AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

BREAKING | ‘होय, झाकीर नाईक याने अडीच ते तीन कोटी रुपये देणगी दिलेली’, राधाकृष्ण विखे पाटील यांची कबुली, पण…

खासदार संजय राऊत यांनी केलेल्या आरोपांवर महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. झाकीर नाईकने संस्थेला पैसे देणगी म्हणून दिले होते. पण त्यात अनियमितता नव्हती, असं विखे पाटील यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.

BREAKING | 'होय, झाकीर नाईक याने अडीच ते तीन कोटी रुपये देणगी दिलेली', राधाकृष्ण विखे पाटील यांची कबुली, पण...
Radhakrishna Vikhe PatilImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Jun 22, 2023 | 6:05 PM
Share

पुणे : शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी ईडीकडून मुंबईत सुरु असलेल्या कारवाईवरुन सत्ताधारी भाजप आणि शिवसेनेवर सडकून टीका केली. यावेळी त्यांनी राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या संस्थेला भारतातील वादग्रस्त धर्मगुरु आणि देशद्रोहाचा आरोप असलेला झाकीर नाईकने साडेचार कोटी रुपये दिले, असा मोठा दावा केला. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात एकच खळबळ उडाली. संजय राऊत यांच्या या दाव्यावर राधाकृष्ण विखे पाटील यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. झाकीर नाईकने संस्थेला अडीच कोटी रुपये दिले होते, अशी कबुली विखे पाटलांनी दिली. पण झाकीर नाईकने 10 ते 15 वर्षांपूर्वी पैसे दिले होते. तसेच त्याची चौकशीदेखील झाली होती, असंही राधाकृष्ण विखे पाटील यांनी स्पष्ट केलं आहे.

राधाकृष्ण विखे पाटील नेमकं काय म्हणाले?

“संजय राऊत यांच्या डोक्यावर परिणाम झालाय, असं मी अनेकदा सांगितलंय. तुम्ही सुद्धा पत्रकार बांधवांनी त्यांच्यापासून सावध राहिलं पाहिजे. हा मुद्दा महत्त्वाचा आहे. झाकीर नाईकचा जो मुद्दा आहे, झाकीर नाईकने 10 ते 15 वर्षांपूर्वी प्रवरा मेडिकल ट्रस्टला अडीच ते तीन कोटी रुपये दिले होते. त्याने ती देणगी दिली होती. ही देणगी 400 कोटी नव्हती. त्यानंतर या प्रकरणी चौकशी झाली होती. भारत सरकारने चौकशीदेखील केली होती. भारत सरकारने याप्रकरणी चौकशी पूर्ण करुन 10 वर्षापूर्वीच केस बंद केली”, असं स्पष्टीकरण राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिलं. विखे पाटील यांच्या या स्पष्टीकरणानंतर आता संजय राऊत नेमकी काय भूमिका मांडतात ते पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे.

संजय राऊत यांचे आरोप काय?

“राधाकृष्ण विखे पाटील यांचा गणेश साखर कारखान्यात पराभव का झाला? कारण भ्रष्टाचार. तुमच्या भाजपच्याच लोकांनी तो पराभव केलाय. राधाकृष्ण विखे पाटलांच्या संस्थानात झाकीर नाईक साडेचार कोटी रुपये का देतो? गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि ईडीची चौकशी करण्याची हिंमत आहे का?”, असा सवाल संजय राऊत यांनी केला.

“गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ईडीला पत्र लिहावं. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या खात्यात झाकीर नाईक ज्याच्यावर टेरर फंडिंगचा आरोप आपल्याच केंद्र सरकारचा आहे, साडेचार कोटी रुपये का मिळाले, कसे आले, त्या पैशांचा कसा व्यवहार होता, काय हालचाली होत्या? फडणवीस यांच्याकडे माहिती नसेल तर आम्ही द्यायला तयार आहोत. ते तुमच्या बाजूला मांडी लावून बसतात”, अशी टीका संजय राऊत यांनी केली.

तेजस्वी घोसाळकरांनी भाजपात प्रवेश करण्याचं थेट सांगितलं कारण
तेजस्वी घोसाळकरांनी भाजपात प्रवेश करण्याचं थेट सांगितलं कारण.
मनपा निवडणुकांच्या तारखा आज जाहीर होणार? आयोगाची 4 वाजता पत्रकार परिषद
मनपा निवडणुकांच्या तारखा आज जाहीर होणार? आयोगाची 4 वाजता पत्रकार परिषद.
ही उद्धव ठाकरेंची मोठी चूक, ठाकरे बंधूंच्या युतीवर आठवलेंचं मोठं विधान
ही उद्धव ठाकरेंची मोठी चूक, ठाकरे बंधूंच्या युतीवर आठवलेंचं मोठं विधान.
मुंबईला वाचवणारी महायुतीच धुरंधर... एकनाथ शिंदेंचा बाण उद्धव ठाकरेंवर
मुंबईला वाचवणारी महायुतीच धुरंधर... एकनाथ शिंदेंचा बाण उद्धव ठाकरेंवर.
तयारीत राहा...राज्य निवडणूक आयोगाचे आदेश, निवडणुकांच्या तयारीला वेग
तयारीत राहा...राज्य निवडणूक आयोगाचे आदेश, निवडणुकांच्या तयारीला वेग.
अ‍ॅनाकोंडा ते गांडुळाची औलाद...ठाकरेंची पुन्हा शाहांसह शिंदेंवर टीका
अ‍ॅनाकोंडा ते गांडुळाची औलाद...ठाकरेंची पुन्हा शाहांसह शिंदेंवर टीका.
पालिका निवडणुकीपूर्वी तेजस्वी घोसाळकरंचा ठाकरे सेनेला जय महाराष्ट्र!
पालिका निवडणुकीपूर्वी तेजस्वी घोसाळकरंचा ठाकरे सेनेला जय महाराष्ट्र!.
ओबीसी नेते मंगेश ससाणे यांच्या कारवर बीडमध्ये हल्ला, विधानसभेत पडसाद
ओबीसी नेते मंगेश ससाणे यांच्या कारवर बीडमध्ये हल्ला, विधानसभेत पडसाद.
शालेय पोषण आहारात 1800 कोटीचा घोटाळा? ठाकरेगटाच्या आमदाराचा गंभीर आरोप
शालेय पोषण आहारात 1800 कोटीचा घोटाळा? ठाकरेगटाच्या आमदाराचा गंभीर आरोप.
नागपूर अधिवेशनात अजित दादांच्या NCP ची संघाच्या बौद्धिकाकडे यंदाही पाठ
नागपूर अधिवेशनात अजित दादांच्या NCP ची संघाच्या बौद्धिकाकडे यंदाही पाठ.