झाले आहे. कुलकर्णी यांचा मतदारसंघ गेला. टिळकांचा गेला. आता नंबर बापटांचा का? असा मजकूर लिहिलेले बॅनर्स कसबापेठेत लागले आहेत. त्यामुळे भाजपविरोधातील वातावरण तापलं असल्याचं दिसून येत आहे.

पुण्यात कसबा मतदारसंघात अनोखे बॅनर लागले आहेत. पोटनिवडणुकीवरून भाजपला चिमटे घेणारे बॅनर्स कसब्यात लागले आहेत. कुलकर्णींचा मतदारसंघ गेला. टिळकांचा मतदारसंघ गेला. आता नंबर बापटांचा का?, असा सवाल या बॅनर्समधून करण्यात आला आहे. त्यामुळे या बॅनर्सची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. या बॅनर्सवर कुणाचंही नाव नाही. पण पक्षातीलच नाराजांनी हे बॅनर्स लावले असल्याचं सांगितलं जात आहे.

हे सुद्धा वाचा

रासनेंना उमेदवारी दिल्याने नाराजी

कसबा पेठ पोटनिवडणुकीसाठी मुक्ता टिळक यांच्या कुटुंबातील सदस्याला उमेदवारी न देता हेमंत रासने यांना उमेदवारी दिल्याने अनेक जण नाराज असल्याचे बोलले जात आहे.

आजारी असतानाही राज्यसभेच्या निवडणुकीत मतदान करण्यासाठी मुक्ता टिळक मतदानाला मुंबईत आल्या होत्या. रुग्णवाहिकेतून त्या आल्या होत्या. पक्षासाठी एवढी निष्ठा दाखवूनही त्यांच्या कुटुंबीयांना का डावलले गेले आहे? अशी चर्चाही कसब्यात दबक्या आवाजात होत आहे.

समाज कुठवर सहन करणार?

समाज कुठवर सहन करणार? असा सवालही या बॅनरवर करण्यात आला आहे. यातून ब्राह्मण समाज भाजपवर प्रचंड नाराज असल्याचा स्पष्ट इशाराच या बॅनर्सवरून देण्यात आला आहे. त्यामुळे ब्राह्मण समाजाच्या आणि टिळक समर्थकांच्या नाराजीचा फटका भाजपला बसणार असल्याची चर्चाही सुरू आहे.

भाजपचं आज शक्तिप्रदर्शन

दरम्यान, भाजपचे कसबापेठचे उमेदवार हेमंत रासने आज उमेदवारी अर्ज भरणार आहेत. यावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि पालकमंत्री चंद्रकांत पाटील उपस्थित राहणार आहेत. या निमित्ताने हेमंत रासने प्रचंड शक्तिप्रदर्शन करणार आहे. पुण्याचं ग्रामदैवत कसबा गणपती ते दगडूशेठ गणपतीपर्यंत या निमित्ताने पदयात्रा निघणार आहे.

हेमंत रासनेंकडून गणपती मंडळाच्या भेटीगाठींनाही सुरुवात झाली आहे. गणपती बाप्पाचा आशीर्वाद मला मिळणार आहे. गेली 30 वर्ष कसब्यात गणपती मंडळाचा कार्यकर्ता म्हणून मी काम करत आहे. भाजपची ताकद या मतदारसंघात आहे, अशी प्रतिक्रिया रासने यांनी दिली.

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.