‘सुप्रिया सुळे लबाड लांडग्याची लेक’, गोपीचंद पडळकर यांची जीभ घसरली, अजित पवार यांच्यावरही घणाघात

भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी आज अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यावर खोचक शब्दांमध्ये टीका केलीय. विशेष म्हणजे अजित पवार सत्तेत सहभागी झाले असतानाही गोपीचंद पडळकर यांनी त्यांच्यावर टीका केलीय.

'सुप्रिया सुळे लबाड लांडग्याची लेक', गोपीचंद पडळकर यांची जीभ घसरली, अजित पवार यांच्यावरही घणाघात
Follow us
| Updated on: Sep 18, 2023 | 3:38 PM

पुणे | 18 सप्टेंबर 2023 : भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्या वक्तव्याने नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. कारण त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर अतिशय खोचक शब्दांमध्ये टीका केलीय. “अजित पवार लबाड लांडग्याचं लबाड पिल्लू”, असं गोपीचंद पडळकर म्हणाले आहेत. तसेच “सुप्रिया सुळे म्हणजे लबाड लांडग्याची लेक”, अशीही टीका पडळकर यांनी केलीय. गोपीचंद पडळकर आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांच्यातील वाद हा नवा नाही.

गोपीचंद पडळकर यांनी याआधीदेखील शरद पवार, अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यावर टीका केलीय. पण आता अजित पवार सत्तेत आहेत. असं असतानाही त्यांनी अजित पवार यांच्यावर टीका केलीय. त्यामुळे पडळकरांच्या टीकेवरुन नवा वाद निर्माण होण्यची शक्यता आहे. गोपीचंद पडळकर यांनी धनगर समाजाच्या आरक्षणाबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवलं. पण त्यांनी अजित पवार यांना पत्र पाठवलं नाही. याबाबत गोपीचंद पडळकर यांना प्रश्न विचारला असता त्यांनी अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यावर खोचक टीका केली.

गोपीचंद पडळकर नेमकं काय म्हणाले?

“अजित पवार यांची भावना आमच्या विषयी स्वच्छ नाही. त्यामुळे आम्ही त्यांना पत्र देण्याची गरज नाही. ते लबाड लांडग्याचं लबाड पिल्लू आहे. त्यांना आम्ही मानत नाहीत. त्यामुळे मी त्यांना आम्ही कधी पत्र दिलं नाही आणि पुढेही पत्र देण्याची आम्हाला आवश्यकता वाटत नाही. ज्यांच्याकडून आम्हाला न्याय मिळू शकतो त्यांना मी पत्र दिलंय”, अशी टीका गोपीचंद पडळकर यांनी केली.

यावेळी त्यांनी सुप्रिया सुळे यांच्या धनगर आरक्षणाच्या मुद्द्यावरुन केलेल्या वक्तव्यावरुन टीका केली. “ही लबाड लांडग्याची लेक बोलतोय. त्यावर फार लक्ष देण्याची आवश्यकता नाही. तुम्ही तर तुमच्या पालख्या आमच्या समाजाने वागवल्या. लोकांच्या चपल्या फाटल्या. तुमच्या बापाने, तुम्ही, तुमच्या भावाने, पुतण्याने कुणीच तिकडे बघितलं नाही”, असा घणाघात पडळकर यांनी केला.

“तुम्ही जास्त पुळका आणण्याची गरज नाही. आता आमची लोकं सगळी हुशार झाली आहेत. मुलं सगळी हुशार झाली आहेत. लोकांची त्यांच्या विषयीची भावना ही त्यांनाही माहिती आहे. त्यामुळे सुप्रिया सुळे, शरद पवार, अजित पवार काय बोलले, याला आम्ही काळीची किंमत देत नाहीत”, अशी खोचक टीका गोपीचंद पडळकर यांनी केली.

ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला.
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.