“शहाण्या कुत्र्यांनी, मूर्ख मालकांना तळ्याकाठी फिरायला घेऊन येऊ नये”, मग या बॅनरची चर्चा तर होणारच

पुणे शहरातील बॅनरचे लोण सोलापूरपर्यंत जाऊन पोहचले आहे. सोलापुरातील सिद्धेश्वर मंदिर परिसरात एका अनोख्या बॅनरने सर्वांचे लक्ष वेधले आहे. मॉर्निंग वॉकला कुत्र्याला घेऊन येणाऱ्यांविरोधात खोचक बॅनरबाजी करण्यात आली. त्याची चांगली चर्चा सुरु आहे.

शहाण्या कुत्र्यांनी, मूर्ख मालकांना तळ्याकाठी फिरायला घेऊन येऊ नये, मग या बॅनरची चर्चा तर होणारच
Follow us
| Updated on: Mar 23, 2023 | 9:40 AM

सागर सुरवसे, सोलापूर : पुणे तेथे काय उणे असे नेहमी म्हटले जाते. पुणे शहरात लागलेल्या विविध बॅनरची चर्चा संपूर्ण राज्यात झाली. मग पुण्यातील राजकीय बॅनर असो की कुख्यात गुंडाच्या वाढदिवसाला लागलेले बॅनर असो, चर्चा तर झालीच. त्याचप्रमाणे पुणेरी पाट्यांची चर्चा सर्वत्र होत असते. पुण्याचे बॅनरचे व खोचक पाट्यांचे लोण इतर शहरांमध्ये पोहचू लागले आहे. आता सोलापूरमधील पाळीव कुत्र्याला आणि त्याच्या मालकाला वैतागून सोलापुरात लागलेल्या ‘ या ‘ फलकाची चांगलीच चर्चा सुरु झाली आहे. कुत्र्याला वैतागलेले लोक या बॅनरचे कौतूक करत आहेत.

काय आहे प्रकार

सोलापुरातील सिद्धेश्वर मंदिर परिसरात एका अनोख्या बॅनरने सर्वांचे लक्ष वेधले आहे. मॉर्निंग वॉकला कुत्र्याला घेऊन येणाऱ्यांविरोधात खोचक बॅनरबाजी करण्यात आली. या बॅनरमध्ये म्हटले आहे की, “शहाण्या कुत्र्यांनी, मूर्ख मालकांना तळ्याकाठी फिरायला घेऊन येऊ नये” अशा आशयाचा लावलेला फलक सर्वत्र चर्चेचा विषय ठरलाय. सोलापूरचे ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वर यांच्या मंदिराभोवती वॉकिंग ट्रॅक हा फलक लावण्यात आला आहे. या वॉकिंग ट्रॅकवर सकाळापासून लोक व्यायम करण्यासाठी व धावण्यासाठी येतात. परंतु कुत्र्यांमुळे ट्रॅकवर घाण होत असल्यामुळे सर्वच जण नाराजी व्यक्त करत होते. अखेरी एका हुशार व्यक्तीने या पद्धतीचे बॅनर लावले.

हे सुद्धा वाचा

आता तरी बदल होणार का

मंदिराभोवती असलेल्या ट्रॅकवर पहाटेपासूनच मोठ्या प्रमाणात नागरिकांची मोठी गर्दी पाहायला मिळते. परंतु वॉकिंगला येताना काही नागरिक आपल्या पाळीव कुत्र्यांना घेऊन येतात. त्यामुळे वॉकिंग ट्रॅकवर अस्वच्छतेचे प्रमाण वाढल्याने एका अज्ञात व्यक्तीने ही बॅनरबाजी केली आहे. या अनोख्या फलकाबद्दल बद्दल सोलापूरकरांमध्ये चांगली चर्चा रंगली आहे. या फलकानंतर तरी कुत्रे मालक शाहणे होतील का? अशी चर्चा रंगलीय.

पुणे शहरात सत्तासंघर्षावरील बॅनर लागले आहे. नेहमी बॅनरमुळे चर्चेत आलेले शहर आता या नवीन फ्लेक्समुळे पुन्हा चर्चेत आले आहे. आता चक्क सरन्यायाधीशांना उद्देशून फ्लेक्स लिहिले गेले आहे….वाचा सविस्तर

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.