वाढदिवस, साखरपुडा, विवाहाची बोलणी करायचीय? मग कार्यक्रम स्थळाचा पत्ता ‘पुणे मेट्रो’!

पुणे मेट्रो प्रत्यक्षात रुळावर धावण्याआधीच आपल्या वैविध्यपूर्ण उपक्रमांमुळे चर्चेत आहे. आता पुणे मेट्रोमध्ये चक्क वाढदिवस (Birthdays), लग्न (Marriage Ceremony), साखरपुडा यांसारखे कार्यक्रम करता येणार आहेत. मेट्रोमध्ये (Metro) जास्तीत जास्त प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी पुणे मेट्रोमध्ये लहान-मोठ्या वैयक्तिक, कौटुंबिक कार्यक्रमांना परवानगी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

वाढदिवस, साखरपुडा, विवाहाची बोलणी करायचीय? मग कार्यक्रम स्थळाचा पत्ता 'पुणे मेट्रो'!
पुणे मेट्रो
Follow us
| Updated on: Aug 30, 2021 | 3:28 PM

पुणे : पुणेकरांचं मेट्रोचं (Pune Metro) स्वप्न लवकरच सत्यात उतरणार आहे. पण मेट्रो प्रत्यक्षात रुळावर धावण्याआधीच आपल्या वैविध्यपूर्ण उपक्रमांमुळे चर्चेत आहे. आता पुणे मेट्रोमध्ये चक्क वाढदिवस (Birthdays), लग्न (Marriage Ceremony), साखरपुडा यांसारखे कार्यक्रम करता येणार आहेत. मेट्रोमध्ये (Metro) जास्तीत जास्त प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी पुणे मेट्रोमध्ये लहान-मोठ्या वैयक्तिक, कौटुंबिक कार्यक्रमांना परवानगी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. (Birthdays and weddings can be celebrated in Pune Metro)

पुणे मेट्रोची भन्नाट कल्पना

आपल्या आयुष्यात एखादा आनंदाचा प्रसंग कायम आठवणीत रहावा यासाठी सर्वजण प्रयत्न करत असतात. मेट्रोच्या या भन्नाट कल्पनेमुळे तुम्हाला लहान मुलांचे, ज्येष्ठांचे वाढदिवस, साखरपुडा, लग्न किंवा इतर कार्यक्रम धावत्या मेट्रोमध्ये साजरे करणं शक्य आहे. त्यामुळे हे प्रसंग कायमचे तुमच्या स्मरणात राहतील.

अल्प दरांत अनोखा सोहळा

एखादा छोटेखानी कार्यक्रम करायचा म्हटलं तरी सभागृह, सजावट आणि इतर साहित्य पकडून खर्च काही हजारांच्या घरात जातो. पण या भन्नाट कल्पनेसाठी कार्यक्रम करणाऱ्या गटाकडून मेट्रो तिकीटांसह अवघे तीन ते पाच हजार रुपये शुल्क आकारणार आहे. त्यामुळे अगदी परवडणाऱ्या दरांत एक पुणेकरांना अनोखा सोहळा अनुभवता येणार आहे.

मेट्रोचे वैविध्यपूर्ण उपक्रम

अशाप्रकारचा उपक्रम नागपूर मेट्रोमध्ये (Nagpur Metro) राबवण्यात येत आहे. त्यानंतर आता पुण्यात राबवता येणार आहे. काही दिवसांपूर्वी पुणे मेट्रोमध्ये सायकल घेऊन प्रवासासाठी परवानगी देण्यात आली आहे. या माध्यमातून सायकल संस्कृतीला चालना देण्याचा मेट्रोचा प्रयत्न आहे. त्यानंतर आता धावत्या मेट्रोमध्ये सोहळ्यांना परवानगी देण्याचा निर्णय पुणे मेट्रोने घेतला आहे. डिसेंबर अखेपर्यंत पिंपरी चिंचवड महापालिका (Pimpri Chinchwad) ते वल्लभनगर (Wallabhnagar) आणि वनाज (Vanaj) ते गरवारे महाविद्यालयदरम्यान (Garware Collage) पुणेकरांची मेट्रो धावणार आहे.

तात्पुरत्या स्वरूपात फुगेवाडीत कंट्रोल सेंटर

मेट्रोची प्रवासी सेवा सुरू झाल्यानंतर ऑपरेशनल कंट्रोल रुमची भूमिका अत्यंत महत्वाची आहे. मेट्रोच्या नियोजनानुसार रेंजहिल्य इथल्या डेपोच्या जागेत ही ऑपरेशनल कंट्रोल रुम उभारण्यात येणार आहे. यासाठी दीड वर्षाचा कालावधी लागू शकतो. मात्र, प्राधान्य मार्गावरच्या सेवा या वर्षाच्या अखेरपर्यंत सुरू करण्याच्या हलचाली सुरू झाल्या आहेत. त्यामुळे तात्पुरत्या स्वरूपात फुगेवाडी स्टेशन परिसरात कंट्रोल रूम कार्यान्वित करण्यात आली आहे.

महामेट्रो तयार करणार विस्तारित आराखडा

पुण्यात पहिल्या टप्प्यातली मेट्रो हळूहळू रुळावर येत असताना महामेट्रोकडून (Maha Metro) दुसऱ्या टप्प्यातल्या मेट्रोचं नियोजनही सुरू झालं आहे. त्यामुळे पुणे आणि परिसरात लवकरच मेट्रोचं मोठं जाळं पाहायला मिळणार आहे. पुणे आणि परिसरात दुसऱ्या टप्प्यात 82.2 किमीचं मेट्रोचं जाळं तयार करण्याचं नियोजन सुरू करण्यात आलं आहे. त्यासाठी शहरातल्या 8 वेगवेगळ्या मार्गांवर मेट्रोसह लाइट मेट्रो आणि मोनोरेल प्रकल्प राबवण्याची तयारी राज्य सरकारनं सुरू केली आहे. महामेट्रोकडून यासंदर्भातला सविस्तर आराखडा तयार केला जात आहे.

इतर बातम्या :

Pune Metro | मेट्रोच्या प्राधान्य मार्गांचं काम पूर्ण, फुगेवाडीत उभारली ऑपरेशनल कंट्रोल रुम, वर्षाअखेरीस प्रवासी सेवा सुरू होणार

Pune Metro | पुणे मेट्रो लवकरच प्रवाशांच्या सेवेत, आता दुसऱ्या टप्प्याचंही नियोजन सुरू, महामेट्रो तयार करणार 82.5 किमी मेट्रोचा आराखडा

पुणे मेट्रोच्या उभारणीतील मार्ग मोकळा, अडथळा ठरणाऱ्या वस्त्यांवर कारवाईसाठी प्राधिकरणाला हायकोर्टाची मुभा

99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.