पुणे पालकमंत्रीपदावरुन डच्चू मिळाल्यानंतर चंद्रकांत पाटील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीला

चंद्रकांत पाटील यांना पुणे पालकमंत्रीपदावरुन डच्चू मिळाल्यानंतर मुंबईत हालचालींना वेग आलाय. चंद्रकांत पाटील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीला निघाले आहेत. सध्याच्या राजकीय घडामोडींमुळे या भेटीला जास्त महत्त्व प्राप्त झालंय.

पुणे पालकमंत्रीपदावरुन डच्चू मिळाल्यानंतर चंद्रकांत पाटील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीला
Follow us
| Updated on: Oct 04, 2023 | 9:34 PM

पुणे | 4 ऑक्टोबर 2023 : राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांना पुणे पालकमंत्रीपदावरुन डच्चू देण्यात आल्यानंतर आता मुंबईत हालचालींना वेग आलाय. उपमुख्यमंत्री अजित पवार हे पुणे पालकमंत्री पदासाठी आग्रही होते. विशेष म्हणजे अजित पवार हे परस्पर बैठका घेत असल्याने चंद्रकांत पाटील यांच्या समर्थकांमध्ये आणि पुणे भाजपमध्ये धुसफूस असल्याची माहिती समोर आली होती. याबाबत सातत्याने चर्चा सुरु होत्या. या दरम्यान काल महत्त्वाच्या घडामोडी घडल्या. अजित पवार काल राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीला उपस्थित राहिले नाहीत. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काल ( 3 ऑक्टोबर 2023) मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर दिल्लीला रवाना झाले.

एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत राज्यातील 11 जिल्ह्यांच्या पालकमंत्रीपदाबाबतचा निर्णय घेण्यात आला. विशेष म्हणजे या बैठकीत चंद्रकांत पाटील यांच्याकडून पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी काढण्यात आली. त्याऐवजी अजित पवार यांना पुण्याचं पालकमंत्रीपद देण्यात आलं. तर चंद्रकांत पाटील यांना सोलापूर आणि अमरावती या दोन जिल्ह्यांच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी देण्यात आली. या घटनांनंतर आता मुंबईत हालचाली वाढल्या आहेत.

चंद्रकांत पाटील आणि मुख्यमंत्री यांच्यात चर्चा काय?

चंद्रकांत पाटील रात्री साडे आठ वाजेच्या सुमारास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी दाखल झाले आहेत. त्यांच्याकडून पुणे पालकमंत्रीपदाची जबाबदारी काढून घेण्यात आल्याने या भेटीला जास्त महत्त्व प्राप्त झाले आहे. या बैठकीनंतर चंद्रकांत पाटील काही प्रतिक्रिया देतात का? ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. भाजपमध्ये पक्षाच्या वरिष्ठांचा आदेश हा प्रमाण मानला जातो. त्यामुळे चंद्रकांत पाटील यांच्याकडून या निर्णयाचं स्वागत केलं जाणं साहजिकच आहे. पण राजकीय वर्तुळात या मुद्द्यावरुन चर्चांना उधाण आलंय.

दरम्यान, चंद्रकांत पाटील आणि एकनाथ शिंदे यांच्यात या बैठकीत काय चर्चा झाली, याबाबत सूत्रांकडून महत्त्वाची माहिती समोर आली आहे. या बैठकीत मराठा आरक्षणाबाबत चर्चा झाल्याची माहिती मिळत आहे. चंद्रकांत पाटील यांनी मराठा आरक्षण उपसमितीची माहिती घेतली, तसेच पुढील काळात काय करता येईल, याबाबत या बैठकीत चर्चा करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

Non Stop LIVE Update
मुंबईत कॅश व्हॅनमध्ये साडेसहा टन चांदीच्या विटा; किंमत ऐकून बसेल धक्का
मुंबईत कॅश व्हॅनमध्ये साडेसहा टन चांदीच्या विटा; किंमत ऐकून बसेल धक्का.
'तोपर्यंत स्वस्थ बसणार नाही, मी म्हातारा झालो नाही...',महायुतीला इशारा
'तोपर्यंत स्वस्थ बसणार नाही, मी म्हातारा झालो नाही...',महायुतीला इशारा.
'लाडक्या बहिणी'ना दम देणं महाडिकांना भोवणार? आयोगानं घेतला मोठा निर्णय
'लाडक्या बहिणी'ना दम देणं महाडिकांना भोवणार? आयोगानं घेतला मोठा निर्णय.
'भाजपवाल्यानो... आता पहिले तुमचीच मस्ती जिरवतो', जानकरांना संताप अनावर
'भाजपवाल्यानो... आता पहिले तुमचीच मस्ती जिरवतो', जानकरांना संताप अनावर.
भाजपच्या जाहीरनाम्यात 'लाडक्या बहिणीं'सह शेतकऱ्यांसाठी मोठ्या घोषणा
भाजपच्या जाहीरनाम्यात 'लाडक्या बहिणीं'सह शेतकऱ्यांसाठी मोठ्या घोषणा.
'मविआ'चा महाराष्ट्रनामा, जाहीरनाम्यात 'या' पंचसूत्रीसह कोणत्या घोषणा
'मविआ'चा महाराष्ट्रनामा, जाहीरनाम्यात 'या' पंचसूत्रीसह कोणत्या घोषणा.
'माता-भगिनी...', आधी लाडक्या बहिणींना दमदाटी, आता भाजप खासदाराची माफी
'माता-भगिनी...', आधी लाडक्या बहिणींना दमदाटी, आता भाजप खासदाराची माफी.
मारहाण करत लुटलं अन् केली जबरी चोरी, मनसेच्या उमेदवारावर गुन्हा दाखल
मारहाण करत लुटलं अन् केली जबरी चोरी, मनसेच्या उमेदवारावर गुन्हा दाखल.
'...मग मी बघतो तुम्ही आमदार कसे राहता', दादांचा रामराजेंना थेट इशारा
'...मग मी बघतो तुम्ही आमदार कसे राहता', दादांचा रामराजेंना थेट इशारा.
अमित ठाकरे पराभूत होणार? राऊतांकडून भाकीत, 'रोखठोक'मधून काय म्हणाले?
अमित ठाकरे पराभूत होणार? राऊतांकडून भाकीत, 'रोखठोक'मधून काय म्हणाले?.